बस आता खूप झालं ...
साला वैताग आला आहे...
रोज लवकर उठा...तयारी करा...गाडी काढा..ऑफीस ला जा...
मर मर काम करा...तरी पण प्रॉजेक्ट मॅनेजर च्या शिव्या खा...खड्ड्यात गेले ते काम...
मी काय ठेका घेतलाय का ? अरे शेवटी मी माणूस आहे...
स्वताहा साठी सुद्धा वेळ नाही मला ह्या कामाच्या गडबडीत...
आणि इतके काम करून शेवटी मिळते काय ?? चार पैसे...जे कधीच पुरत नाही...
म्हणून आपण तर ठरवून टाकले आहे...मी पुढल्या जन्मी राजा होणार...
त्यासाठी काय वाट्टेल ते करेन..गणपती पाण्यात ठेवेन..शनि देवाची पूजा करेन...पण मी राजा होणार...
राजा झाल्यावर पहिले मी पूर्ण गत-जन्मीच्या प्रॉजेक्ट मॅनेजर ची लिस्ट मागून घेईन...
त्यांना सैन्यात भरती करेल...आणि मग उगाच नको नको त्या देशाशी पंगा घेईन...उगाच युद्ध करेन...
मारेणात का ते सर्व...माझ्या बपाचे काय जाणार आहे....
पण मरायची शक्यता कमी आहे...कोण सांगो दुसर्या देशातही मॅनेज्मेंट चे लोक असतील तर....?????????
मग काय हे साले एकत्र होऊन आपल्यावरच चढाई करतील...
प्लान मे चेंज....
मी सरळ त्यांना गोळयाच घालेन..
बंदुकीच्या नाही हो...उंदीर किंवा झुरळाच्या....
त्याने नक्की मारतील हे....उगाच बंदुकीच्या गोळयांचा खर्च कशाला ???
आणि हो..अशा राज्य कारभारासाठी मला काही सेनापती नेमायला लागतील...
तुमची इछा असेल तर त्वरित संपर्क साधा...
विशेष टिप -- मुलींनी अर्ज केला तरी चालेल. दरबारात इतर कामे करण्यासाठी, जसे स्वयंपाक करणे..कपडे धुने...इ. आणि खुद्द महाराजचे मनोरंजन करण्यासाठी काही लोकांची गरज आहे.