साला एक जमाना होता.
आमचे सर मॅडम आम्हाला सॉलिड चपटाळून काढायचे.
मागचा पुढचा कसलाही विचार न करता.
पण आम्हाला कधी काही वाटले नाही त्याचे.
कारण एकच - ते आमच्या भल्यासाठी काही तर करत आहे हे मनात ठाम असायचे.
त्यामुळे तो मार सुद्धा काही तरी शिकवून जायचा.
ते म्हणतात ना - छडी लगे छम्छम विद्या येई घम घम (कृपया विद्या म्हणजे विद्या बालन नाही.. उगाच फालतू विनोद नको)
आम्ही..म्हणजे मी तरी खूप मार खाल्ला शाळेत असतांना.
म्हणजे केस माझे कधीच कापलेले नसायचे..त्यावरून तरी हमखास मार असायचा मला.
हे झाले एक कारण. अशी हजारो करणे आहेत की ज्यामुळे मला बेदम मार खावा लागला आहे लहानपणी.
आजही मला माझे सर्व शिक्षक आठवतात.
काही आवडते तर काही न आवडते.
विशेष म्हणजे शारीरिक शिक्षण ह्या विषयासाठी आम्हाला एक सर होते.
त्यांचा सॉलिड राग आहे मला अजूनही.
आहो आमच्या स्पोर्ट्स रूम मधे शाळेने आमच्याच फी भरलेल्या पैशामधून क्रिकेट किट घेतले होते.
फार जीव जायचा ते खेळण्यासाठी.
पाचवी ला असतांना वाटायचे की सहावीत गेल्यानंतर तरी मिळेल...
सहावीत गेल्यानंतर वाटायचे की सातवीत तरी...आठवीत तरी...
असे करता करता दहावी सुद्धा पास झालो आम्ही पण ते किट काही बाहेर आले नाही.
च्यायला संताप संताप व्हायचा नुसता...
तीच तरहा कंप्यूटर ची.
शाळेत असतांना कौतुकने कंप्यूटर विषय घेतला.
कमीतकमी कंप्यूटर बघायला तरी मिळेल ह्या आशेने.
पण तिथेही तेच. तो मास्टर प्रॅक्टिकल च्या वेळी सुद्धा वर्गात बसवून थेरी शिकवत बसायचा.
का ??? हा अन्याय का ?? हे मला आज पर्यंत समजलेले नाही.
आज मी सॉफ्टवेर इंजिनियर झालो...अगदी पोस्ट ग्रॅजुयेशन सुद्धा केले कंप्यूटर मधे मी.
पण शाळेने काही हातभार लावला असे म्हणता येणार नाही मला..सॉरी..
हा पण त्या वेळी जर कंप्यूटर ला कमीत कमी हात जरी लावू दिला असता आमच्या मास्टरांनी तरी थोडी का होईना चालणा मिळाली असती.
पण नाही.
शाळेतील प्रत्येक वस्तू फक्त पाहण्यासाठी.....
फक्त बघत राहा...डोळे दुखे पर्यंत....पण ती मिळणार मात्र नाही.
मग मला फार चीड यायची.
किती वेळा सांगून झाले शिक्षकांना पण काही फरक पडला नाही.
आम्हाला हवे ते जर शिक्षक देत नाहीत तर आम्ही सुद्धा का म्हणून त्यांचे ऐकायचे ??
मग बंड पुकारले जायचे. फिज़िक्स च्या वेळी टेस्ट ट्यूब फोडल्या जायच्या.
वर्गात गोंधळ व्हयायचा. कवायतीच्या तासाला वेडे वाकडे व्यायाम केले जायचे.
बेंच कोरले जायचे. फळे उगाच रंगवले जायचे...खूप धिंगाणा व्हयायचा.
त्या मानाने आजची मुलं खरच नशिबवन आहेत.
काळाप्रमाणे शाळांनिही स्वताहाला बदलले आहे.
आता तर बालवाडी पासूनच हे लोक जाहिरात करतात - कंप्यूटर वैइगेरे, ए सी क्लासरूम...च्यायला मजा आहे.
आजही पि. टी किवा कंप्यूटर चे सर समोर दिसले तर वाटते की त्यांना ओरडून ओरडून विचारावे की सर का तुम्ही असा अन्याय केला आमच्यावर ?
आम्ही असे काय घोडे, गाढव मारले होते शाळेचे म्हणून हा सूड उगवला तुम्ही आमच्यावर ?
शाळेत असतांना संस्कृत ही भाषा शिकायला मला जिवावर यायचे.
मला नाही जमायचे ते - रामा रॅमो रामहा प्रथमा...द्वितीया...काही काही कळायचे नाही मला.
वीट यायचा शिक्षणाचा.
तेव्हा सुद्धा संस्कृत च्या मॅडम रोज समाचार घ्यायच्या माझा.
आले चुकुन तर ठीक, नाहीतर टोले...
यायचे काही नाही मला, म्हणून टोले ठरलेले.
अरे मान्य आहे की संस्कृत ही आपल्या देशाने सर्वांना दिलेली फार मोठी देणगी आहे...मान्य आहे.
पण मला नाही झेपत ती तर मी काय करू ?
आणि माझे आजपर्यंत संस्कृत न आल्याने काहीही अडले नाहीए.
मी किराणा दुकानात गेल्यावर - "त्वं किराणा देव्स्य" म्हणत नाही.
आणि जेवायला बसल्यावर - अहं खादामि म्हणत नाही.
ऑफीस मधे सुद्धा - अहं काम करश्यासे वैइगेरे म्हणत नाही....
मग काय फायदा त्याचा ??
मला कंप्यूटर मधे इण्टरेस्ट होता त्यावेळी...ते तर मला नाही दिले..मग माझ्या डोक्यावर काही ही आपटले तरी काही फायदा होणार आहे का ?
शेवटी माणसाची इच्छा ज्यात असेल तेच काम तो चांगले करू शकतो - हे एकमेव सत्य आहे.
मग मला ज्या वयात कंप्यूटर शिकायची तीव्र इच्छा होती त्यावेळी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र .. ई. ई. विषयांनी माझे जीवन कुरटडून टाकले अगदी.
त्यामुळे मला तरी वाटते की माणसाला खरच ज्याची गरज आहे त्याचे शिक्षण देणे त्याला महत्वाचे आहे.
मी बर्याच वेळा वाचले आहे की काही लोक अगदी दुर्गम भागात जाऊन त्यांना शिक्षण देतात.
सॉरी, पण मला नाही पटत ते.
तुम्ही आदिवासी लोकांना जर A,B,C,D... शिकवायला लागले तर त्यांना त्याचा काय फायदा ?
पण तेच त्यांना जर त्यांना भूगोल वैइगेरे शिकवले...जे त्यांना उपयोगी पडेल रोज च्या जीवनात , तर ते महत्वाचे आहे.
की जेणे करून दिशा कशी ओळखावी, पक्षांचे स्तलांतर म्हणजे काय...असले काही तरी शिकवले तर त्याचा त्यांना काहीतरी फायदा आहे. नाहीतर त्यांच्या समोर A,B,C,D.. चे डोकं फोडून काही फायदा नाही.
उदाहरणार्थ - जर जंगलात तुम्ही प्राण्यांसाठी शाळा सुरू केली तर विषय कुठले कुठले ठेवणार तुम्ही ?
कारण जर तुम्ही उडण्यासाठी चा विषय ठेवला तर वाघ सिंह त्यात नापास होतील...
आणि ताकदीचा विषय ठेवला तर पक्षी त्यात फेल होतील.
झाडावर चढायचा विषय ठेवला तर मकडाशिवाय जास्त कोणी पास होऊ शकणार नाही.
अशीच काहीशी अवस्था आपलीही आहे.
आपल्याला कशात इण्टरेस्ट आहे ह्याचा विचार करायला वेळचं भेटत नाही.
कारण एकदा आपण 5 वर्षाचे झालो की बालवदिपासून शिक्षण नावाचे भूत आपल्या मागे लागते.
आणि ते कमीत कमी 10 वी झाल्याशिवाय आपला पीछा काही सोडत नाही.
तो पर्यंत कुणीतरी नेमुन दिलेल्या किवा कोणीतरी ठरवलेल्या आभ्यासावर रट्टा मारुन पास होन्यावर आपण जास्त भर देतो.
त्यात काही जन पाठांतर छान असल्याने बोर्डत येतात...आणि काही जन त्या स्पर्धेत नापास होतात.
म्हणून आपण त्यांना "ढ़" म्हणणे चुकीचे ठरेल.
एखादा नापास झाला म्हणजे तो "ढ़" असे नाही.
असेही असु शकते की त्याचा इण्टरेस्ट दुसरीकडे असेल...आणि तो वाट पाहत असेल की कुणीतरी येऊन मला त्या विषयात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करेल.
आणि शाळेचे शिक्षण महत्वाचे असेलही पण खरे शिक्षण आहे ते जगात जगण्याचे.
शेवटी देवानेही पहिल्या माणसाला जेव्हा जन्माला घातले असेल तेव्हा कुठे पहिली, दुसरी होती.....तो ही अनुभवातूनच शिकत गेला असेल की नाही.
बस हा थोडा विचार करायचा मुद्दा आहे...बघा विचार करून थोडा.
आणि हो पण कुणी तुम्हाला भेटला की जो नापास झाला आहे तर कृपया त्याला "ढ़" समजू नका, सध्यातरी हीच विनंती आहे.