काही लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि मग आपले सर्व विश्वच व्यापून टाकतात...
त्या लोकांचा प्रभाव आपल्यावर इतका पडतो की हळू हळू त्यामुळे आपले विचार बदलत जातात..आपोआप..नकळत..अभवितपणे...
आणि मग आपल्याकडे त्याला शरण जाण्याशिवाय काही पर्याय उरत नाही....
अशी अवस्था बहुतेक करून "प्रेमात" पडल्यावर होते...आणि त्यातून प्रेम कॅरणारी व्यक्ती जर मुलगा असेल तर मग काही वेगळीच तरहा...
मुलांना प्रेमात पडायला सहसा कारण लागत नाही...कारण आमचा डेटा-बेस थोडा मोठा असतो...
उगाच एकाच्या प्रेमात पडायचे ... आणि नंतर ती जर का नाही म्हणाली तर वेळ वाया घालवायचा ... असल्या (वाईट) सवयी नाही आम्हाला...
Multi-threading आणि Multi-tasking च्या जमान्यात इतका वेळ कुणकडे नाही...आणि माझ्या मित्रांकडे तर नाहीच नाही...
पण चुकुन कोणी प्रेमात पडला आणि त्याला कोणी पोरीने हो म्हटले की मग बस...
कट्ट्या कट्ट्या वर "च्यायला ह्याला ही कशी पटली", "तिने ह्याच्यात काय पहिले", दुसर्या मित्राचे नाव घेऊन "हा काही मेला होता" असल्या गोष्टींना उधाण येते...
असल्या गप्पा ऐकल्या की समजायाच की बहुतेक तिच्या प्रेमात इथले 2-4 तरी मजनू आहेत...
माझे सहसा असे होत नाही...माझा स्वतहचा प्रेम विवाह झाल्याने कुणी प्रेमात पडला की मला आनंद होतो..
पण आनंदापेक्षाही मला त्या मित्राची काळजी वातल्यावाचून राहत नाही....
कारण आजकाल आतल्या सुंदरते पेक्षा बाहेरील सुंदरता पाहून प्रेमात पडणारे जास्त आहेत...
तुम्ही नाही म्हणालच हो...पण मग तसे नसते तर "Love at first site" असे कसे म्हणता आले असते ? सांगा ना...
आपला तर एक सोपा फंडा आहे भाऊ... अशी मुलगी निवडा जी वयाच्या 30 व्या नाही तर वयाच्या 80 व्या वर्षी ही तुमच्या वर तितकेच प्रेम करेल...
आणि तुम्ही सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम कराल अशी अपेक्षा आहे...बाकी सब झूठ है...
आणि प्रेम केले तर ते छाती ठोकून सांगता यायला पाहिजे...उगाच मधल्या मधे जळून काही उपयोग नाही...
टिप - हा सल्ला फक्त तरुण लोकांसाठी नाही...कारण प्रेमात पडायला वयाची अट नसते...पण...एकदा लग्न झालेले असेल तर मग हा विचार सोडून द्या...
कारण प्रेम आणि जेवण ह्यात फरक आहे...प्रेम हे जेवणासारखे परत परत नाही करता येत...
तेव्हा तुम्ही प्रेमात पडला असाल तर बिंदास जाऊन सांगा तिला...
ती काही खाणार नाही तुम्हाला...कारण जास्त करून मुली वेज असतात...
आणि जर चुकुन जर तिने तुम्हाला खाल्लेच तर 2 दिवसात नाही मेली ती तर आपले नाव सांगणार नाही जगताप म्हणून...
टिप - आमच्या येथे फक्त मुलांना सल्ला दिला जातो...