Tuesday, December 29, 2009

Nasik Pune Round Trip

I am back in action..atleast thats what I feel at this stage.
I'd been to Pune last week end..finally with my New i10.
This was the first time I drive my car to pune. I had been with my family to visit some of the Ganpati temples..OJHAR, LENYADRI, Dagdusheth etc..
It was a rocking trip..I enjoyed it fully.
My friends kept annoying me persistently about the long drive. As my family was against me driving a long distance.
But finally MOM gave me green signal and I started my journey with wife and mom to pune.
It was so peacefull when reached at Lenyadri ( ganpati mandir )...
I had about 500+ KM drive on 1 day and its cool.
As this was the first time every I was driving for such a long distance..I was litte scared about the driving (specially night driving).
But no worries...on my way back to Nasik, I started my journey aroung 7 in the evening..I was planning to reach nasik before night but anyhow that didnt happen.
And finally I had to drive completely in night. This was the first time ever I was driving in the night on high way.
I heard that it was quite danger to drive at nights as truck drivers drive in an uncontrolled manner.
But again no worries..in the begining i thought it would be difficult but finally i reached nasik arond 12:30 AM.
Night driving rocks...but you have to be very careful while driving at night..

Monday, August 17, 2009

Noise Pollution : डोक्याला ताप.

यार काय त्रास आहे.
मला फार वैताग आला आहे.
तो समोरचा दुकान वाला खूपच आवाज करायला लागला आहे.
आता अगदी असह्य झाले आहे.
आज बायको ला ताप आला आहे आणि ह्याचा मात्र आवाज जोर जोरात सुरुच आहे.
खूप संताप होतो आहे.
मला काहीच समजत नाहीए की मी काय करू.
सरळ खाली जाऊन त्याची गच्ची पकडविशी वाटते.
खूप त्रास होऊ लागला आहे यार......
मला कुणीतरी काहीतरी सांगा...
त्याच्या विरुद्ध कंप्लेंट कशी नोंदवता येईल ते सांगा...

Tuesday, July 21, 2009

Continental Airlines वाल्यांच्या नाना ची टांग...

आज एक बातमी ऐकली, कलाम यांना विमानतळावर अपमानास्पद वागणूक दिली.
माझे डोके फार सटकले हे ऐकून.
प्रत्येक भारतीयाला चीड यावी असेच हे प्रकरण आहे.
जो माणूस एका देशाचा राष्ट्रपती होऊन गेला त्याला अशी वागणूक म्हणजे निरलज्जपणाचा कळस आहे.
कलाम यांचे विमानतळावर सेक्यूरिटी चेक घेण्यात आले.
त्यांचा मोबाइल, बूट वैइगेरे गोष्टी चेक करण्यात आल्या.

आणि हा सगळा प्रकार कुठे घडला तर म्हणे दिल्ली मधे.
च्यायला आजु बाजूचे लोक काय झोपले होते काय ?
त्या माणसाची सरळ गच्ची धरायची ना.
ज्याची लायकी नाही कलाम यांच्या सारख्या माणसांसमोर उभी राहायची त्याने कलाम यांची तपासणी करावी.
कलाम यांचे पण इथे कौतुक करवेसे वाटले.
एखादा भीकरडा मंत्री असता तर त्याने सर्व देश डोक्यावर घेतला असता.
सर्व न्यूज़ चॅनेल वर नुसता हा हा कार माजवला असता.

पण कलाम यांचा मोठेपणा इथे प्रकर्षाने जाणवतो.
त्यानी कुठलेही आधेवेढे घेतले नाही.
संपूर्ण चेकिंग ला सामोरे गेले.
कुठलाही गर्व नाही की माज नाही.
हीच मोठ्या माणसाची लक्षणे आहेत.
कलाम यांना मी देवासारखा मानतो.


आणखी एक गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार होऊन एप्रिल 24, 2009 ला झाला तरी कलाम यांनी एका शब्दानेही त्याचा उच्चार कुठे केला नाही. ना कुठली प्रेस कान्फरेन्स घेतली ना कुठे इंटरव्यू दिला.

मोठ्या लोकांच्या ह्याच गोष्टी त्यांना मोठे बनवतात.
ज्या माणसांकडे फालतू गोष्टींना वेळ आहे असेच आजचे मंत्री लोक आडळापट करतात.

पण खरच कलाम ग्रेट आहेत. ह्यात वाद नाही. पण म्हणून आम्ही असला अपमान सहन करू असे नाही.
मला खरच बघायला आवडेल की आपले हरामखोर नेते मंडळी आता काय दिवे लावतात.

स्वताहा बद्दल असले प्रकार झाले की सर्वांनाच मिरची झोंबते पण आता बघुया काय करतात ते.

पण जाता जाता पुन्हा एकदा.....हॅट्स ऑफ तो कलाम साहेब.
तुम्ही तरुण लोकांसमोर छान उदाहरण ठेवत आहात.
आपली एनर्जी कशी आणि कुठे वापरायची ते दाखवून देत आहात.
हॅट्स ऑफ टू यू सर.....

Monday, July 13, 2009

व.पु.काळे

कधी कधी प्रेमात पडायला कारण लागत नाही.
माझेही असेच झाले..
माझ्या ताई ने मला पार्ट्नर पुस्तक प्रेज़ेंट केले.
वास्तविक पाहता.."वाचन" हा मला वाटणारा सर्वात कंटाळवाणा प्रकार...(म्हणजे माझ्यासाठी)
पण मी जेव्हा ते पुस्तक वाचायला सुरवात केली तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडलो.

- पार्ट्नर, हे व. पु . काळे ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे.
तुम्ही जर वाचले नसेल तर नक्की वाचा.

ह्या पुस्तकाने मला वाचनाची इतकी गोदी लावली आहे की काय सांगू.
सध्या आमच्या घरी व.पु. काळे ह्यांची जवळपास सर्व पुस्तके आहेत.
आणि आम्ही सर्व मंडळी त्यांचे ग्रेट फेन्स झालो आहोत.

त्यांचे अजुन एक आवडलेले पुस्तक म्हणजे - वलय आणि हुंकार.

व.पु. काळे ह्यांचा मी एक भक्त आहे.
पार्ट्नर तर मी इतक्या वेळा वाचले आहे तरी पुन्हा वाचतांना एक नवी मजा वाटते.
खरच, काळे हे एक उत्तम लेखक होते.
त्यांनी लिहिलेले एकूण एक पुस्तक म्हणजे वाचकांना दिलेली पर्वणीच आहे.
व.पु.काळे ह्यांना माझा सलाम.

दिमाग का दही...

काय सांगू ..?
सॉलिड वैताग आला आहे.
माझ्या घरा समोर एक वेलडिंग चे दुकान आहे.
दिवस भर नुसती आदळ-आपट सुरू असते तिकडे.
जरा काही डोळा लागला की लगेच ..धाण धाण...
शी..एकदम बोरिंग...
च्यायला रेसिडेन्षियल एरिया मधे कुणी ह्यांना लाइसेन्स दिले काय माहिती.
माझ्या झोपेचे मात्र खोबरे झाले आहे.
जीव मुठीत घेऊन मी सध्या झोपतो.
बायको म्हणते की काही गोष्टी इग्नोर करायला पाहिजे.
मान्य आहे .. अगदी 100% मान्य आहे.
पण मला नाही जमत ना ते...मी काय करू ?
मी माझ्या रूम मधे सध्या जात सुद्धा नाही...आई च्याच रूम मधे झोपतो.
अगदी वैताग वैताग झाला आहे माझा.

Monday, July 6, 2009

मैत्रीण

बर्‍याच दिवसांनी वाट पाहून पाहून शेवटी एकदाचा पाऊस पडला.
आणि रस्त्यांबरोबर मन सुद्धा धुवून निघाले.
काही वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस मला अचानक आठवून गेला.

... अशाच एका पावसात चिंब भिजून मी ऑफीस ला दांडी मारायच्या विचारात असताना माझ्या बॉस चा फोन आला.
अर्जेंट काम आहे म्हणून तो माझी वाट पाहत होता. हुशार असण्याचे काही तोटे असतात हे मला त्या दिवशी आवर्जून जाणवले.
ऐरवी मस्त घरी जाऊन मी आई ला आज गरम गरम भजी आणि चहाचा बेत आखणार होतो.
पण माधेच पचका झाला.
झक मारुन घरी आलो. कपडे बदलले आणि तसाच ऑफीस च्या दिशेने निघालो.
मनातून जाम वैतगलो होतो. पण काही उपयोग नव्हता.
आज बस आणि रिक्षा दोघेही माझ्यावर कृपा करत नव्हते.
चांगला अर्धा तास स्टॉप वर थांबून शेवटी मला एक रिक्षा भेटली.

रिक्षा मधे आधीच काही लोक कोंबलेले होते. त्यात आणखी माझी भर पडली.
शेजारी बसलेला माणूस सुसाट सिगरेट ओढत होता. कुणाला त्याचा त्रास होतो आहे की नाही ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. बाजूच्या बाई च्या मांडीवर एक लहान पोरगं होतं. त्याची चप्पल चिखलाने माखाली होती.
त्याचे पाय राहून राहून मला लागत होते. जाम संताप येत होता. पण काय करणार. रिक्षा माझी नव्हती म्हणून सर्वांचे सोपस्कार मी नीट झेलत होतो.
शेवटी एकदाचे ऑफीस आले. सुटे पैसे असूनही मी रिक्षा वाल्याला काही ते दिले नाही.
त्या निमित्ताने मी माझ्या मनातली चीड व्यक्त केली.

रिक्षावाल्याने दिलेले प्रवचन ऐकून मी सरळ ऑफीस मधे शिरलो.
आतमधे गेल्यावर बॉस ने बोलावून घेतले.
"बाहेर काही मुली बसल्या आहेत. त्यांना आपण सेलेक्ट केले आहे. त्यांना कामाचे काय ते समजावून सांग" , बॉस म्हणाला.
मी मान हलवली आणि केबिन च्या बाहेर आलो.

बाहेर सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती.
अनेक लोक ऑफीस मधे असतांना माझी निवड त्या पोरींना ट्रेनिंग देण्यासाठी करण्यात आली होती.
मला अर्थात त्याच्यात काही इंट्रेस्ट नव्हता.
काही हुशार मंडळींनी लगेच येऊन माझे अभिनंदन वैगेरे केले.

मी सरळ त्यांच्या कडे वळलो.
3 जणी एका सोफ्यावर बसल्या होत्या.
तिघी बहुतेक मैत्रिणी असाव्यात. कारण मी जाण्याअगोदर त्या एकमेकींशी गप्पा मारत बसल्या होत्या.
त्यांच्या पैकी 1 जन जरा शांत होती. बाकीच्या दोघींनी आपण कसे हुशार आहोत ते मी न विचारता सांगायला सुरवात केली.

मला त्यात काही इंट्रेस्ट नाही हे बहुदा त्यांना समजले असावे.
बराच वेळ वायफळ बडबड करून त्या गप्प बसल्या.
मी त्यांना डेस्क दाखवला आणि काम सांगून निघून गेलो.

काही कारण नसतांना ती गप्प राहणारी मुलगी मात्र मनात घर करून गेली.
तिच्यात सुंदर म्हणावे असे काही नव्हते.
रंग सावळा. कळेभॉर डोळे. मोत्यासारखे स्वच्छ दात.
साधा पंजाबी ड्रेस, एक लांब वेणी.
कुठलाही मेकप नाही की लीप-स्टिक नाही.
बाकीच्या मुलींसारखा भपकेपणा नाही.
एकदम साधा पेहेनवा आणि शांत नजर.
खरच ती फारच सुंदर नाही पण आकर्षक मात्र नक्कीच होती.
काही लोकं दिसायला आकर्षक असतात.
एका नजरेने ते आपल्याला घायाळ करतात. अशीच काहीशी ती सुद्धा होती.

ती नुसतीच शांत नव्हती तर हुशार सुद्धा होती. थोड्याच दिवसात तिने सर्व काही आत्मसात केले.
मी ही मग थोडा वेळ मिळाला की मग तिच्या शेजारी जाऊन बसायला लागलो.
तिची हुशारी पाहून मी खरच थक्क झालो.
सर्व बोलत असतांना फक्त तिचा आवाज मला ऐकू यायचा.

मग गप्पांच्या नादात चहा होऊ लागला.
तासन्तास आम्ही एकमेकांशी गप्पा मारत बसायचो.
एरवी सुटी ची वाट पाहणारा मी मग ऑफीस ची वाट पहायचो.
तुम्ही म्हणाल की प्रेम वैगेरे झाले ह्याला. पण नाही निखळ मैत्री होती ती.
हो 3 वर्ष निखळ मैत्री होती आमची.
पण म्हणतात ना. "मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात होते" तेच झाले आमचे.
पण जेव्हा आम्ही मित्र - मैत्रीण होतो तेव्हा प्रेम हा शब्द आमच्या गावीही नव्हता.

आज काल फॅशन आहे. एका महिन्यात मुलं प्रेमात पडतात आणि 2 महिन्यात दुसरा जोडीदार निवडतात.
आपण कपडे बदलत नाही इतक्या लीलया ही लोकं पार्ट्नर्स बदलतात.
महिन्यभरच्या ओळखिला प्रेमाचे नाव देतात.
मला हे पटत नाही. प्रेम ही घाई घाई ने करण्याची गोष्ट नाही.
एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण असली म्हणजे ती / तो चांगला लाइफ पार्ट्नर असेलच असे नाही.
सच्चा प्रेमाला गरज असते ती निखळ मैत्रीची.
आज तीच 3 वर्ष मैत्रीण असलेली मुलगी माझी बायको आहे.
पण बायको पेक्षा ती माझी मैत्रीण आहे.

Yes she is my friend... A best friend.

Monday, June 29, 2009

Saturday, June 20, 2009

मी पोरका झालो...

सकाळी 7.20 ची वेळ
ममांचा हॉस्पिटल मधून फोन आला.
"अण्णा गेले..."
काहीशी डोळ्यांची कडा ओळी झाली.
पहिला प्रश्न मनात आला तो "आई कशा अवस्थेत असेल..?"
काय करावे काही समाजेना. काही सुचेनसे झाले. डोळ्यासमोर अंधार आला.
अंगातून एकदम बळ नाहीसे झाल्यासारखे वाटले. सर्व त्रान नाहीसा झाला.

आढल्या दिवशीच आम्ही रात्री 11:30 पर्यंत हॉस्पिटल मधे होतो.
त्यावेळी असे काही घडेल ह्याची शंका सुद्धा आली नव्हती मनात.
कसाबसा तोंड धून मी गाडी काढली आणि हॉस्पिटल च्या दिशेने निघालो.
बरोबर भाऊ, वाहिनी आणि बायको होती. सुरवातीला वाटले की ड्राइविंग करता येईल की नाही.
एरवी काणांचे पडदे फाडणारे होर्न आज मला ऐकू येत नवते.
रस्त्यावरची गर्दी अचानक नाहीशी झाल्यासारखी वाटली.
सरवीकडे एक निरव शांतता जाणवत होती. मनात कुठलेही विचार नाहीत.
कसा बसा हॉस्पिटल मधे पोहोचलो.
मनातून मी खूप खचलो. ड्राइविंग करतांना हॉस्पिटल मधे गेल्यानंतर काय चित्र असेल ह्याचाच विचार रस्ता भर होता.
आजवर ज्यांना साधा कधी आराम करतांना पहिले नव्हते त्यांना आता अशा अवस्थेत पाहतांना मनात प्रचंड उलथापालथ होणार होती.

हॉस्पिटल मधे पोहोचलो.
रूम मधे पाऊल ठेवले. डोके जड पडले आणि हात पाय गळून गेले.
समोरच बेड वर आंणांचा देह शांत पडून होता. रूम मधे भयाण शांतता.
शेजारीच एका खुर्चिवर आई बसली होती. मला तिच्या कडे बघवेना.
आई च्या डोळ्यातला एक एक अश्रू माझा जीव घेऊन जात होता.
आई ला सांभाळायला हवे म्हणून मला रडू ही आले नाही.
मी फक्त आईच्या खांद्यावर हात ठेवून आंणांचा चेहरा बघत होतो.
एखाद्याने फटाक्यांची लड लावावी आणि एकाच वेळी सर्व फटाके पेटून उठावे असा माझ्या मनात कल्लोळ सुरू झाला.एखादा माणूस आपल्याला सोडून गेल्यावर त्याची किंमत आल्याला समजते, ह्याचा खरा अर्थ मला त्या दिवशी समजला.

... अण्णा म्हणजे माझे वडील.
वय साधारण 75 च्या आसपास.
आज पर्यंत कधीही दवाखाना माहिती नाही..कुठले व्यसन नाही की काही शौक नाही.
एकदम साधे व्यक्तिमत्व.
उभ्या आयुष्यात वडिलांनी कधी साधा 1 रुपया सुद्धा स्वताहा साठी खर्च केला नाही.
अगदी हालाकीच्या दिवसात त्यांनी आमच्या साठी जीवाचे रान केले.
नेहमी मुलांची काळजी केली. आम्ही 5 भावंड असूनही त्यांनी कधी कुणाला काही कमी पडू दिले नाही.
सर्वांना ग्रॅजुयेट / पोस्ट ग्रॅजुयेट केले.

साधारण 40 वर्षापूर्वी कपड्यानिशी वडिलांना त्यांच्याच भाऊ बंधूंनी घरातून ऐन दसर्‍याच्या दिवशी बेघर केले.
होते नव्हते ते सर्व हडप केले.
सोबत होती ती फक्त बायको...माझी आई.
अथक परिश्रम करून त्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले.
चांगली शिकवण दिली आणि स्वतहाच्या पायावर उभे केले.
मला अजुन आठवते, मी साधारण 9-10 वि ला असेल तेव्हा अण्णा रिटाइर झाले होते.
रिटाइर झाल्यानंतरही त्यांनी आम्हाला शिकवले.
MCS पर्यंत शिकवले. अगदी 1-1 रुपया वाचवून.

लहानपणी फार चीड यायची - एकाच बशित पाणीपुरी घेऊन आम्ही तिघे जन, म्हणजे मी, भाऊ आणि वडील, खायचो.
एकेकाला 2-3 पुर्‍या यायच्या..तेव्हा वाटायचे की इतके पैसे कशासाठी तुम्ही वाचवत आहात. पण नंतर कॉलेज ची फी भरतांना प्रत्येक वेळी जाणीव व्हायची की, "हो ह्याच दिवसा करिता तुम्ही तुमच्या पोटाला टाके घातलेत."
ज्याला आम्ही लहानपणी कंजूषपणा समजत असु त्यात कुठेतरी दूरदृष्टी होती हे कधी आम्हाला जाणवलेच नाही.
चाळीत लहानपणी कंजूष-कंजूष म्हणून हिणवले जात असतांना मन कुठेतरी दुखत होते. पण आज जेव्हा तेच चीडवनारे लोक घरी येतात आणि मी केलेल्या प्रगती कडे पाहून थक्क होतात तेव्हा आवर्जून तुमची आठवण होते.
आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे.

आज तुम्ही जाऊन महिना झाला पण आम्ही अजूनही सावरू शकलो नाही.
सर्वांसमोर बडबड करणारा मी, एकांतात मात्र तुमची आठवण काढत बसतो.
आणि मनातून अजूनही तो दिवस काही सरत नाही.
अनेक भावना आहेत मनात पण प्रत्यक्षात लिहितांना मात्र शब्दच सापडत नाही. हा थोडा फार प्रयत्न आहे माझा तुम्हाला श्रद्धांजली वाहण्याचा.

का कुणास ठाऊक पण मला रडू येत नाही...आणि आज ह्याच गोष्टीचा मला फार त्रास होतो आहे.
मनात खूप सारे विचार भरले आहेत..त्याचा घडा भरला आहे पण डोळ्यावाटे मला त्या व्यक्त करता येत नाहीएत.
म्हणून आज मी इथे माझे विचार सांडत आहे.

एखाद्या भांड्यात खूप मोती असावे आणि ते सर्व उचलतांना हातातून अनेक मोती निसटून जावेत असे काहीसे माझे हे लिहितांना होते आहे. तरी फक्त एवढेच म्हणेन की "आन्ना तुम्ही आमच्यासाठी खूप केलंत.. आणि सदैव आम्ही तुमचे ऋणी राहू..."

आपला -
अरविंद

Tuesday, May 12, 2009

चिवित्र पणा ...

तुम्ही कधी फॉरिन ला गेला आहात का ?
नाही ?
मग तुमचा कुणी मित्र वैइगेरे गेला आहे का ?
हो ? वेरी गुड....
त्याचे फोटो पहिले आहेत का ?
हो ? वेरी वेरी गुड.....
त्यात जास्तीत जास्त काय दिसते ??
काय सांगता ?? त्याचेच फोटो ??
आहो नाही नवल नाहीए....
काय आहे सामान्यपणे प्रत्येक माणसाचं हेच असतं...
प्रत्येक फोटो मधे मी आलोच पाहिजे असला हट्ट असतो त्यांचा.
कशासाठी कुणास ठाऊक...पण असतो...
अरे माहिती आहे आम्हाला तुम्ही फॉरिन ला गेला होतात...
आता प्रत्येक फोटो मधे तुमचे तोंड खूपसायचे काही कारण नाहीए...
पण नाही..प्रत्येक फोटो मधे बाकीचे सीन कमी .. किंबहुना नाहीच..पण यांचे तोंड मात्र आहे.
ज्या मित्राला आपण रोज पाहतो..किंबहुना भेटतो त्याचेच तोंड फोटोत पाहायला मला IRITATE होते.

बर एक दोन ठिकाणी असेल तर ठीक..पण नाही..हे स्वताहावर इतके प्रेम करतात की प्रत्येक फोटो च्या फ्रेम मधे हे हवेच..
मग कधी ताजमहाल च्या बाजूला मेन फोकस मधे हे आणि बापुडा ताजमहाल त्यांच्या बाजूला केविलवाणा उभा...
तीच तरहा प्रत्येक फोटो मधे..
च्यायला तुम्ही तिकडे आनंद घेण्यासाठी गेला होतात की परत आल्यावर लोकांना काहीतरी शाइनिंग मारायला दाखवावे लागेल ह्या साठी गेला होता ?
नाही .. मी असे नाही म्हणत की असे फोटो काढू नका...
पण आहो ते दुसर्यांना तरी दाखवू नका...
पाहणारा बोलत नाही पण त्याला मनातून "कधी एकदाचा ह्यांच्या घरातून निघतो" असे होते.

आम्हाला माहिती आहे हो..
फोटो मधे तुम्ही एकदम हीरो दिसत असला तरी आतून व्हिलन आहात तुम्ही...
तेव्हा प्रत्येक फोटो मधे कलमाडायची गरज नाही.

पण आपण फोटो कसले काढावे याचीही अक्कल असावी लागते माणसाला.
प्रत्येक फोटो मधे जर आपले तोंड आले पाहिजे असला हट्ट असेल तर मग घरीच मस्त फोटो सेशन करा की.

अजुन एक गंमत म्हणजे...हे लोकं तिकडे कुठल्याही गाडीच्या बाजूला जाऊन उभे रहातात..
माझा एक मित्र आहे सध्या फॉरिन ला..लाई सुखात आहे म्हणतो ..पण
फक्त स्वयंपाक स्वताहा करतो..
कपडे स्वताहा धुतो..
हसतो आणि राडतो सुद्धा एकटाच...पण तो लाई सुखात आहे...असो..

तर त्या कार्टून ने "HAMMER" गाडीच्या बाजूला उभा राहून फोटो काढला..
मी विचारले घेतली का रे? तर म्हणतो हो...हा हा हा हा हा
च्यायला गाडी आवडते ना ?
मग छान पैकी काढ की तिचा फोटो..माधेच तू कशाला हवा ठोंब्यासारखा ??
नाही म्हणजे तुला सांगायचे काय आहे त्यातून ?
अरे मूरखा, जी गोष्ट आपली नाही त्यावर हक्क दाखवून काही उपयोग आहे का ?
तो मालक तिथून ती गाडी घेऊन गेल्यावर तुझाकडे काय उरते ? दगड की माती ?

असले बोरिंग लोक फोटो दाखवून दाखवून इतके हैराण करतात म्हणून सांगू...
पण परत मायदेशी परतल्यावर साधे 1 चॉक्लेट सुद्धा आणत नाही.
ह्यांचा इतका अत्याचार सहन करा...
नको नको ते फोटो उगाच कौतुक करून पहा..
आणि परत फेड नाही ??? अरे हाड....
जेवढ्या प्रेमाने आपण आपले फोटो मित्रांना बळजबरीने पाहायला लावले तेवढ्याच आपुलकीने 1 चॉक्लेट तर आणायचे ना म्हषा....
पण नाही..इथे त्यांचे प्रेम आटुन जाते.
अर्थात सर्वच असे करत नाही..पण बहुतेक असे करतात.

मान्य आहे की आठवणी जपून ठेवल्या पाहिजेत पण त्याचे प्रदर्शन होते त्याचे काय ??
आठवणी ह्या प्राइवेट केटेगरी मधे येतात...नाही का ?

संदीप खरे यांची एक कविता आठवली ---
दाढी काढून पहिला
दाढी वाढून पहिला
चेहरा कंटाळवाणा
पण अबाधित राहिला




Monday, May 11, 2009

अरे लोकं गेले उडत ...

राम राम मंडळी..
काहीही लिहायच्या आधी मी एक गोष्ट क्लियर करणार आहे...
"हो मी रात्री चा काम करतो..माझे ऑफीस रात्री असते...."
कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर कृपया मला भेटू नये..."

च्यायला सर्वांना सांगून सांगून वैताग आला आहे.
ज्याला पहावे तो म्हणतो.. " अरे बाप रे, म्हणजे तू नाइट शिफ्ट करतोस का ??"
आणि मग तो माझ्या कडे हीन भावनेने बघायला लागतो...
मला खरच दया येते अशा लोकांची...
रात्रीचे काम करतो ह्याचा अर्थ मी वॉचमन आहे असे नाही...ही एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते.
आणि रात्री काम करायला मला आवडते हे मी डोके फोडून कुणालाही सांगत बसणार नाही.
किंबहुना मला त्याची गरज वाटत नाही.
मी अगदीच ह्या प्रश्नाने वैतगलो म्हणून ठरवले की ह्याच्या वरच ब्लॉग लिहावा.
ज्यांना कुणाला वाटत असेल की मी वॉचमन चे काम करतो त्या सर्वांना माझे एकच उत्तर -- "हो करतो मी..."

नाहीतरी लोक कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू पाहण्यापेक्षा वाईट पहिले पाहतात.
आहा हेच बघा ना...
मी जेव्हा माझ्या आयुष्यातली पहिली 4 वीलर गाडी (Accent) घेतली तेव्हा मला लोकांनी फार त्रास दिला होता.
कारण काय ?? तर मी ती सेकेंड हॅण्ड घेतली होत म्हणून...
मला लोक चिडवायचे...सेकेंड हॅण्ड म्हणून...

आता मी मागच्याच आठवड्यात नवी कोरी i10 sportz घेतली.
आता मात्र कुणी चिडवत नाही..नवी गाडी म्हणून.
तसा मी लोकांकडे फार लक्ष देत नाही.
आणि सल्ले फक्त माझ्या पेक्षा हुशार लोकांकडूनच घेतो..त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो.
काही लोकं अशीची कॉम्प्लेन्ट करतात की -- "शी तुझ्या कडे फक्त 29 इंची टी वि आहे..."
आता काय म्हणणार अशा लोकांना सांगा...
बर्‍याच लोकांनी ज्यांनी मला चिडवले त्यांच्यासाठीच हा ब्लॉग मी अर्पण केला आहे.
मला त्यांना कधी कधी धन्यवाद सुद्धा द्यावेसे वाटतात...कारण "निंदाकाचे घर असावे शेजारी" म्हणतात ना .. तसे ह्या सर्व लोकांमुळेच आजवर मी मला पुढे नेऊ शकलो आहे.
तेव्हा माझ्याकडे सेकेंड हॅण्ड गाडी आहे की नवीन गाडी हे बघण्यपेक्षा तुमच्या कडे काय आहे ह्याचा विचार आधी करावा...

आणि वस्तुंमधे तुलना करण्यापेक्षा विचारांची तुलना केली तर ते जास्त सोपे पडेल...नाही का ??

धन्यवाद.

Tuesday, May 5, 2009

आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे...

आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
सर्वांचा विश्वास हरवून बसल्या सारखे वाटते आहे.
नक्की कारण मी नाही लिहु शकत ... पण खरच आज मला कुणीतरी खांद्यावर डोके ठेवण्यासाठी पाहिजे आहे.
एरवी बडबड करणारा मी एक कार्टून आता शांत झाला आहे.
आज आत्ता जरी मला मरण आले तरी मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे.

पण खरच सांगतो..
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.



मी जिंकणार आहे..

होय माहिती आहे मी आज कुठेतरी कमी पडलो आहे.
पण उद्या मी पुन्हा उगवणार...
त्याच तेजाने..त्याच शक्तीने..त्याच हिमतीने...त्याच आवेषाने..

आज मी हरलो असेनाही कदाचित...पण उद्या मी जिंकणार आहे.
आज मी मागे पडलो असेलही..पण उद्या मी सर्वांच्या पुढे असणार आहे.

आज मिळालिही असतील हजारो दुख्खे ..
पण उद्या मी त्याच दुखांकडून हिंमत घेऊन एक नवी भरारी मारणार आहे.

आज टोचले ही असतील काटे मला कुणी...
पण उद्या त्यातूनच मी गुलाब उगवणार आहे.

ज्या क्षणात आले टचकन डोळ्यात अश्रू...
तो क्षण पुन्हा मी आनंदाने जगणार आहे.

मतीमधे मिसळून ज्यांनी मला मारले..
त्यांनाच मातीचा सुगंध मी देणार आहे.

............................ उद्या मी जिंकणार आहे.


Friday, May 1, 2009

मराठी पेपर वेबसाइट एकदम थर्ड क्लास..

आता काय बोलणार ह्यांना सांगा..
थोडं बोर झालं काम करून म्हणून मी पेपर वाचायचं ठरवलं..इंग्लीश वाचायला बोर होतं म्हणून मराठी पेपर ची वेबसाइट उघडली..जी मनात शंका होती तेच झालं...वेबसाइट एकदम थर्ड क्लास...ओपन व्हायला 10 मिनिट..नंतर फॉण्ट चा प्रॉब्लेम..मग काही लिंक चालतचं नाही...च्यायला कशाला झक मारायला वेबसाइट ओपन करतात का हे लोक मग ?

Thursday, April 16, 2009

शिक्षण...

साला एक जमाना होता.
आमचे सर मॅडम आम्हाला सॉलिड चपटाळून काढायचे.
मागचा पुढचा कसलाही विचार न करता.
पण आम्हाला कधी काही वाटले नाही त्याचे.
कारण एकच - ते आमच्या भल्यासाठी काही तर करत आहे हे मनात ठाम असायचे.

त्यामुळे तो मार सुद्धा काही तरी शिकवून जायचा.
ते म्हणतात ना - छडी लगे छम्छम विद्या येई घम घम (कृपया विद्या म्हणजे विद्या बालन नाही.. उगाच फालतू विनोद नको)
आम्ही..म्हणजे मी तरी खूप मार खाल्ला शाळेत असतांना.
म्हणजे केस माझे कधीच कापलेले नसायचे..त्यावरून तरी हमखास मार असायचा मला.
हे झाले एक कारण. अशी हजारो करणे आहेत की ज्यामुळे मला बेदम मार खावा लागला आहे लहानपणी.

आजही मला माझे सर्व शिक्षक आठवतात.
काही आवडते तर काही न आवडते.
विशेष म्हणजे शारीरिक शिक्षण ह्या विषयासाठी आम्हाला एक सर होते.
त्यांचा सॉलिड राग आहे मला अजूनही.
आहो आमच्या स्पोर्ट्स रूम मधे शाळेने आमच्याच फी भरलेल्या पैशामधून क्रिकेट किट घेतले होते.
फार जीव जायचा ते खेळण्यासाठी.
पाचवी ला असतांना वाटायचे की सहावीत गेल्यानंतर तरी मिळेल...
सहावीत गेल्यानंतर वाटायचे की सातवीत तरी...आठवीत तरी...
असे करता करता दहावी सुद्धा पास झालो आम्ही पण ते किट काही बाहेर आले नाही.

च्यायला संताप संताप व्हायचा नुसता...
तीच तरहा कंप्यूटर ची.
शाळेत असतांना कौतुकने कंप्यूटर विषय घेतला.
कमीतकमी कंप्यूटर बघायला तरी मिळेल ह्या आशेने.
पण तिथेही तेच. तो मास्टर प्रॅक्टिकल च्या वेळी सुद्धा वर्गात बसवून थेरी शिकवत बसायचा.
का ??? हा अन्याय का ?? हे मला आज पर्यंत समजलेले नाही.

आज मी सॉफ्टवेर इंजिनियर झालो...अगदी पोस्ट ग्रॅजुयेशन सुद्धा केले कंप्यूटर मधे मी.
पण शाळेने काही हातभार लावला असे म्हणता येणार नाही मला..सॉरी..
हा पण त्या वेळी जर कंप्यूटर ला कमीत कमी हात जरी लावू दिला असता आमच्या मास्टरांनी तरी थोडी का होईना चालणा मिळाली असती.
पण नाही.
शाळेतील प्रत्येक वस्तू फक्त पाहण्यासाठी.....
फक्त बघत राहा...डोळे दुखे पर्यंत....पण ती मिळणार मात्र नाही.

मग मला फार चीड यायची.
किती वेळा सांगून झाले शिक्षकांना पण काही फरक पडला नाही.
आम्हाला हवे ते जर शिक्षक देत नाहीत तर आम्ही सुद्धा का म्हणून त्यांचे ऐकायचे ??
मग बंड पुकारले जायचे. फिज़िक्स च्या वेळी टेस्ट ट्यूब फोडल्या जायच्या.
वर्गात गोंधळ व्हयायचा. कवायतीच्या तासाला वेडे वाकडे व्यायाम केले जायचे.
बेंच कोरले जायचे. फळे उगाच रंगवले जायचे...खूप धिंगाणा व्हयायचा.

त्या मानाने आजची मुलं खरच नशिबवन आहेत.
काळाप्रमाणे शाळांनिही स्वताहाला बदलले आहे.
आता तर बालवाडी पासूनच हे लोक जाहिरात करतात - कंप्यूटर वैइगेरे, ए सी क्लासरूम...च्यायला मजा आहे.

आजही पि. टी किवा कंप्यूटर चे सर समोर दिसले तर वाटते की त्यांना ओरडून ओरडून विचारावे की सर का तुम्ही असा अन्याय केला आमच्यावर ?

आम्ही असे काय घोडे, गाढव मारले होते शाळेचे म्हणून हा सूड उगवला तुम्ही आमच्यावर ?

शाळेत असतांना संस्कृत ही भाषा शिकायला मला जिवावर यायचे.
मला नाही जमायचे ते - रामा रॅमो रामहा प्रथमा...द्वितीया...काही काही कळायचे नाही मला.
वीट यायचा शिक्षणाचा.
तेव्हा सुद्धा संस्कृत च्या मॅडम रोज समाचार घ्यायच्या माझा.
आले चुकुन तर ठीक, नाहीतर टोले...
यायचे काही नाही मला, म्हणून टोले ठरलेले.

अरे मान्य आहे की संस्कृत ही आपल्या देशाने सर्वांना दिलेली फार मोठी देणगी आहे...मान्य आहे.
पण मला नाही झेपत ती तर मी काय करू ?

आणि माझे आजपर्यंत संस्कृत न आल्याने काहीही अडले नाहीए.
मी किराणा दुकानात गेल्यावर - "त्वं किराणा देव्स्य" म्हणत नाही.
आणि जेवायला बसल्यावर - अहं खादामि म्हणत नाही.
ऑफीस मधे सुद्धा - अहं काम करश्यासे वैइगेरे म्हणत नाही....
मग काय फायदा त्याचा ??

मला कंप्यूटर मधे इण्टरेस्ट होता त्यावेळी...ते तर मला नाही दिले..मग माझ्या डोक्यावर काही ही आपटले तरी काही फायदा होणार आहे का ?
शेवटी माणसाची इच्छा ज्यात असेल तेच काम तो चांगले करू शकतो - हे एकमेव सत्य आहे.

मग मला ज्या वयात कंप्यूटर शिकायची तीव्र इच्छा होती त्यावेळी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र .. ई. ई. विषयांनी माझे जीवन कुरटडून टाकले अगदी.

त्यामुळे मला तरी वाटते की माणसाला खरच ज्याची गरज आहे त्याचे शिक्षण देणे त्याला महत्वाचे आहे.

मी बर्‍याच वेळा वाचले आहे की काही लोक अगदी दुर्गम भागात जाऊन त्यांना शिक्षण देतात.
सॉरी, पण मला नाही पटत ते.
तुम्ही आदिवासी लोकांना जर A,B,C,D... शिकवायला लागले तर त्यांना त्याचा काय फायदा ?
पण तेच त्यांना जर त्यांना भूगोल वैइगेरे शिकवले...जे त्यांना उपयोगी पडेल रोज च्या जीवनात , तर ते महत्वाचे आहे.
की जेणे करून दिशा कशी ओळखावी, पक्षांचे स्तलांतर म्हणजे काय...असले काही तरी शिकवले तर त्याचा त्यांना काहीतरी फायदा आहे. नाहीतर त्यांच्या समोर A,B,C,D.. चे डोकं फोडून काही फायदा नाही.

उदाहरणार्थ - जर जंगलात तुम्ही प्राण्यांसाठी शाळा सुरू केली तर विषय कुठले कुठले ठेवणार तुम्ही ?
कारण जर तुम्ही उडण्यासाठी चा विषय ठेवला तर वाघ सिंह त्यात नापास होतील...
आणि ताकदीचा विषय ठेवला तर पक्षी त्यात फेल होतील.
झाडावर चढायचा विषय ठेवला तर मकडाशिवाय जास्त कोणी पास होऊ शकणार नाही.

अशीच काहीशी अवस्था आपलीही आहे.
आपल्याला कशात इण्टरेस्ट आहे ह्याचा विचार करायला वेळचं भेटत नाही.
कारण एकदा आपण 5 वर्षाचे झालो की बालवदिपासून शिक्षण नावाचे भूत आपल्या मागे लागते.
आणि ते कमीत कमी 10 वी झाल्याशिवाय आपला पीछा काही सोडत नाही.

तो पर्यंत कुणीतरी नेमुन दिलेल्या किवा कोणीतरी ठरवलेल्या आभ्यासावर रट्टा मारुन पास होन्यावर आपण जास्त भर देतो.
त्यात काही जन पाठांतर छान असल्याने बोर्डत येतात...आणि काही जन त्या स्पर्धेत नापास होतात.
म्हणून आपण त्यांना "ढ़" म्हणणे चुकीचे ठरेल.

एखादा नापास झाला म्हणजे तो "ढ़" असे नाही.
असेही असु शकते की त्याचा इण्टरेस्ट दुसरीकडे असेल...आणि तो वाट पाहत असेल की कुणीतरी येऊन मला त्या विषयात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करेल.

आणि शाळेचे शिक्षण महत्वाचे असेलही पण खरे शिक्षण आहे ते जगात जगण्याचे.
शेवटी देवानेही पहिल्या माणसाला जेव्हा जन्माला घातले असेल तेव्हा कुठे पहिली, दुसरी होती.....तो ही अनुभवातूनच शिकत गेला असेल की नाही.
बस हा थोडा विचार करायचा मुद्दा आहे...बघा विचार करून थोडा.
आणि हो पण कुणी तुम्हाला भेटला की जो नापास झाला आहे तर कृपया त्याला "ढ़" समजू नका, सध्यातरी हीच विनंती आहे.

Gmail Down For sometime...



We do not see this normally...so I took screenshot when gmail was actually down.


Tuesday, April 14, 2009

निवडणुका आणि आपण

निवडणुका आल्या...
आणि ह्यांची फक्वेगिरी सुरू...
असले डोके पिकले आहे म्हणून सांगतो...
च्यायला, सर्व साले हरमखोर आहेत...
काय एकमेकांवर आरोप चालू आहेत वा वा..
छान प्रतिमा ठेवताहेत तुम्ही देशा समोर.
एक म्हणतो पंतप्रधान दुबळा....दुसरा म्हणतो मला हे म्हणणारा कुठे गेला होता कंधार हाइजॅक च्या वेळी...
अरे बस करा रे ही फालतू गिरी...
च्यायला स्वतहाचे भांडं विसरून जरा देशकडे बघा जरा.
सल्यांनो तुम्ही देशाची दशा आधीच बिघडावून ठेवली आहे आणि आता काय बोंबाबोंब चालू आहे ?
काही लाज तरी ठेवा..माहिती आहे मला राजकारणात आल्या पासून ती सुद्धा विकली आहे.

लोकांची मतं मिळवण्यासाठी काय वाटेल ते करतील हे.
एक जन जय हो चे गाणे कॉपीराइट घेऊन वापरतो आणि दुसरा त्याची मोडतोड करून वापरतो.
ए. आर. रेहेमान ने ते गाणे तुमच्या सारख्या फालतू माणसांसाठी नाही लिहिले.

सगळीकडे साला ह्यांचाच प्रचार.
निवडून आल्यानंतर काय उखडून घेणार आहात तुम्ही ??
ह्यांच्या सारखे नालायक लोक अजुन पर्यंत पैदा झाले नव्हते कधी.
तो लालू इतका भ्रष्टाचार करून सुद्धा वर तोंड करून फिरतो आहे.
त्याचे काय उखडून घेतले तुम्ही सर्वांनी ?
संसद भवन वर हल्ला करणर्‍याचे काय उखडून घेतले तुम्ही ?
लांब कशाला, त्या कसब चे काय उखाडले तुम्ही ?
आम्ही भरलेल्या इनकम टॅक्स च्या जिवावर त्याला खाऊ पिवू घालताहेत ना ?
नीट काळजी घ्या हा त्याची...उगाच बिछार्याला सर्दि खोकला होईल.

त्या शरद पवारचा तर पंतप्रधान होण्यासाठी काय जीव चालला आहे काय माहिती.
रोज कुठल्या ना कुठल्या पक्षाचा उंबरठा झीजावत असतो तो.

हे साले निवडणूक आली की गरीबा सारखे मतं मागणार..आणि नंतर बॅंक भरणार.
बरं निवडणुकीला उभे कोण रहातात ?
गल्ली बोळतील ह्या आणि अशाच पक्षचे लोकं.
त्यांना मत नाही द्यायचे तर मग कुणाला द्यायचे मग आपण ??
कारण आपल्या समोर ऑप्षन असायला हवा ना ??

इथे लोक 2 वेळ चे जेवायचे कसे मॅनेज होईल ह्याचा विचार करतात आणि हे हारामखोर पैसे खातात.
बरं खातात तर खातात किती ??? काही लिमिट ??
ह्यांचा बॅंक बॅलेन्स ऐकून आपल्याला घाम फुटतो.
आमचा पगार कमी असला तरी साला इनकम टॅक्स किती भरावा लागेल ह्याच विचारणे घाम फुटतो...
आणि हे बघा...बिंदास डिक्लेर करतात...400-500 कोटी संपत्ती....

तुम्हाला माहिती नसेल कढचीत म्हणून सांगतो.
निवडणूक लढवतांना आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याचा तपशिल द्यावा लागतो.
आता मला सांगा..एखाद्या कडे निवडणूक लढविण्या आधी 100 रुपये असतील आणि नंतर पुढे त्याच्या कडे 1000000 रुपये असतील तर साहजिक आहे की त्याचा 1 तर पगार इतका नाही.
म्हानुजे त्याने नक्की पैसे खाल्ले असणार...
ही गोष्ट माझ्या सारख्याला समजते पण त्या पक्षा मागे धावणार्या लोकांना समजत नाही.
तुम्हाला ह्या लोकांची गंमत सांगतो..पैशा साठी कुठल्या थराला जातील हे बघा...
आमच्या जुन्या घरच्या, जुन्या म्हणजे अगदी मी शाळेत असतांनाच्या, एरिया मधे एक नगर सेवक राहायचा.
त्याने निवडून आल्या नंतर इतका पैसा खाल्ला की त्याला तो नंतर लपावणे ही कठीण होऊन बसले.
बर इतका पैसा खाऊन त्याचे समाधान होईल तर तो राजकारणी कसला ?
5 वर्ष खा खा पैसा खाल्ला...पण नंतर पुढे आमचा वार्ड महिला आरक्षित झाला.
तर त्या थोर पुरुषाने त्याच्या बायकोला उभे केले.

ज्या बायकोला तो रोज तुडव तुडव तुडवायचा तिला जनतेची सेवा करायला उभे केले.
ज्या बाई चे घरात तिचा नवरा ऐकत नाही, ती जनतेची सेवा करणार का ?
आणि अशा बाई ला तिचा नवरा तिचा असा 1 तरी निर्णय घेऊ देईल का ?
अरे लाज वाटली पाहिजे .. बर आख्ख्या गावाला माहिती की हा बायको ला तुडवतो तरी त्याच्या प्रचाराला ही गर्दी.....
लोकं पण फार भिकारी बाबा...पैसे मिळाल्यास काय वाटेल ते करतील.

कॉंग्रेस ची एक आड पहिली ..
एक शेतकरी सांगत असतो...की कॉंग्रेस ने माझे कर्ज माफ केले म्हणून मी माझे मत त्यांनाच देणार.
अरे वा..छान आहे म्हणजे. कर्ज माफ करायला सोनिया बाई ला काय जमीन उपसावी लागली की डोंगर खोदावा लागला ?
नियम बनवणारे हेच आणि आमलत आणणारे हेच. मग काय ... नुसता नांगा नाच.


प्रत्येक पक्ष आपापले काही ना काही (कळीचे) मुद्धे घेऊन रिंगणात उतरला आहे.
मी काही कुन्या एका पक्षा ची बाजू घेणार नाही किवा मला तसे काही करण्यात काही हौस ही नाही.
पण मी तुम्हाला ह्या ब्लॉग द्वारे विनंती करू इच्छितो की प्लीज़...आता तरी सुधरा.
भ्रष्ट आणि नालायक लोकांना मतं देऊ नका.
मत देण्या आधी नेत्याच्या नावावर कुठला गुन्हा आहे की नाही ते जरूर पहा...कारण गुन्हेगार नेता मारझोड करण्या शिवाय काहीही करू शकत नाही.
आणि हो त्याचे शिक्षण पण पहा.

लक्षात ठेवा...हे लोक आपले मालक नाहीत...आपले सेवक (नोकर) आहेत.
आणि निवडून आपण त्याला आपल्या देशाची काहीतरी प्रगती होण्यासाठी देतो...निवडून आल्यावर भरपेट पैसे खाण्यासाठी नव्हे.

दरवेळी कुणीतरी निवडून येणार.
मग तो त्याचे घर प्रशस्त बांधणार...
आपल्या नातेवाईकांना मोठ्या पगाराच्या नोकर्‍या लावणार...
घरच्यांच्या नावावर लाखो-करोडो रुपये ठेवणार...
आलिशान गाडीतून फिरणार..
आपल्या सहकार्यांचे खिसे सुद्धा भरणार...
5 वर्षात 50 वर्षाची कमाई करणार..
आणि ऐशोारमात राहणार...

पण आपण ????
रोज सकाळी उठून तीच तीच महागाई वाढली ची तक्रार करणार ....
त्याच छप्पर नसलेल्या बस स्टॉप वर उभे राहणार...
हजारो खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालणार...
आणि आता आहोत तसेच जगणार........
पण आपण जर आता नीट उमेदवारला वोट दिले तर ही परिस्थिती आपण बदलू शकतो..
सच्चे को चुनीये..अच्छे को चुनीये

तेव्हा विचार पक्का आणि भ्रष्ट नेत्याच्या तोंडावर बुक्का....

जय हिंद.

Monday, April 6, 2009

विचार बदला..

मी आज एका नातलगकडे गेलो होतो.
कसलिशी पूजा होती त्यांच्या कडे म्हणून मला बोलावण्यात आले होते.
मी गेलो.
त्यांचे घर एकदम प्रशस्त. टुमदार बंगलाच होता.
मी माझी गाडी पार्क केली तोच त्यांच्या घरातून धुराचा लोट च्या लोट बाहेर पडत होता.
मला थोडे टेन्षन आले पण पहिले तर काय ?? तिकडे होम चालू होता.

जवळपास 8-10 ब्राम्हण जोर जोरात मंत्र म्हणत होते.
मला सांगण्यात आले की ही पूजा 3 दिवस चालते.
मी म्हटले छान.
मग मी जाऊन एका कोपर्‍यात बसलो. मी त्यांची मजा पाहत होतो.
थोडे मंत्र म्हणून ब्राम्हण ऑर्डर द्यायचे, "1 मोठं भांड भरून शुद्ध तूप आणा..."
लगेच सगळीकडे धावाधाव...
सर्व जन तूप आणण्यासाठी पाळायचे.
मग नंतर फुलं...अगरबत्ती...काय वाटेल ते मागणी व्हयायची. आणि सर्व जन नुसती पळापळ करायचे.
मी मजा पाहत होतो.

इतक्यात एक भिकारी तिथे आला. साधारण 70-80 वय असेल त्याचे.
कपडे फटके घालणार्‍याला साधारण आपण भिकारी म्हणतो...म्हणून मी भिकारी म्हणालो.
एकदम सुकलेला होता तो. जणू काही जगण्याची इच्छा संपलेला.
त्याने पहिले की इथे पूजा चालू आहे म्हणून तो दारा बाहेर बसला काहीतर मिळेल ह्या आशेने.
त्याला घरातल्या काही मंडळींनी पहिले.
पुजेत कशाला हे विघ्न म्हणून त्यांनी त्याला हुसकावून लावले.
मला फार संताप आला.
तो बिचारा कसला विघ्न ???
तो तर तिथे शांत बसला होता. त्याने एका शब्दानेही काही अजुन मागितले सुद्धा नव्हते.
आणि त्या होमा मधे 2-4 बादल्या तूप ओतण्यापेक्षा त्या गरिबाला किमान एक पोळी तरी दिली असती.
जिवंत माणसाचे हाल करून देवाला पूजन्यात काय धर्म आहे ?
फक्त कुणी एक ब्राम्हण सांगतो म्हणून हांडे च्या हांडे वाया घालवणे मला पटत नाही.
इतका संताप संताप झाला म्हणून सांगू.
मी सरळ उठलो आणि पूजा आणि जेवण न करताच तिथून निघून गेलो.
मला नाही जमत असला भोंदु पणा.

तुम्हाला जर खरच देवाला प्रसन्न करायचे असेल तर असल्या पूजा करण्यापेक्षा सरळ जाऊन एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन त्याना काहीतरी करा.
एखाद्या शाळेत जाऊन गरीब मुलांना वह्या पुस्तक वाटा.
एखाद्याला रक्त दान करा...अशा आणि आणखी बर्‍याच प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात.

मला पर्वा नाही की तुम्ही काय म्हणाल ते.
I just don't care... because I know i am not talking something weird.
युगानुयूगे जे चालत आले आहे ते थोडे तरी बदलायला हवे आहे.
We can not follow each and everything blindly.

भगवान श्री कृष्ण सुद्धा सांगतात, की प्रत्येक माणसमधे देव आहे.
मग आपण त्याची पूजा का नाही करत ?
जे लोक फार देव देव करतात त्यांनी आयुष्यात नक्कीच फार पाप केलेले असते.
ते लपवण्यासाठी हे लोक देव देव करतात.
जर आपण स्वटहाशी प्रामाणिक राहिलो आणि दुसर्यांना त्रास होणार नाही असे वागलो तरी देव प्रसन्न होईल.
त्यासाठी 4-4 दिवस पूजा करण्यात काहीच अर्थ नाही.
आणि पूजा करून मन शुद्ध होत नसते. त्यासाठी विचार बद्लावे लागतात.
विचारांनी मन पवित्र असले की देव आपोआपच प्रसन्न होतो.
त्यासाठी 10-10 किलो तूप आणि उगाच पैसे वाया घालवायची गरज नाही.
तेव्हा समोरच्या माणसाला मदत करा...देव नक्की प्रसन्न होईल.

Friday, April 3, 2009

Why google is so successful ???

आज एक बकवास वेबसाइट पहिली..
म्हणजे बर्‍याच दिवसापासून माहिती आहे मला ती वेबसाइट.
आज न्यूज़ मधे वाचलं की गूगल विकत घेणार आहे म्हणे ती साइट.
FUCK OFF ....

च्यायला त्या साइट मधे काहीच नाहीए..पण मग ती इतकी फेमस कशी झाली ?
तुमच्या आमच्यामुळेच हो...
सध्या सर्वांना टाइम पास हवा आहे.
इंटरनेट आज जवळपास सर्व घरांमधे आहे..पण त्याचा उपयोग काय होतो आहे, आपण ते कशासाठी वापरतो आहे ह्याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही.
मग ते ओर्कुत असो नाहीतर फेसबुक .. सर्व लोक नुसता टाइम पास करतांना दिसतात.
काही फायदा होत नाही ह्या साइट नी...हा साइट वाले पैसा मात्र छान कमावतात.

आधी गूगल मला ग्रेट कंपनी वाटायची, पण आता नाही.
गूगल एक मोनॉपली तयार करत आहे.
गूगल चे स्वतहाचे असे डेवेलप केलेले प्रॉडक्ट म्हणजे फक्त जाहिराती चे ज्याला आपण गूगल Ads म्हणतो.
त्यानंतर गूगल मॅप वैइगेरे नंतर आले..पण सर्वात प्रथम गूगल Ads होते फक्त.

मध्यंतरीच्या काळात गूगल ने मस्त डोके वापरले.
त्यांनी मार्केट चा आढावा घेतला आणि कुठल्या अशा साइट आहेत ज्या जास्त चालतात, अशा शोधून काढल्या.
आणि पुढे जाऊन त्या विकत घेतल्या.
ह्या मधे गूगले ने काय केले ???? तर फक्त ती कंपनी किंवा त्या कंपनी चे प्रॉडक्ट विकत घेतले.
त्याला आपल्या नावाचा शिक्का लावला आणि परत तेच प्रॉडक्ट गूगल च्या नावाने बाजारात आणले.

तुम्ही जर आज पहिले तर आज जवळ पास बर्‍याच वेबसाइट्स गूगल ने हव्या तेवढ्या पैशांना विकत घेतल्या आहेत.
त्या उलट माइक्रोसॉफ्ट ला हे जमले नाही..बिल गेट्स मागे पड्न्याला हेच कारण आहे.
त्याने माइक्रोसॉफ्ट मधे स्वताहा सर्व निर्माण केले. त्याने कधी कुठल्या कंपनी ला ओवर्टेक करायचा प्रयत्न केला नाही. (निदान सुरवातीच्या काळात).
तो फक्त विंडोज सॉफ्टवेर डेवेलप करत राहिला...आणि गूगल ने त्याच्या मागून फक्त 10 वर्षात त्याच्या पुढे जाण्यासाठी मार्ग शोधून काढला.

तुम्ही नीट पहाल तर तुम्हाला ही हे जाणवेल की गूगल ही कंपनी "सावकार" असतो ना त्याच्या सारखी आहे.
हे सावकार सुद्धा पहा... खेड्यात जाऊन तिकडच्या लोकांकडून त्यांच्या वस्तू कमी पैशात विकत घेतात.
आणि शहरात जाऊन त्याच वस्तू जास्त पैशांना विकतात...काहीसे असेच गूगल करत आहे.
अशाने वेबसाइट किवा प्रॉडक्ट बनवणारे मात्र थोड्या पैशात खुश होतात आणि गूगल आपला पसारा आणखीनच वाढवत जाते.
म्हणून गूगल ला मोठे करण्यात आपणही जबाबदार आहोत...समजले का ?

गूगल ची अजुन एक गंमत सांगाविषी वाटते.
गूगले मधे सर्व कामगार ( इंजिनियर) लोकांना 3 किवा 6 महिन्यात एक प्रॉजेक्ट कंपल्सरी करावा लागतो.
कशासाठी ?? आरे मूर्खांनो...हेच तर..हेच काळात नाही तुम्हाला.
असे वर्ष भरातले सर्व प्रॉजेक्ट एकत्र करून गूगल मग त्यातले टॉप 10 प्रॉजेक्ट काढतो.
आणि मग त्यातला सर्वात छान कॉन्सेप्ट असलेला प्रॉजेक्ट मग गूगल च्या नावावर लॉंच करतो.
हा ज्याची ती कॉन्सेप्ट असते त्याला काही तर बक्षिश मिळते पण जास्त फायदा कुणाचा होतो ???
गूगल ला काही ही न करता रेडीमेड कॉन्सेप्ट आणि प्रॉजेक्ट मिळतात.

बाकीच्या कंपनी मधे डिसिशन हे वरच्या लोकांकडून खालच्या लोकांकडे येतात.
पण गूगल मधे कॉन्सेप्ट ही खालची मंडळी वरच्या लोकांना रेडीमेड देतात.

आणि हेच कारण आहे की ज्यामुळे गूगल आपल्या इंजिनियर ची खूप काळजी घेते.
त्यांच्या साठी काय हवे नको ते सर्व पाहते. आणि म्हणूनच गूगल ही काम करण्यासाठी सर्वात उत्तम कंपनी म्हणून मानली जाते.

पण या सर्वात असे नाहीए की गूगल काहीच काम करत नाही.
करते पण जास्त करून टेकोवर करण्यात तिचा जास्त इण्टरेस्ट आहे असे वाटते.

अभी समझा ??? Why google is so successful ???

Tuesday, March 31, 2009

Ajay Atul : My Fav Marathi Musicians

अजय - आज आपण दोघंही संगीतकारांची जोडी म्हणून लोकप्रिय झालो आहोत; पण एकेकाळी तुला अभिनयामध्ये आवड होती ना?
अतुल - आवड होती म्हणण्यापेक्षा मला माहीत होतं, की मला कोणत्या गोष्टीत गती आहे. एखाद्या गोष्टीत यश मिळालं, कोणी पाठ थोपटली, की मला त्या गोष्टीची प्रेरणा मिळायची. "सकाळ' वर्तमानपत्राच्या नाट्यवाचन स्पर्धेत "हिमशुरू' नावाच्या एकांकिकेचं मी वाचन केलं होतं. तेव्हा वृत्तपत्रात माझं नाव झळकलेलं पाहून मी कमालीचा खूश झालो होतो. त्यानंतर मला अभिनयाचं बक्षीसही मिळालं होतं. आपण अनेक गोष्टी कराव्यात, असं मला वाटायचं. अभिनय करावा असं वाटायचं आणि अजूनही वाटतं.

अजय - म्हणजे आता तू अभिनयही करणार आहेस की काय?
अतुल - अरे, अभिनयच काय; पण दिग्दर्शनही करायची माझी इच्छा आहे. पण संगीतकाराच्या कामातून वेळ मिळायला हवा ना!

अजय - मला आठवतंय, तुला शाळेत असताना गणित, भूगोल हे विषय आवडत नव्हते, बरोबर ना?
अतुल - अजिबातच आवडत नव्हते ते विषय मला. खारे वारे, मतलई वारे शिकून करायचंय काय असं मला वाटायचं. गणिताचा तर मला कंटाळाच यायचा. पण बॅंड पथकात तर मी कायम पुढे असायचो. मराठी कविता आणि इतिहास या गोष्टींची मला खूप आवड होती. मी रोज शाळेतली प्रार्थना म्हणायचो.

अजय - लहानपणी तू तर खूपच लुकडा होतास; मग तुला एनसीसीमध्ये घेतलंच कसं?
अतुल - त्याचं एकमेव कारण म्हणजे म्युझिक. माझा आवाज एकदम पहाडी होता. ऑडिशनला "हवासिंग' नावाचे एक मेजर आले होते. त्यांनी तर सर्वांची ऑडिशन घेतली आणि माझा पहाडी आवाज पाहून ते प्रचंड खूश झाले होते. अशा रीतीने माझी निवड झाली.

अजय - एनसीसीमध्ये गेल्यानंतर तुझ्या बारकुडेपणामुळे तुला काही गमतीदार अनुभव आले का?
अतुल - अरे, मी खूप बारीक असल्यानं माझ्या मापाचे बूटच मिळत नव्हते. पी.टी.च्या शूजवर मी परेड करायचो. शेवटी माझ्या मापाचा ड्रेस मी स्वतः शिवला होता. त्या पन्नास जणांच्या विद्यार्थी समूहात माझा ड्रेस वेगळा दिसायचा. पण माझ्या "डेडीकेशन' या प्लस पॉईंटमुळे आणि ऑर्डर देण्याच्या पद्धतीमुळे मला "सार्जंट'चं पद मिळालं आणि मी पूर्ण एनसीसीमय झालो.

अजय - दहावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वर्ष असतं आणि तू प्रिलीमला गणिताच्या पेपरात चक्क चित्रं काढली होतीस ना?
अतुल - गणित म्हटलं की माझा छत्तीसचा आकडा. ते आकडे बघून मला झोप यायची. प्रिलीमला गणिताच्या पेपरातलं मला काहीच येत नव्हतं. मी चित्रं काढून ठेवली पेपरात. आई पेपरचे मार्क विचारायची. तेव्हा मी खोटं सांगितलं, की मी पेपर संपूर्ण सोडवलाय; पण सरांनीच गुण दिले नाहीत. तेव्हा आई शाळेत आली. सरांनी तो चित्रमय गणिताचा पेपर आईला दाखवला. मग काय, घरी आल्यावर बेदम मार खावा लागला.

अजय - अतुल, हा जरा अतीच बेशिस्तपणा झाला. पण मग तुझ्या आयुष्याला शिस्त लागली की नाही?
अतुल - मी शाळेत व्रात्य होतो हे खरं आहे. पण मला शिस्त लावण्यात वाटा आहे तो एनसीसीचा. मी सार्जंट झालो, तेव्हा मला इतर मुलं "फॉलो' करणार याची जाणीव झाली आणि मग हळूहळू तो व्रात्यपणा कमी होत गेला.

अजय - तू आयुष्यात पतंग कधीच उडवला नाहीस; पण विमान उडवलं होतंस ना?
अतुल - आपल्या शाळेचा सुवर्णमहोत्सव होता, तेव्हाची गोष्ट आहे. त्यानिमित्तानं पॅरा-ग्लायडिंगच्या प्रात्यक्षिकांसाठी माझी निवड झाली होती. माझं पायलट होण्याचं स्वप्न होतं. त्या प्रात्यक्षिकांमुळे मिनी-पायलट होण्याचं माझं स्वप्न साकार झालं.

अजय - पण विमानाचं तुला अजूनही आकर्षण आहे ना?
अतुल - हो तर! पण आता ते आकर्षण मी संगणकाच्या माध्यमातून जपत असतो. विमानं मला कायमच आकर्षित करतात. संगणकावर "हाय सिमिलेटर' हा गेम मी तासन्‌ तास खेळत असतो.

अजय - आपण या इंडस्ट्रीत यायला नेमकं काय केलं, आठवतं?
अतुल - अजय, आपल्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे बदल्या व्हायच्या. त्यामुळे शिरूर, राजगुरुनगर असा आपला प्रवास सुरू होता. मला आठवतंय, मी नववी-दहावीत असताना "पाहिजेत' या शीर्षकाखाली "कलाकार पाहिजेत' या आशयाच्या जाहिराती खूप यायच्या. मी तिथे जायचो; पण मग तिथे गेल्यावर लक्षात यायचं, की पेपरात दिलेले ते सर्व पत्ते खोटे असायचे. पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूट कुठे आहे हे पाहायला आईनं मला त्याकाळी एकट्याला काही पैसे देऊन पाठवलं आणि जवळ जवळ दोन तास मी तो पत्ता शोधत बसलो होतो.

अजय - पण मग नेमकी करिअरची दिशा कशी सापडली?
अतुल - जेव्हा आपण पुण्यात आलो, तेव्हा तिथल्या स्थानिक ग्रुपबरोबर लोककलेच्या कार्यक्रमात वादक, गायक, नर्तक म्हणून सहभागी झालो. काही ना काहीतरी ऍक्‍टिव्हिटी अशा कार्यक्रमातून सुरू राहिली. मग ओळखी वाढल्या आणि संगीत क्षेत्र हे करिअरसाठी योग्य असल्याची जाणीव झाली.

अजय - आपल्या पहिल्यावहिल्या रेकॉर्डिंगबद्दल सांग.
अतुल - तेव्हा तर स्टुडिओ कसा असतो, हेडफोन्स का लावतात, रेकॉर्डिंग कसं होतं हेदेखील माहीत नव्हतं. बारा गाण्यांना आपण दोघांनी संगीत दिलं होतं. फक्त चार हजार रुपये बजेट होतं. स्टुडिओची रचना वगैरे या गोष्टीही नवीन होत्या. ते रेकॉर्डिंग झाल्यावर आपल्या दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं होतं.

अजय - आपण पहिला की-बोर्ड खरेदी केला, तेव्हाची आठवण लक्षात आहे का?
अतुल - आपल्याकडे तेव्हा कुठलंच स्वतःच्या मालकीचं वाद्य नव्हतं. की-बोर्डसुद्धा आम्ही भाड्यानं आणत होतो. शेवटी आपण ठरवलं होतं, की स्वतःचा की-बोर्ड खरेदी करूया. पण त्या की-बोर्डची किंमत होती, "एक लाख पाच हजार' रुपये. काही जणांकडून पैसे उसने घेतले, लोन काढलं. पहिल्यांदा आपण "एक लाख' रुपये प्रत्यक्षात बघितले होते. मुंबईला आपण सर्व तो की-बोर्ड खरेदी करायला गेलो होतो, हे कसं विसरू शकेन मी?
अजय - पण एक प्रश्‍न पडतोय, की आपल्याला परवडतं ते घेण्यापेक्षा जगातलं सर्वोत्तम जे, तेच खरेदी करावं, असं तुला का वाटतं?
अतुल - प्रवाहात जे चालू आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, असं मला वाटतं. सगळं दर्जाचंच असावं, हा माझा आग्रह असतो. कारण प्रगत तंत्रज्ञान खरेदी केलं की त्याचे फायदेही निश्‍चितच जास्त असतात. कुठल्याही गोष्टीतला "पायंडा' हा आपल्यापासून सुरू व्हावा, असं मला वाटतं. आपण चाकोरीबद्ध विचार करण्यापेक्षा चाकोरीबाहेरचा विचार करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

अजय - तुझी मैत्री तुझ्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांशी पटकन्‌ कशी काय होते?
अतुल - ज्यांच्याकडून मला काही ना काही तरी चांगलं शिकायला मिळतं, अशांबरोबर मैत्री करायला मला आवडते. माझा स्वभाव एखाद्याशी पटकन्‌ मैत्री करणारा आहे. मला इतरांचे अनुभव, विचार ऐकायला आवडतात.

अजय - पुणे-मुंबई ए.सी. बसनं प्रवास करताना तिकीट खरेदी करूनही तू ड्रायव्हरच्या शेजारी का बसायचास?
अतुल - मला गाड्यांची खूप क्रेझ आहे, ड्रायव्हिंगची क्रेझ आहे. मला ड्रायव्हिंग उत्तम येऊ शकतं, याची जाणीव मला कधीच झाली होती. पुणे-मुंबई प्रवासात माझी ड्रायव्हरशी पटकन दोस्ती होऊन जायची. गाड्यांचं मला खूप आकर्षण आहे. माझ्या आयुष्यातील "टॉप फाइव्ह' गोष्टीत कार्सना एक स्थान आहेच.

अजय - तुला वाचनाची आवड कशी लागली?
अतुल - याचं सर्व श्रेय आपल्या आईला आहे. वाचनाची सवय मला आईनंच लावली. लायब्ररीतून माझ्याकरिता ती छान-छान पुस्तकं घेऊन यायची. बसल्या-बसल्या ज्ञानाचा प्रचंड खजिना देतात ती ही पुस्तकं! आजही प्रवास करताना चार-पाच पुस्तकं मी जवळ ठेवतोच.

अजय - तुझे आवडते लेखक?
अतुल - पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे आणि विश्‍वास पाटील.

अजय - विश्‍वास पाटील यांच्याबरोबर तू रायगडावर गेला होतास ना?
अतुल - तो अनुभव तर अविस्मरणीयच आहे. आपण महाडला एका हॉटेलात उतरलो होतो. विश्‍वास पाटील पहाटे आपल्याला उठवायला आले आणि म्हणाले, "काय, रायगड चढायचाय ना?' मनात प्रचंड उत्साह संचारला होता. रायगडच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत जाताना विश्‍वास पाटील प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या आठवणी जागृत करीत होते. रायगडाबद्दल शाळेत जे वाचलं होतं, ते आठवलं. लहानपणी रायगड पहिला होता ते आठवलं आणि आता सर्व इतिहास जागृत झाल्यासारखं वाटलं आणि गडावर पोचल्यावर तर काय, राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "ई टीव्ही'साठी चित्रीत होणाऱ्या सुसंवादातून आनंददायी पर्वणीच अनुभवली होती.

अजय - अजय-अतुल हे नाव भविष्यात कुठे असावं, असं तुला वाटतं?
अतुल - आपण सतराशे साठ गोष्टी करण्यापेक्षा तेवढ्याच गोष्टी करूया की ज्या त्या क्षेत्रातील "माइल स्टोन' ठरतील. पाचशे चित्रपटांना संगीत द्यायचं आणि त्यातले पन्नासच लोकांनी लक्षात ठेवायचे, अशी आपली ओळख कधीच नसावी. त्यापेक्षा भलेही आपण पन्नासच चित्रपट करू; पण तो प्रत्येक चित्रपट लोकांच्या लक्षात राहणारा ठरेल. फक्त संगीतच नव्हे; तर ज्या-ज्या क्षेत्रात आपण जी जी कामगिरी करू, ती लोकांच्या कायम स्मरणात राहायला हवी.

अतुल - अजय, लहानपणी तू स्वतःला अंडर-एस्टीमेट का करायचास?
अजय - मी पटकन्‌ खूप गप्पा मारत नाही. लहानपणी माझ्यात आत्मविश्‍वासाचा थोडा अभाव होता. अमुक एक गोष्ट मला जमेल का, "हे नको रे, ते नको रे' असा माझा ऍटिट्यूड होता. शिवाय मी धाकटा असल्यानं मला ओरडा खायला लागायचा. मग मी शांतच होत गेलो.

अतुल - शांत होत गेलास की स्वतःला शोधत बसला होतास?
अजय - मी खरं तर त्या वेळी "बंद'च पडलो होतो, असं म्हण. कारण "शोधणे' ही एक प्रक्रिया आहे. ती सुरू व्हायला एक "कीक' लागते. स्वतःला सापडण्याचा एक दिव्य क्षण असतो. तो क्षण यायला नेमकी वेळ यावी लागते.

अतुल - तुझ्या आयुष्यातला तो क्षण नेमका आला कधी?
अजय - तो क्षण मी शोधू शकलो तो म्युझिकमुळेच. संगीतकलेनंच मला योग्य तो आधार दिला. पुण्याला आल्यावर तो सूर खऱ्या अर्थानं सापडला. मग संधी मिळत गेली. माझ्यातला "मी' मला सापडला. मग मागे वळून कधी पाहावंच लागलं नाही.

अतुल - तुझ्या जिवावर बेतलेल्या प्रसंगातून आयुष्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा बदलला?
अजय - असं तीन वेळा घडलंय. मी अगदी तान्हं बाळ असताना खूप आजारी होतो तेव्हाही मी वाचलो. त्यानंतर मला एकदा आईनं कडेवर घेतलं होतं आणि एका गाईनं धक्का मारल्यामुळे मी खाली पडलो. मला खूप मार लागला होता; पण मी बचावलो. त्यानंतर एकदा गाडीतून प्रवास करताना मी खाली उतरलो. समोरून ट्रक आला. आमच्या गाडीला धडक दिली. त्या अपघातात माझ्या डोळ्यादेखत आपला चुलतभाऊ मरण पावला. एवढ्या भीषण अपघातात मी अगोदर खाली उतरल्यामुळे वाचलो. माझा देवावर प्रचंड विश्‍वास आहे. मी वाचलो म्हणजे माझ्या हातून भविष्यात काहीतरी निश्‍चित चांगलंच घडणार आहे, असा ठाम विश्‍वास माझ्या मनात निर्माण झाला आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीतूनच बघायचं, हा विचार आला.

अतुल - तुला आलेल्या पहिल्या प्रेमपत्रामुळे तुझी चांगलीच फजिती झाली होती ना रे?
अजय - तेव्हा आपण "खेड'मध्ये राहत होतो. मी दहावीत होतो. त्या काळात "खेड'सारख्या एका गावात मुलगा आणि मुलगी बोलतात, हेदेखील "फार' होतं. सातवीतली एक मुलगी काहीतरी निमित्त काढून आपल्या घरी येऊ लागली होती. ती घरी आली की मी मात्र निमूटपणे निघून जात होतो. एकदा तर त्या मुलीनं धाडस केलं. दहावीचं "बेस्ट ऑफ लक' देण्याच्या निमित्तानं ती आपल्या घरी आली आणि तिने चक्क गुलाबाचं फूल आणि एक पत्र माझ्या हातात दिलं. ते आईनं बघितलं. मी ते पत्र न वाचताच आईकडे सुपूर्द केलं. पण या प्रकरणात माझी काहीही चूक नव्हती. त्यामुळे आई मला ओरडली नाही. त्या मुलीचं आपल्याकडे येणं मात्र बंद झालं.

अतुल - मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असल्याने शाळेत असताना तुला या गोष्टीचा फायदा झाला की तोटा-
अजय - थोडा तोटा आणि जास्त फायदा. कारण तू शाळेत व्रात्य असल्यामुळे "गोगावले अतुल'चा भाऊ ना, म्हणजे तो व्रात्यच असणार, अशी सुरुवातीला माझी इमेज झाली होती. पण मी व्रात्यपणा करीत नाही, हे लवकरच सर्वांना जाणवलं. तुला असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आवडीमुळे मलाही कलेची आवड असणार, हेदेखील गृहीत धरलं गेलं आणि मला तो फायदाच झाला. तू एनसीसी सार्जंट होतास, मी वर्गातला मॉनिटर होतो. मलाही एनसीसीमध्ये थेट प्रवेश मिळाला. सकाळची प्रार्थना मी म्हणायचो. तू एनसीसीचं ड्रील मला घरी आधीच शिकवलंस. हे सगळे तुझ्या "दादा' असण्याचे मला झालेले फायदे आहेत.

अतुल - आपण करिअरसाठी जेव्हा मुंबईला अप-डाऊन करू लागलो होतो, तेव्हा आई-बाबांच्या पाया पडताना तू का रडायचास?
अजय - अतुल, तू जसा बिनधास्त होतास ना, तसा मी नव्हतो. शिवाय आई-वडिलांना सोडून मी एकदा दूर असा राहिलोही नव्हतो. मी खूप इमोशनल आहे. मुंबई हे मोठं शहर, आपण आधी खेडेगावातून तिथं जाणार, अशा संमिश्र भावनांमुळे; तसंच मुंबईत करिअरची संधी मिळणार, याच्या आनंदानंही डोळे भरून यायचे माझे!
अतुल - घरच्यांना न सांगता तू नदीवर पोहायला कसा शिकलास?
अजय - मी पोहायला शिकावं अशी माझ्या मित्राची इच्छा होती. गावात नदीवर कंबरेला डबा बांधून माझ्या मित्रानं मला पोहायला शिकवलं. आपण बुडणार नाही, याची खात्री झाल्यावर मला पोहणं जमू लागलं. घरी न सांगता मी गुपचूपपणे नदीवर पोहायला जाऊ लागलो. मी तुझ्या मदतीशिवाय केलेली आणि लहानपणी शिकलेली गोष्ट म्हणजे "पोहणे'.

अतुल - तू कोरसमध्ये गातोस, तेव्हा तुला काय वाटतं?
अजय - मी कोरसमध्ये गातो, याची मला अजिबात लाज वाटत नाही. पुण्यात आपण असतानाही मी कोरस गायचो. आज आपण संगीतबद्ध केलेल्या "कोरस'मध्येही मी गातोच! "झील' नावाचा जो प्रकार आहे, तो मी शिकलो ते त्या काळात कुणाची तरी कॉपी केल्यामुळेच.

अतुल - इतर संगीत-दिग्दर्शक तुला जेव्हा "गायक' म्हणून बोलावतात, तेव्हा कसं वाटतं?
अजय - चांगलंच वाटतं. एक संगीतकार जेव्हा दुसऱ्या संगीतकाराला "गायक' म्हणून बोलावतो, तेव्हा त्या संगीतकाराबद्दल मला खूपच आदर वाटतो. मी जे गाऊ शकतो, ते मी संगीतकार असल्यामुळेच. एका संगीतकाराला एखाद्या गायकाकडून नेमकं काय हवं असतं, हे मी जाणू शकतो, ते मी एक संगीतकार असल्यामुळेच. मला "संगीतकार' म्हणून जे कळतं, ते देण्याचा, ते त्या संगीतकाराच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊन त्या पद्धतीनं गाण्याच्या माध्यमातून मी व्यक्त करतो.

अतुल - तू की-बोर्ड वाजवायला कसा शिकलास?
अजय - मला बासरी, माऊथ ऑर्गन ही वाद्यं येत होती. पण मी पेटी फारशी वाजवली नव्हती. वाद्य वाजवणं हे एक तंत्र आहे. पण ते वाजवताना "भावना' जास्त महत्त्वाच्या आहेत, असं मी मानतो. त्या भावनांच्या प्रवाहातच मला सूर सापडले आणि मला "की-बोर्ड' येऊ लागला. भावनांचा जसा अंत नाही, तसाच वाद्यांद्वारे निर्माण करणाऱ्या नवीन प्रयोगांना, सुधारणांनाही अंत नाही.

अतुल - एखाद्या अनोळखी माणसाबरोबर तू मनापासून काम करू शकत नाहीस ना?
अजय - "अनोळखी' असं म्हणण्यापेक्षा मी जोपर्यंत एखाद्याला "मित्र' म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मी त्या व्यक्तीचं काम नाही करू शकत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीशी एक "माणूस' म्हणून माझे सूर जुळत नाहीत, तोपर्यंत मी काम करू शकत नाही. संगीत ही कला आहे. "अमुक एक करावं' अशी ऑर्डर तुम्ही या कलेत देऊ शकत नाही. तिथे ट्युनिंग जमणं हे महत्त्वाचं आहे.

अतुल - तुला घरचं खाणं कमी आणि बाहेरचे खाद्यपदार्थ जास्त आवडतात, त्याविषयी सांग.
अजय - एकंदरीतच खाद्यसंस्कृतीशी माझं जवळचं नातं आहे. पण त्यातही वरणभात, पोळीभाजी अशा टिपीकल जेवणापेक्षा वडापाव, मिसळ, समोसा, पोहे या गोष्टी मला जास्त आवडतात. मुंबई-पुण्यातच काय; पण ठिकठिकाणची अप्रतिम खाद्यपदार्थ देणारी हॉटेल्स, धाबे, टपऱ्या मी शोधून काढल्यात.

अतुल - तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण...
अजय - माझ्या मुलाचा जन्म आणि "इलाय राजा'ची भेट.

अतुल - माझ्या स्वभावातील कोणती गोष्ट तुला आवडत नाही?
अजय - तू जेव्हा एखाद्या गोष्टीवरून पटकन्‌ चिडतोस तेव्हा...

अतुल - तुझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारे दुसरे संगीतकार कोण?
अजय - लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, आर. डी. बर्मन, बप्पी लाहिरी, पं. हृदयनाथ मंगेशकर, राम कदम, विश्‍वनाथ मोरे, राम-लक्ष्मण, जॉन विल्यम्स, जॅरी गोल्डस्मिथ, बिथोन, मोझार्ट, सॅम्युअल बार्बर हे सगळेच माझं आदराचं स्थान आहेत आणि सर्वात महत्त्वाचं नाव इलाई राजा!

अतुल - पण इलाई राजाच का?
अजय - इलाई राजा हे माझ्यासाठी द्रोणाचार्य आहेत. ही व्यक्ती म्हणजे एक चमत्कार आहे. संगीत ही फक्त नृत्याकरिता केलेली व्यवस्था नसून ती एक दैवी देणगी आहे आणि नुसती दैवी देणगी नव्हे; तर मनाला डोलवणारी दैवी देणगी. हे मला समजलं ते "इलाई राजा' या व्यक्तिमत्त्वामुळे. संगीतकलेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अंतर्बाह्य बदलला तो त्यांच्यामुळेच!
अतुल - पुढच्या आयुष्यातील तुझं ध्येय....
अजय - मराठी संगीत संपूर्ण जगात पोहोचवायचं आहे. आज मराठी माणूस जसा पाश्‍चात्य गाण्यांचा आनंद घेतो, तसं ज्यांना मराठी भाषा येत नाही, त्यांनीदेखील मराठी संगीताचा आनंद घ्यावा, अशा पद्धतीनं मला संगीतकलेला जगभरात पोहोचवायचं आहे. पाश्‍चात्यांनाही मराठी गाणी आवडतील, त्यासाठी काम करायचं आहे.

अतुल - माणूस म्हणून पुढचा जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल?
अजय - संगीतकलेचं रीतसर प्रशिक्षण घेतलेला संगीतकार आणि संगीतकारच!

अतुल - या क्षेत्रात येणाऱ्या नवीन संगीतकारांना काय सांगशील?
अजय - गायकांच्या बाबतीत कधीकधी असं होतं, की ते गायक एखाद्या विशिष्ट गायकीत, गाण्याच्या प्रकारात अडकून जातात. संगीतकारानं असं एखाद्या विशिष्ट पद्धतीत कधीच अडकू नये. केवळ एकाच पद्धतीच्या चाली देऊन संगीतकार होऊ शकत नाही. संगीतकाराला सर्व भावना, घटना समजायला हव्यात. त्यानुसार विविध पद्धतीचा बाज त्यांनी वापरायला हवा. तो "व्हर्सटाइल' असावा. संगीतकार जर संगीत-संयोजक असेल तर उत्तमच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं संगीत दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही तुमच्या नजरेतून त्याला योग्य रंगरूप देऊन सजवणं आणि लोकांच्या मनापर्यंत पोहोचविणं आवश्‍यक आहे.

[Source : esakal]

Monday, March 30, 2009

काही लाज ?

च्यायला आज एक न्यूज़ ऐकली... कसाब ला वकील दिला.
डोक्यात पाणी झाले आहे का भारत सरकारच्या ??
आईचा घो..त्याला कसला वकील देतात ?? लाथ घाला त्याच्या कंबरेत .
मला दया आली आज आपल्या नियमांची.

च्यायला एक माणूस इंडिया मधे येऊन धिंगाणा घालतो..इतक्या सर्व लोकांना मारतो .
आणि त्याच देशाचे सरकार त्याला वकील देते ? काय चाललाय काय हे ?

आणि त्याला वकील तरी का म्हणून द्यावा ?
कॅमरा मधे धडधडीत दिसतो आहे तो..स्वताहा काबुल केले आहे त्याने की मीच लोकांना मारले.
आणखी काय पाहिजे ? भारत सरकारच्या असल्या वागण्यावर कीव येते मला.
ह्या लोकांचे कुणी मेले नाहीत ना त्या दिवशी म्हणून हा सगळा नंगा नाच सुरू आहे.

आणि परत ह्या देशावर कुणी असा हल्ला करणार नाही ह्याची काय गरेंटी ?
कसाब ला अशी कुठली शिक्षा दिली आपण की जी पाहून बाकीचे आतँकवाद थांबवतील??

खरच आज मनापासून वाटते की शिवाजी महाराज पाहिजे होते.
सळसळत्या तलवारीने त्यांनी नक्कीच कसाब चे धड वेगळे केले असते.
त्यांच्या सारख्या लोकांची ह्या देशाला गरज आहे.
ही नेते मंडळी साली सर्व fuckoff आहे.
आणि ह्या देशातले हीरो सुद्धा बघा..
तो शाहरूख कॉंग्रेस चा प्रचार करतो आहे...च्यायला पैशासाठी हे लोक अजुन काय काय करतील काय माहिती.
लाजा कशा वाटत नाही ह्यांना ?

Monday, March 23, 2009

चुक की बरोबर ...

राज त्या दिवशी मला भेटला. माझा अगदी जवळचा मित्र..शाळेपासून बरोबर आणि एकदम बोलका.
पण नेहमी सारखा बोलला नाही..इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन तो निघून गेला.
मला मात्र काही राहावेना. ह्याला नक्की काय झाले असेल ह्या विचारणे मला रात्र भर झोप आली नाही.
मी ठरवले. उद्या त्याला गाठायचे आणि विचारायचे.

ठरल्याप्रमाणे तो मला भेटला.
मी सुरवात केली.
मी - काय झाले आहे राज ? इतका गप्प का तू ?
तो - काही नाही
मी - काही नाही कसे ? तुझ्या अवतारा वरुनच समजते आहे .. सांग काय झाले ते ?

तो - काही नाही रे मामला बिकट आहे. कुणाला ही न सांगन्या सारखा. तू माझा बालपणीचा मित्र म्हणून सांगतो.

महिन्याभरा पुर्वी माझे लग्न झाले.
उत्तम सून मिळाल्यामुळे घरचे जम खुश.. मी ही छान बायको मिळाल्या मुळे खुश.
सर्व कसे मस्त जमून आले.
पण लागणा नंतर काही दिवसांनी अचानक बायको तुटक तुटक वागू लागली.
इतरण समोर ती छान वागायची ..पण एकंतात असतांना मात्र माझ्याशी अलिप्त राहायची.
काही ना काही कारण काढून ती माझ्या पासून दूर राहनेच पसंत करू लागली.
मला काही समजत नाही तिला काय झाले आहे म्हणून.
बर घरात कुणाशी बोलावं तर, सर्व जन म्हणतील - इतक्या गुणी मुलीला तू उगाच नाव ठेवत आहे. म्हणून तिथे ही बोलायची चोरी.

विषय इतका नाजूक आहे की मी कुठेही बोलू शकत नाही.
तिच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला मी. पण ती काहीच सांगत नाही.
मला हळू हळू एकटे वाटायला लागले आहे स्वतहाच्याच घरात.
कुणीतरी आनंदाचे बटन आयुष्यातून स्विच ऑफ केल्या सारखे वाटते.
मनात नको नको ते विचार येतात. अगदी जीव घेणा प्रकार होतो.
मी कुठल्या गोष्टीत कमी तर पडत नाहीए ना अशी एक भीती सारखी वाटत राहते.

त्याचा परिणाम आता कामात पडू लागला आहे.
बॉस रोज शिव्या घालतो. कामात 1000 चुका होतात.
जेवणात मूड लागत नाही...सारखा एकच विचार..."मी कुठे चुकतो आहे ?" बस्सससस्स्स्स्स्स्स्स्स....

बायको म्हणून मी तिने जवळ राहावे अशी अपेक्षा केली तर मी कुठे चुकलो ?
की मला अपेक्षा करायचा अधिकारच नाही ?

मला असे पाहून ऑफीस मधली सोनिया त्या दिवशी मला समजावायला आली.
काय झाले आहे हे जरी मी तिला सांगितले नसले तरी तिने मला छान दिलासा दिला.
लग्नापूर्वी तिने मला स्वताहहून लग्नासाठी विचारले होते.
पण घरचे परवानगी देणार नाही म्हणून मी तिला सरळ नाही म्हणून सांगितले होते.
मला माहीत आहे तिचे अजूनही माझ्यावर प्रेम आहे.
आता घरात असा प्रकार चालू असतांना मला तिची सोबत आवडते.
उगाच तिला नाही म्हणून मी चुकी केली असे वाटते.
घरी जाण्यापेक्षा मला तिच्या सोबत वेळ घालवायला आवडतो.

शेवटी मी ही एक माणूस आहे .. मला ही वाटते की माझ्यावर कुणीतरी प्रेम करावे.
आणि ते प्रेम जर मला सोनिया कडून मिळणार असेल तर किती दिवस मी माझ्या मनावर ताबा ठेवणार ?
मला ही काही भावना आहेत. विचार आहे.
त्यांचा असा गळा घोटून मी तरी किती दिवस जिवंत राहणार ?

असे नाही की मी काही प्रयत्न नाही केला ह्या प्रकारमधे.
पण जर समोरचा माणूस मदत करणाराच नसेल तर मग काय अर्थ उरतो प्रयत्न करायला ?

संपूर्ण आयुष्य असे काढण्यापेक्षा मी थोडे दिवस आनंदाने काढले तर मग बिघडले कुठे ?
हो मला सोनिया आता जास्त जवळची वाटते..पण मग मी त्याला काय करू ?
आयुष्यात एखादी गोष्ट एका दुकानात नाही मिळाली तर आपण दुसर्या दुकानात जातोच ना ?
मग मी ही थोडा आनंद मिळवण्यासाठी दुसरीकडे गेलो तर माझे काय बिघडले मग ?

मला नाही जगता येणार असे एकटे आयुष्य भर ...
कदाचित मी वेडा होईन असल्या वातावरणात काही दिवस आणखीन राहून.
म्हणूंच मी हा मार्ग निवडला आहे आता...
एवढे म्हणून त्याने मला प्रश्न केला... -- मला सांग मी केले ते बरोबर केले ना ?

ह्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते मला काही समजले नाही...मी तसाच शांतपणे घरी आलो.
राज च्या आयुष्यात असे काही होईल असे स्वप्नात सुद्धा कधी वाटलें नव्हते.
ह्याच विचारात अनेक दिवस गेले.
आणि एक दिवस राज मला अचानक भेटला थियेटर मधे...आनंदी दिसत होता ..आणि त्याच्या सोबत होती सोनिया....

तो बरोबर वागला की चुक हे काही मला ठाऊक नाही...
पण हो तो आनंदी होता हे नक्की.....

Nano आली रे..

आजच टीवी वर पहिले ..
टाटा इस लॉंचिंग टाटा नानो...ते मोस्ट अवेटेड कार
न्यूज़ वल्यांनी जनतेचे इंटरव्यू दाखवले.
सर्व जन एकच सांगत होते...."आता सामान्य लोक सुद्धा कार घेऊ शकतील "
हो ते तर आहेच..पण किमतीच्या बाबतीत तुम्ही फसले जाऊ नये म्हणून थोडे लिखाण काम करत आहे मी.

नानो अगदीच काही 1 लाख रुपयांना मिळणार नाही.
तिचे 3 मॉडेल्स टाटा ने बाजारात काढले आहेत.
सर्वात चिप जे आहे त्यात काहीच फेसिलिटी नाहीत...एसी पवर स्टियरिंग काही नाही..
बाकीच्या मॉडेल्स मधे काही फसिटलित्य दिल्या आहेत त्यांनी.

सर्व जन ह्या गाडीचे कौतिक करण्यात गुंग असले तरी मला मात्र एक गोष्टीची जाम काळजी वाटते.
ह्या गाडी च्या सेफ्टी बद्दल मी अजूनही कन्फ्यूज़ आहे. मला बोनेट नसलेल्या गाड्या चालवायला खूप भीती वाटते.
कारण समोरून कुणी ठोकले तर बचावसाती काहीच उरत नाही. म्हणून मला लांब (बोनेट) असलेल्या गाड्या आवडतात.
अर्थात हे झाले माझे मत.
तुम्हाला काय वाटते ते पहा आणि ठरवा गाडी घ्यायची की नाही ते.

दुसरी एक गोष्ट म्हणजे ट्रॅफिक ...त्याची तर वाट लागणारच...
आज काळ कॉलेज मधले बहुतेक स्टूडेंट्स महागड्या बाइक्स कॉलेज मधे आणतांना दिसतात.
आता बाप ही विचार करेल .. ह्याला 90 हजाराची बाइक घेण्यापेक्षा एक नानो घेऊन देऊ म्हणजे सुट्टी च्या दिवशी तीच गाडी मलाही वापरता येईल...नाही का ?
बस मग काय सर्व लोक नानो नानो करतील..आणि टाटा मात्र मस्त खीषे भरेल.
बाकी सर्व लोकांकडे नानो असतांना लोक शाईनिंग कशी मारतील काय माहिती.
पुर्वी जशी मारुती 800 असणार्‍यांना मध्यम वर्गीय समाजचे तसेच काहीसे नानो चे होणार ...

आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर.
नानो च्या फक्त मागच्या टाइयर ला स्टेपणी आहे.
म्हणजे चुकुन तुमचे पुढचे टाइयर पंक्चर झाले तर त्याला ही स्टेपणी चालणार नाही.
वेळ मारुन नेण्याकरता तुम्ही वापरु शकता ही स्टेपणी पण इतर वेळी नाही.
कारण नानो चे दोन्ही चाक वेग वेगळे आहेत. पुढचे टाइयर स्लीम आहे तर मागचे ब्रॉड ( कारण एंजिन मागे आहे).

ही तर फक्त एक सुरवात आहे..पण अशा बर्‍याच त्रुटी ह्या गाडीत निघण्याची शक्यता आहे.
कारण 1 लाखत गाडी देणे गंमत नाही. टाटा ने छान प्रयत्न केला आहे, पण आता बघू पुढे काय होते ते.

माझे ऐकल तर गाडी लगेच बुक करण्याच्या भानगडीत पडू नका..

WAIT FOR REVIEW AND THEN DECIDE.... TILL THEN WAIT AND WATCH...

लिखानकाम सुरू...

आज माझ्या जुन्या ऑफीस मधे गेलो होतो.
मजा आली..सर्व जुनी मंडळी भेटली...आणि काही पोरी पण दिसल्या.
काही नवीन आणि काही जुन्या.
आपल्याला त्या गचाळ ऑफीस मधली एकही गचाळ पोरगी आवडत नाही..खरं सांगतो..
सर्व पोरी आपल्या डोक्यात जातात..आहो असतील देखण्या तर सांगाव ना...
उगाच उद्या राखी सावंत मकडली तर ती काही मधुबाला दिसणार आहे का ?
च्यायला ह्यांना पगार टिचभर पण नखरा पाहावा तर काय सांगणे...वा वा...
जाऊद्या आपल्या बपाचे काहीही जात नाही आणि जाणार पण नाही...
मला इथे फक्त ईतकेच सांगायचे आहे की "माझे लग्न झाले आहे .. आणि मला कुठल्याही पोरी कडे पाहण्याची आवड आणि गरज दोन्ही ही नाही..
तेव्हा फक्त उद्या रस्त्यात चुकुन कधी दिसल्याच आपण तरी उगाच नाक मुरदू नये...मला तुमच्या कडे पाहायला वेळ आणि हौस नाही..

नेक्स्ट..

हा तर मी सांगत होतो...पोरं भेटली सर्वांनी आग्रह केला की मी ब्लॉग लिहीणे का बंद केले म्हणून...
आणि ब्लॉग आवडळ्याची पावती ही दिली.
मला फार आनंद झाला..
हा तर ब्लॉग लिहीणे बंद केले नाही..
बस थोडा वेळ कमी पडतो आहे सध्या..म्हणून थोडे थोडे लेट होते..ईतकेच..

पण थोडा धीर धरा..
मै जरूर लिखूंगा...ये वादा है मेरा...
सध्या साठी जाता जाता ...

तिला पहिले मी...ती होती अगदी सुंदर ...
तिच्या नयनांनी केले माझ्या मनाला आतुर...

तिला पाहून मग मी वेडा झालो..
तिच्या विचारात पुरता बुडून गेलो...

ती असावी जवळ असे सारखे वाटते...
नी नसली की जिणे भकास वाटते..

तिच्या सहवासात मला आनंद मिळतो...
ती नसली की मग मी असाच जळतो...

तिच्यावाचून जिणे ?? कल्पनाच नाही ...
तिच्या वाचून माझी , कोरीच वही..

तिच्यासाठीच जन्म, तिच्यासाठीच प्राण...
तिच्यावाचून नाही जाणार प्राण


ती ध्यास ती भास..
ती स्वप्न ती श्वास...

तीच माझ्या प्रेमाचा पाया
अशी ती माझी विजया...

टिप - कविता चोरलेली नसून स्वतहाच लिहिलेली आहे..


पैसा...

राम आणि शाम दोघे मित्र...
दोघे एकदम हुशार आणि मेहनती...
दोघे उच्च शिक्षीत...
कॉलेज संपल्यानंतर ते एके ठिकाणी इंटरव्यू साठी गेले...
इंटरव्यू झाला ...
राम पास तर शाम नापास झाला..
राम ने तिथेच 1-2 वर्ष काढली...शाम ने दुसर्या कंपनी मधे जॉब सुरू केला..
राम ची कंपनी मोठी असल्याने त्याचा पगार लगेच वाढत गेला..
शाम ची कंपनी छोटी होती म्हणून त्याचा पगार काही वाढला नाही..
राम छान पैकी पैसे कमवायला लागला...शाम कसबसा जगू लागला...
राम ला पैशांची मग हाव सुटली...शाम मात्र शांत होता..जे मिळेल त्यात समाधानी होता..
राम ने मग नोकर्या बदलायला सुरवात केली...एक झाली की दुसरी...
शाम ने मात्र एकाच कंपनी मधे जम बसवला..
राम ने पैसे मिळवण्याच्या नादात गाव सोडले..दुसर्या गावी जाऊन तो जॉब करू लागला...घरापासून दूर...
शाम सुद्धा हुशार असल्याने त्याला ही अशा ऑफर येऊ लागल्या...
राम ने क्षणाचाही विचार करता लगेच दुसर्या गावी बिस्तर हलवले..
शाम ने मात्र आपल्याच गावात राहण्याचा निर्णय घेतला..आणि त्याने दुसर्या कंपनी ला नाही म्हणून सांगितले...
राम पैशासाठी मग गावोगवी फिरू लागला...त्याला पैसा मिळत होता पण टेन्षन सुद्धा तितकेच वाढत होते...
बरोबर कुणी नाही...बस तो एकटा आणि पैसे...घरची मंडळी सुद्धा नाही...
इकडे शाम घरच्या लोकांबरोबर खुश होता..पैसे कमी मिळत असले तरी तो समाधानी होता...
आणि मिळणार्या पैशांवर घर चालवत होता..कुठलीही हाव करता...
राम ने परगावी छान घर बांधले...आलिशान एकदम मोठे...
पण त्या घरात राहायला लोकं मिळेनात...तो एकटा भुता सारखा राहू लागला...
इकडे शाम ने गावातले आपले घर मिळणार्या पैशांमधे दुरुस्त करून घेतले...
घर लहान होते पण घरातले मनाणे मोठे होते...

राम च्या घरात सर्व सुख सोयी होत्या .. पण त्याचे काही मन लागेना...
त्याला आधरची गरज होती..पण जवळ कुणीच नव्हते...
या उलट शाम कडे आधार होता..आई आणि वडिलांचा ..आणि गावात राहणार्या आपल्या मित्र मंडळींचा...
खूप वर्ष लोटले गेले...

60 वर्षांनंतर....
राम ने गडगंज प्रॉपर्टी कमावली...
शाम मात्र 60 वर्षं पुर्वी होता तसाच राहिला..गरीब...
दोघेही अचानक मरण पावले...
दोघेही रिकाम्या हाताने आले होते आणि रिकाम्या हातानेच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला...
राम च्या बरोबर त्याने कमावलेली प्रॉपर्टी आली नाही...पण हे पाहायला तो जिवंत राहिला नव्हता..
त्याने आयुष्य भर मर मर केली...कशासाठी ?? पैशासाठी ???
पण त्याच्या सोबत काय आले ??? 1 रुपया सुद्धा नाही...
ज्या पैशांवर त्याने इतके जिवापाड प्रेम केले त्यानेच त्याला असा दगा दिला...

राम ने संपूर्ण आयुष्य एकटयानेच काढले...
ज्या वयात आई वडिलांना त्याची गरज होती त्या वेळी तो पैशाच्या मागे होता..
जगाच्या नजरेत राम एक यशस्वी माणूस होता...आणि शाम एक अपयशी माणूस...
पण त्यांच्या आई वडिलांच्या नजरेत तर काही और होते...
खरच राम यशस्वी होता का ??? आणि शाम अयशस्वी ???

विरलेले स्वप्न...

अथक परिश्रमा नंतर मधु सॉफ्टवेर इंजिनियर झाला.
घरी जाम आनंदाचे वातावरण होते. आता तरी घरची परिस्थिती थोडी सुधारेल म्हणून वडीलही निर्धास्त होते.
आयुष्य भर काम करून करून जाम झाले होते बिचारे.
मधु ने पण मग विचार केला, ह्यापुढे घराला काहीही कमी पडू देणार नाही.
त्या नुकत्याच कॉलेज मधे पास झालेल्या मुलाने मग गरूड झेप घेतली.
आई वडील अडाणी असले तरी मधु ने मात्र रक्ताचे पाणी करून शिक्षण पूर्ण केले. सर्व इछा मारुन मारुन अनेक वर्ष जगत् राहिला.पण आता त्याला जग जिंकायचे होते आणि तो जग जिंकण्यासाठी निघाला होता.
तो राहत असलेल्या चळितच सुषमा राहायची. लहानपणापासूनच त्याचा तिच्यावर जीव होता.
पण गरीबीच्या मारांने तो इतका झुकला होता की त्याला वर तोंड करून तिच्यावर प्रेम जाहीर करणे ही कधी जमले नाही. सुषमा त्याची परिस्थिती जाणून होती. तिलाही तो मनापासून आवडायचा. काही वेळा शब्द महत्वाचे नसतात, त्याचप्रमाणे त्यांचे अबोले प्रेम चालू होते.
आता मधूच्या सर्व चिंता संपल्या होत्या..तो एक उच्च शिक्षीत माणूस झाला होता.
तोडा फार सेट्ल होऊन सुषमा ला तो आपल्या प्रेमा बद्दल सांगणार होता.
पण त्याला पुढे घडणार्या गोष्टींची कल्पनाही नव्हती.

मुळातच हुशार असलेल्या मधु ला अगदी कमी वेळातच चांगली नोकरी सुद्धा मिळाली.
आनंदी झालेल्या मधु ने देवाचे आभार मानले. मनात सुप्त असलेल्या इच्छा आता जाग्या होऊ लागल्या.
आयुष्य भर चाळीत ल्या त्या 10 बाय 10 च्या खुरड्यात काढल्यावर त्याने लगेच कर्ज घेऊन आई वडिलांना एका मस्त प्रशस्त फ्लॅट मधे आणले.
पगार चांगला असल्याने बँकेनेही कसलीही नाटके केली नाहीत आणि सरळ कर्ज मंजूर केले. मधु खूप खुश होता. त्याने मन भरून आपल्या आई वडिलांना प्रेम दिले होते आणि आज तो त्यांच्या साठी काही तरी करत होता, ह्या भावनेनेच तो भारावून गेला होता.
जागा आईसपाईस मोठी मिळाली तरी मनाच्या कोपर्यातून सुषमा चा रड्वेला चेहरा काही जाईना.
चाळ सोडतांना खिडकीतून हळूच डोकवून पाहणारी आणि डोळ्यात पाणी भरलेली सुषमा त्याला आठवली की मग त्याचे मन वेडे पिसे होऊन जात.
पण आपल्याला आवडलेली सुषमा आपल्या घरच्यांना आवडणार नाही हे त्याला ठाऊक होते...
असला विचार करून मग तो आणखीनच बिथरून जायचा.

आजही त्याला तो दिवस लक्षात होता ज्या दिवशी सुषमाचे लग्न ठरले होते.
तो लग्नाचा दिवसाही त्याला लख्ख आठवत होता. असे काही होईल असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
सुषमा लग्न करून गेली पण तिच्या आठवनी काही मधु च्या मनातून जाईना.
कसे बसे त्याने स्वताहाला सावरले. आणि थोड्याच दिवसात तो तिला अगदी विसरून सुद्धा गेला होता.

कसाबसा आयुष्य जगण्याचा तो प्रयत्न करत होता.
पण नियतीला काही औरच मान्य होते.
लग्न होऊन 2-3 महिनेही होत नाही तोच मधु ला सुषमा चाळीत दिसली.
त्याच्या काळजाचा ठाव गेला. निदान सुषमा बरोबर तरी असे व्हायला नको होते.
इतक्या दिवस गुलाबी निळ्या जांभळ्या रंगात नाहाणार्या सुषमच्या अंगावर पांढरा शुभ्र रंग बिलकुल शोभत नव्हता.
हो, सुषमा लग्न करून गेल्या नंतर अवघ्या 2 महिन्यातच तिच्या नवर्याचे निधन झाले होते.
संपूर्ण आयुष्य तिच्या समोर ओस टाकून तो तिला एकटीला सोडून निघून गेला होता.
त्या बिचारीचा ह्यात काहीही दोष नसतांना तिला सासर कडच्या लोकांनी असे उघड्यावर टाकले होते.
त्या रात्री मधु खूप रडला. पण त्याचा आता काहीही उपयोग होणार नव्हता. होणारी गोष्ट होऊन गेली होती.

हा सर्व जुना विचार करत असतांनाच त्याला जाग आली. आपले आई वडील अशा मुलीला स्वीकारणार नाही हे त्याने जाणले.
मधु मोठ्या धर्म संकटात सापडला होता.
एकीकडे संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले ते आई वडील आणि दुसरीकडे सुषमा.
ह्या दोघांचा मेळ घालणे त्याला काही जमत नव्हते.

गरीब आणि म्हातारे आई वडील आणि एकटी पडलेली सुषमा दोघांनाही आधारची गरज होती.
आणि त्या सर्वांनपेक्षा खरी आधारची गरज होती ती मधु ला....तो फार एकटा पडला होता.
काय करावे कळेना...कुणाला सांगावे ते ही कळेना...
तो आतल्या आत घुस्मटुन गेला होता.
त्याने घरी 1-2 वेळा विषय सुद्धा काढले पण काही उपयोग झाला नाही.
व्यवहारी जगाला भवनाप्रधान मधु चे म्हणणे पटत नव्हते.

तिकडे सुषमा ही बैचैन होती.
तिच्या समोर पूर्ण आयुष्य पडले होते. मनातले प्रेम ओठांवर आणण्यासाठी आता फार उशीर झाला होता.
दुख म्हणून तरी किती दिवस करत बसणार...शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करणे तिला भाग होते.
तिने मग एके ठिकाणी जॉब सुरू केला..थोड्याश्या पगारावर ती जेमतेम भागवू लागली.
मनाच्या कुठल्याश्या कोपर्यात मधु चा विचार सतत चालू असायचा..आणि हे सत्य ही समोर असायचे की मधु चे प्रेम हे माझ्यासाठी मृगजळ आहे.
कामात लक्ष लागेना.
तिकडे सुषमा ला तसल्या अवस्थेत पहिल्यापासून मधु चे ही कामात लक्ष लागेना..
दोघेही बैचैन झाले होते.
एखाद्या माणसावर प्रेम असतांना त्याचा सहवास मिळणे ह्यासारखे दुसरे नरक नाही..
तोच नरक ही दोघं रोज अनुभवत होती...प्रत्येक क्षणाला....

सुषमा ची तब्येत सुद्धा खालावात चालली होती.
सारखे सारखे विचार करून आजारपण वाढु लागले होते.
राहून सुषमाने शेवटी निर्णय घेतला.
एक पत्र लिहून तिने मधु चा कायमचा निरोप घेतला.
त्या पत्रात काय होते ते कुणालाही माहिती नाही...पण त्या नंतर मधु सुन्न झाला.
त्याने सर्वांशी बोलणे ही कमी केले...हळू हळू तो गपप्च झाला.
पुढे डोक्यावर परिणाम झाल्याने त्याला हॉस्पिटल मधे भरती करावे लागले..पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

आज सुषमा कुठे आहे हे कुणालाही ठाऊक नाही ...ती कुठे गेली ? का गेली ? कधी गेली..काही पत्ता नाही...
पण तुम्ही नीट शोधलित तर ती नक्की सापडेल .....मधु च्या हृदयात...कायमची...

जग जिंकायला निघालेल्या मधु चा दुर्दैवी अंत झाला....

Wednesday, February 18, 2009

कुणी वेळ देतं का वेळ ???

बाप रे..6 वाजले...
आजही शर्मिले ची घाई तशीच चालू होती..जशी ती राहुल ला भेटण्यासाठी रोज व्हायची...
ऑफीस मधे काम ढीग भर पडले होते..पण राहुल ला भेटण्यासाठी तिचा जीव कसावीस होत होता...
लगबगीने तिने ऑफीस सोडले आणि ठरलेल्या ठिकाणी निघाली...
आज ट्रॅफिक सुद्धा जरा जास्तच होते असे तिला वाटून गेले..
आपल्याला एखाद्या माणसाला भेटण्याची घाई असेल तर अचानक ट्रॅफिक जास्तच वाटते.. तशी तिला ही वाटत होती...
घाई घाईने ती पोहोचली .. राहुल नेहमी प्रमाणे वाटच पाहत होता...
ती लेट आली म्हणून थोडे रूसवे फूगवे झाले..
पण नंतर सर्व काही नीट झाले. दोघे ही मग बराच वेळ गप्पा मारण्यात गुंग झाले.
गार्डन मधला वॉचमन शिटी मारत आला तेव्हा त्यांना समजले की अरे बाप रे 10 वाजले आहेत...इतके दोघे जन गप्पांमधे रंगले होते.
ही वेळ कधीच संपू नये असे दोघांना वाटत होते इतके एकमेकांवर त्यांचे प्रेम होते.

राहुल आणि शर्मिले आधी एकाच ऑफीस मधे काम करायचे...
तेव्हा पासूनची त्यांची ओळख होती...ओळखी चे रुपांतर शेवटी प्रेमात झाले होते..
तेव्हा पासूनची त्यांची ओळख होती...ओळखी चे रुपांतर शेवटी प्रेमात झाले होते.
दोघेही एकाच फील्ड मधे होते म्हणून विचार जुळून असायचे दोघांचे.
शर्मीलेला राहुल च्या हुशारीचा अभिमान होता..आणि राहुल ला शर्मिले च्या सरळ - सध्या स्वभावाचा.
राहुल चा स्वभाव एकदम मजेशीर होता आणि शर्मला एकदम सिन्सियर
राहुल ला प्रत्येक क्षणात जगायला आवडायचं आणि शर्मिले ला ही त्याच्या सोबत एकेक क्षण लाख मोलाचा वाटायचा..शर्मीलेच्या एका शब्दावर राहुल जीव ओवळून टाकायचा आणि ती ही तशीच होती..

शेवटी दोघांनी लग्न करायचे ठरवले..
शर्मीलेच्या घरून विरोध होता..पण कसेही झाले तरी लग्न करायचे च असे दोघांनी ठरवले..
शेवटी दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केले.
सुरवातीला थोडा प्रॉब्लेम झाला पण नंतर सर्व काही शांत झाले..
दोन्ही घरचा राग ओसरला..आणि दोन कुटुंब एकत्र झाले.

दोघे ही जॉब ला जायला लागले.
राहुल आणि शर्मिले ला एकमेकांचा मिळणारा सहवास आता हळू हळू कमी व्हायला लागला.
दोघेही करियर च्या मागे धावणारे असल्याने दोघे सारखे ऑफीस च्या कामात बिज़ी असायचे.
एकमेकांना वेळ काही देता येईना.
तिकडे शर्मिले ला ही कामपासून सवड मिळेना. दोघेही नोकरी करण्यात इतके बिज़ी झाले की त्यांना काही भानच उरले नाही.
जेव्हा पहावे तेव्हा काम काम आणि काम. सारखी भविष्याची चिंता.
दोघेही भविष्याच्या चिंतेत आपला वर्तमान काळ मात्र वाया घालवत होते.
पुढे पुढे 2-2 दिवसात एकदा बोलणेही कमी झाले.

राहुल ला फार वैताग यायचा. तो सारखा तिला फोन करायचा ऑफीस मधे.
पण तिच्या ऑफीस मधे तिला जास्त काही बोलता यायचे नाही. फोन पेक्षा शर्मिले चे कमावरच जास्त लक्ष असायचे.
कधी कधी राहुल ला वाटायचे की शर्मिलेने मस्त सुट्टी घ्यावी आणि एक दिवस एकमेकांनबरोबर घालवावा.
पण शर्मिले च्या ऑफीस मधे सर्व तिच्यावरच अवलंबुन असल्याने तिला सुट्टी काही घेता यायची नाही.
राहुल मात्र एका पायावर तैयार असायचा सुट्टी घ्यायला. पण एकटा तो तरी काय करणार घरी आणि सुट्टी घेऊन घेऊन किती दिवस घेणार ती सुद्धा ??
रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण आणि मग दोघेही दामलेली असल्याने झोप.
सुट्टी च्या दिवशी ही तीच गोष्ट. इतर दिवशी ऑफीस आणि घर अशी कसरत करून शर्मिले ला कंटाळा आलेला असायचा. म्हणून ती सुट्टी च्या दिवशी दुपारी झोपण्यावर भर द्यायची.
आणि राहुल चा प्लान काही औरच असायचा. पण तो ही तिच्या कडे पाहून गप्प बसायचा.
नाटकं सिनेमे फिरणं मज्जा करणं सर्व काही बंद...

दोघांमधे चर्चा अशी नाहीच.
यावर काही तरी मार्ग काढायला हवा होता.
दोघेही फक्त विचार करत राहीले...
अशी बरीच वर्ष गेली आणि एके दिवशी अचानक दोघांच्या ही लक्षात आले की आपण वयाची पन्नाशी कधीच गाठली आहे.
दोघे ही काम करण्यात इतके व्यस्त झाले होते की त्यांना आपण प्रेम विवाह केला हे सुद्धा लक्षात राहीले नाही.
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करता करता एकमेकांवर प्रेम करणेच राहून गेले.
एकमेकांना वेळ देनेच राहून गेले.
ज्या प्रेमसाठी आपण इतक्या दुनियेचा रोष पत्करून लग्न केले ते प्रेम आता हरवले होते.
आता उरला होता तो फक्त आठवणींचा कचरा.
आपल्या सारख्या असंख्य लोकांची आज अशीच अवस्था आहे.
प्रेम प्रेम करून आपण लग्न तर करतो पण एकमेकांना वेळ देनेच जमत नाही मग चीड चीड होते..वैताग येतो...संताप होतो..पण वेळ काही मिळत नाही.

आणि मग आयुष्याच्या उंबरठ्यावर समजते की आता फार उशीर झाला आहे.
आणि उरलेले आयुष्य मग गेलेल्या आयुष्याचा पस्तावा करण्यात निघून जाते.
तेव्हा आतापासूनच ह्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या जोडीदाराला वेळ द्या..
नाहीतर तुमच्यावर सुद्धा वेळ येईल हे म्हणण्याची -- कुणी वेळ देतं का वेळ ???

Tuesday, February 17, 2009

Advertisements....डोक्याला ताप..

अरे काय कौतुक ???
च्यायला कुठलाही चॅनेल लावा..
सगळीकडे "सलामत रहो शाहरूख..."...."सौ साल जियो शाहरूख..."
काय डोक्याला ताप आहे ...
अरे तो कोण आमचा ?? शेजारी की पाजरी ??
पोरी पण लगेच...ओह..शाहरूख लवकर बरा हो...उई मा...उई मा...करत टीवी वर फिरत होत्या...
च्यायला ह्यांच्या घरी कुणी आजारी पडलं तर कधी चुकुन डबा सुद्धा कधी करून देणार नाही...आणि इथं पहा...उई मा उई मा...
असला संताप आला म्हणून सांगू..
मला वाटतं, त्याच्या खांद्यापेक्षा ह्यांच्या डोक्याचं ऑपरेशन केलं पाहिजे...
आणि ह्यांच्या बरोबर न्यूज़ चॅनेल वल्यांचं सुद्धा...
काही काम धाम नाही हो ह्या लोकांना ....काहीही वाट्टेल ती न्यूज़ दाखवतात...
त्या दिवशी काय तर म्हणे..."छाज्जे पे बिल्लो राणी..."
नीट पहिली ती बातमी तर समजले की कुठलीशी मांजर छतावर अटकून बसली होती ती बातमी चालू होती..."
आयला...काय हे...

दुसर्या दिवशी..."राहुल ने आज मक्के की रोटी खाई...."
अरे भाड मे गया वो राहुल...कोण कुठला राहुल..आम्हाला काय घेणं आहे...
तो पोळी खाओ नाहीतर उपाशी मरो...
उद्या राहुल को जुलाब हुए ऐसे भी स्टोरी दाखवेंगे हे लोक ... काही भरवसा नाही...

हे लोकं पत्रकारितेचा कोर्स करतात...चांगले शिक्षण घेतात...आणि काम बघा...दया येते हो ह्यांची...
कोण ती चांद आणि तो तिचा हीरो...
आम्हाला काही इंट्रेस्ट नाही त्यांची लव स्टोरी मधे...
आणि लोकं ही बिंदास घरी भांडण वैगेरे झालं की मस्त टीवी वर येतात आणि पब्लिसिटी करतात...
काय तर म्हणे "मेरेको मरद ने पीटा और घसिटा ..." आणि बहुतेक करून हे सर्व लोकं बिहार यूपी मधले असतात...
काही काम धंदा च नाही ह्याना...

प्रत्येक न्यूज़ वाल्याला काहीतरी नवीन न्यूज़ हवी आहे...
त्यासाठी काहीही करतील ही लोकं...

आणखी दयनिय अवस्था आहे ती जाहिरात वल्यांची...
आता मला सांगा... शाहरूख किती बेमबिच्या देठापासुन ओरडतो जाहिराती मधे...
"सोना चांदी चवनप्राश् खाओ...शार्प दिमाग और तन के लिये..."
पण प्रत्यक्षात काय ??? गेलाचं ना हॉस्पिटल मधे ... खांदा दुखतो म्हणून ??
तो खात नसावा बहुतेक...नाहीतर ही वेळ नसती आली...

पेप्सी गॅप 5 बोटा मधे पकडून पिता येते..पण ह्यांनी उगाच ट्रेंड काढला..
वाकडे तिकडे बोटं करून पकडायचं ते पेप्सी च टीन....अरे हाड....

हेरोयिन सुद्धा मागे नाहीत हा...
केसां पासून ते दात घसायच्या ब्रश पर्यंत सर्वी कडे ह्या बया आहेतच...
आणि जाहिराती सुद्धा लागोपाठ...

अभिनेत्री - प्रियांका चोपडा.
प्रॉडक्ट - लक्स...बया आंघोळ करते आहे..ते सुद्धा दरवाजा उघडा ठेवून. मी म्हणतो मला तुम्ही सांगा, कुठल्या बिल्डिंग मधे राहते ही .. मी जातोच लगेच कसा...
परत
अभिनेत्री - प्रियांका चोपडा.
प्रॉडक्ट - कुठलसा शाम्पू...बया इथे मारामारी करते...वाह वाह...वेरी गुड...आणि ते सुद्धा एका बाप्याशी...
तो पण तिला एक बुक्का मारुन खाली नाही पाडत, तर तो तिचे केस हातात पकडतो...
अरे माणसा सारखा माणूस ना तू ?? मग झिन्ज्या कसल्या पकडतो ?? दे की एक गुद्दा

मग हीच बया नोकिया च्या फोन च्या जाहिराती मधे सुद्धा दिसते...
हीच बया पुन्हा ज हॅंपस्टेड मधे .. पुन्हा कोला च्या जाहिराती मधे....
च्यायला वैताग..
इतका उत असेल तर मग हिने किराणा दुकान टाकावे....आम्ही खुशाल किराणा घेऊ तिच्या कडून...

राणी मुखर्जी ची तीच तरहा...
"मेरी मा मे मुझे बच्पन से पच्पन जुते मार्कर मार्गो साबण च वापरणे को कहा.."
आग बया...तू लहान होती तेव्हा तुला XX धुवायची तरी अक्कल होती का ?
एकसे एक नमुने नुसते...

सर्व लोकं मनसोक्त पैसे कमावून घेतात आणि आम्ही मात्र गरीब ते गरीबचं राहतो..
प्रत्येक मुलीला सुंदर दिसायचं आहे..
त्यासाठी काय वाट्टेल ते करतील ते...
4-4 तास पार्लर मधे जातील..तोंडाला क्रीम फास्तिल...डबे च्या डबे तोंडाला फासतील ..काही विचारू नका...
सुंदर बनण्याच्या स्पर्धे मधे आपण हेच विसरून गेलो आहोत की " Inner Beauty " म्हणजे काय ...
शोकेस मधे सजुन बसलेली बहुली सर्वांनाच आवडते हो..पण ती 10 बाय 10 च्या आपल्या घरात कशी दिसेल आणि कशी राहील ह्याचा विचार शेवटी सर्वांनी आपपलाच करायचा आहे...