Wednesday, February 18, 2009

कुणी वेळ देतं का वेळ ???

बाप रे..6 वाजले...
आजही शर्मिले ची घाई तशीच चालू होती..जशी ती राहुल ला भेटण्यासाठी रोज व्हायची...
ऑफीस मधे काम ढीग भर पडले होते..पण राहुल ला भेटण्यासाठी तिचा जीव कसावीस होत होता...
लगबगीने तिने ऑफीस सोडले आणि ठरलेल्या ठिकाणी निघाली...
आज ट्रॅफिक सुद्धा जरा जास्तच होते असे तिला वाटून गेले..
आपल्याला एखाद्या माणसाला भेटण्याची घाई असेल तर अचानक ट्रॅफिक जास्तच वाटते.. तशी तिला ही वाटत होती...
घाई घाईने ती पोहोचली .. राहुल नेहमी प्रमाणे वाटच पाहत होता...
ती लेट आली म्हणून थोडे रूसवे फूगवे झाले..
पण नंतर सर्व काही नीट झाले. दोघे ही मग बराच वेळ गप्पा मारण्यात गुंग झाले.
गार्डन मधला वॉचमन शिटी मारत आला तेव्हा त्यांना समजले की अरे बाप रे 10 वाजले आहेत...इतके दोघे जन गप्पांमधे रंगले होते.
ही वेळ कधीच संपू नये असे दोघांना वाटत होते इतके एकमेकांवर त्यांचे प्रेम होते.

राहुल आणि शर्मिले आधी एकाच ऑफीस मधे काम करायचे...
तेव्हा पासूनची त्यांची ओळख होती...ओळखी चे रुपांतर शेवटी प्रेमात झाले होते..
तेव्हा पासूनची त्यांची ओळख होती...ओळखी चे रुपांतर शेवटी प्रेमात झाले होते.
दोघेही एकाच फील्ड मधे होते म्हणून विचार जुळून असायचे दोघांचे.
शर्मीलेला राहुल च्या हुशारीचा अभिमान होता..आणि राहुल ला शर्मिले च्या सरळ - सध्या स्वभावाचा.
राहुल चा स्वभाव एकदम मजेशीर होता आणि शर्मला एकदम सिन्सियर
राहुल ला प्रत्येक क्षणात जगायला आवडायचं आणि शर्मिले ला ही त्याच्या सोबत एकेक क्षण लाख मोलाचा वाटायचा..शर्मीलेच्या एका शब्दावर राहुल जीव ओवळून टाकायचा आणि ती ही तशीच होती..

शेवटी दोघांनी लग्न करायचे ठरवले..
शर्मीलेच्या घरून विरोध होता..पण कसेही झाले तरी लग्न करायचे च असे दोघांनी ठरवले..
शेवटी दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केले.
सुरवातीला थोडा प्रॉब्लेम झाला पण नंतर सर्व काही शांत झाले..
दोन्ही घरचा राग ओसरला..आणि दोन कुटुंब एकत्र झाले.

दोघे ही जॉब ला जायला लागले.
राहुल आणि शर्मिले ला एकमेकांचा मिळणारा सहवास आता हळू हळू कमी व्हायला लागला.
दोघेही करियर च्या मागे धावणारे असल्याने दोघे सारखे ऑफीस च्या कामात बिज़ी असायचे.
एकमेकांना वेळ काही देता येईना.
तिकडे शर्मिले ला ही कामपासून सवड मिळेना. दोघेही नोकरी करण्यात इतके बिज़ी झाले की त्यांना काही भानच उरले नाही.
जेव्हा पहावे तेव्हा काम काम आणि काम. सारखी भविष्याची चिंता.
दोघेही भविष्याच्या चिंतेत आपला वर्तमान काळ मात्र वाया घालवत होते.
पुढे पुढे 2-2 दिवसात एकदा बोलणेही कमी झाले.

राहुल ला फार वैताग यायचा. तो सारखा तिला फोन करायचा ऑफीस मधे.
पण तिच्या ऑफीस मधे तिला जास्त काही बोलता यायचे नाही. फोन पेक्षा शर्मिले चे कमावरच जास्त लक्ष असायचे.
कधी कधी राहुल ला वाटायचे की शर्मिलेने मस्त सुट्टी घ्यावी आणि एक दिवस एकमेकांनबरोबर घालवावा.
पण शर्मिले च्या ऑफीस मधे सर्व तिच्यावरच अवलंबुन असल्याने तिला सुट्टी काही घेता यायची नाही.
राहुल मात्र एका पायावर तैयार असायचा सुट्टी घ्यायला. पण एकटा तो तरी काय करणार घरी आणि सुट्टी घेऊन घेऊन किती दिवस घेणार ती सुद्धा ??
रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण आणि मग दोघेही दामलेली असल्याने झोप.
सुट्टी च्या दिवशी ही तीच गोष्ट. इतर दिवशी ऑफीस आणि घर अशी कसरत करून शर्मिले ला कंटाळा आलेला असायचा. म्हणून ती सुट्टी च्या दिवशी दुपारी झोपण्यावर भर द्यायची.
आणि राहुल चा प्लान काही औरच असायचा. पण तो ही तिच्या कडे पाहून गप्प बसायचा.
नाटकं सिनेमे फिरणं मज्जा करणं सर्व काही बंद...

दोघांमधे चर्चा अशी नाहीच.
यावर काही तरी मार्ग काढायला हवा होता.
दोघेही फक्त विचार करत राहीले...
अशी बरीच वर्ष गेली आणि एके दिवशी अचानक दोघांच्या ही लक्षात आले की आपण वयाची पन्नाशी कधीच गाठली आहे.
दोघे ही काम करण्यात इतके व्यस्त झाले होते की त्यांना आपण प्रेम विवाह केला हे सुद्धा लक्षात राहीले नाही.
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करता करता एकमेकांवर प्रेम करणेच राहून गेले.
एकमेकांना वेळ देनेच राहून गेले.
ज्या प्रेमसाठी आपण इतक्या दुनियेचा रोष पत्करून लग्न केले ते प्रेम आता हरवले होते.
आता उरला होता तो फक्त आठवणींचा कचरा.
आपल्या सारख्या असंख्य लोकांची आज अशीच अवस्था आहे.
प्रेम प्रेम करून आपण लग्न तर करतो पण एकमेकांना वेळ देनेच जमत नाही मग चीड चीड होते..वैताग येतो...संताप होतो..पण वेळ काही मिळत नाही.

आणि मग आयुष्याच्या उंबरठ्यावर समजते की आता फार उशीर झाला आहे.
आणि उरलेले आयुष्य मग गेलेल्या आयुष्याचा पस्तावा करण्यात निघून जाते.
तेव्हा आतापासूनच ह्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या जोडीदाराला वेळ द्या..
नाहीतर तुमच्यावर सुद्धा वेळ येईल हे म्हणण्याची -- कुणी वेळ देतं का वेळ ???

Tuesday, February 17, 2009

Advertisements....डोक्याला ताप..

अरे काय कौतुक ???
च्यायला कुठलाही चॅनेल लावा..
सगळीकडे "सलामत रहो शाहरूख..."...."सौ साल जियो शाहरूख..."
काय डोक्याला ताप आहे ...
अरे तो कोण आमचा ?? शेजारी की पाजरी ??
पोरी पण लगेच...ओह..शाहरूख लवकर बरा हो...उई मा...उई मा...करत टीवी वर फिरत होत्या...
च्यायला ह्यांच्या घरी कुणी आजारी पडलं तर कधी चुकुन डबा सुद्धा कधी करून देणार नाही...आणि इथं पहा...उई मा उई मा...
असला संताप आला म्हणून सांगू..
मला वाटतं, त्याच्या खांद्यापेक्षा ह्यांच्या डोक्याचं ऑपरेशन केलं पाहिजे...
आणि ह्यांच्या बरोबर न्यूज़ चॅनेल वल्यांचं सुद्धा...
काही काम धाम नाही हो ह्या लोकांना ....काहीही वाट्टेल ती न्यूज़ दाखवतात...
त्या दिवशी काय तर म्हणे..."छाज्जे पे बिल्लो राणी..."
नीट पहिली ती बातमी तर समजले की कुठलीशी मांजर छतावर अटकून बसली होती ती बातमी चालू होती..."
आयला...काय हे...

दुसर्या दिवशी..."राहुल ने आज मक्के की रोटी खाई...."
अरे भाड मे गया वो राहुल...कोण कुठला राहुल..आम्हाला काय घेणं आहे...
तो पोळी खाओ नाहीतर उपाशी मरो...
उद्या राहुल को जुलाब हुए ऐसे भी स्टोरी दाखवेंगे हे लोक ... काही भरवसा नाही...

हे लोकं पत्रकारितेचा कोर्स करतात...चांगले शिक्षण घेतात...आणि काम बघा...दया येते हो ह्यांची...
कोण ती चांद आणि तो तिचा हीरो...
आम्हाला काही इंट्रेस्ट नाही त्यांची लव स्टोरी मधे...
आणि लोकं ही बिंदास घरी भांडण वैगेरे झालं की मस्त टीवी वर येतात आणि पब्लिसिटी करतात...
काय तर म्हणे "मेरेको मरद ने पीटा और घसिटा ..." आणि बहुतेक करून हे सर्व लोकं बिहार यूपी मधले असतात...
काही काम धंदा च नाही ह्याना...

प्रत्येक न्यूज़ वाल्याला काहीतरी नवीन न्यूज़ हवी आहे...
त्यासाठी काहीही करतील ही लोकं...

आणखी दयनिय अवस्था आहे ती जाहिरात वल्यांची...
आता मला सांगा... शाहरूख किती बेमबिच्या देठापासुन ओरडतो जाहिराती मधे...
"सोना चांदी चवनप्राश् खाओ...शार्प दिमाग और तन के लिये..."
पण प्रत्यक्षात काय ??? गेलाचं ना हॉस्पिटल मधे ... खांदा दुखतो म्हणून ??
तो खात नसावा बहुतेक...नाहीतर ही वेळ नसती आली...

पेप्सी गॅप 5 बोटा मधे पकडून पिता येते..पण ह्यांनी उगाच ट्रेंड काढला..
वाकडे तिकडे बोटं करून पकडायचं ते पेप्सी च टीन....अरे हाड....

हेरोयिन सुद्धा मागे नाहीत हा...
केसां पासून ते दात घसायच्या ब्रश पर्यंत सर्वी कडे ह्या बया आहेतच...
आणि जाहिराती सुद्धा लागोपाठ...

अभिनेत्री - प्रियांका चोपडा.
प्रॉडक्ट - लक्स...बया आंघोळ करते आहे..ते सुद्धा दरवाजा उघडा ठेवून. मी म्हणतो मला तुम्ही सांगा, कुठल्या बिल्डिंग मधे राहते ही .. मी जातोच लगेच कसा...
परत
अभिनेत्री - प्रियांका चोपडा.
प्रॉडक्ट - कुठलसा शाम्पू...बया इथे मारामारी करते...वाह वाह...वेरी गुड...आणि ते सुद्धा एका बाप्याशी...
तो पण तिला एक बुक्का मारुन खाली नाही पाडत, तर तो तिचे केस हातात पकडतो...
अरे माणसा सारखा माणूस ना तू ?? मग झिन्ज्या कसल्या पकडतो ?? दे की एक गुद्दा

मग हीच बया नोकिया च्या फोन च्या जाहिराती मधे सुद्धा दिसते...
हीच बया पुन्हा ज हॅंपस्टेड मधे .. पुन्हा कोला च्या जाहिराती मधे....
च्यायला वैताग..
इतका उत असेल तर मग हिने किराणा दुकान टाकावे....आम्ही खुशाल किराणा घेऊ तिच्या कडून...

राणी मुखर्जी ची तीच तरहा...
"मेरी मा मे मुझे बच्पन से पच्पन जुते मार्कर मार्गो साबण च वापरणे को कहा.."
आग बया...तू लहान होती तेव्हा तुला XX धुवायची तरी अक्कल होती का ?
एकसे एक नमुने नुसते...

सर्व लोकं मनसोक्त पैसे कमावून घेतात आणि आम्ही मात्र गरीब ते गरीबचं राहतो..
प्रत्येक मुलीला सुंदर दिसायचं आहे..
त्यासाठी काय वाट्टेल ते करतील ते...
4-4 तास पार्लर मधे जातील..तोंडाला क्रीम फास्तिल...डबे च्या डबे तोंडाला फासतील ..काही विचारू नका...
सुंदर बनण्याच्या स्पर्धे मधे आपण हेच विसरून गेलो आहोत की " Inner Beauty " म्हणजे काय ...
शोकेस मधे सजुन बसलेली बहुली सर्वांनाच आवडते हो..पण ती 10 बाय 10 च्या आपल्या घरात कशी दिसेल आणि कशी राहील ह्याचा विचार शेवटी सर्वांनी आपपलाच करायचा आहे...

Monday, February 16, 2009

वश्या ... (वसंत माधव जोगळेकर)

आमच्याकडे वश्या आला. तेव्हा नेमके "लिट्ल चॅम्प्स" चालू होते...
मग काय वश्या ने रिमोट चा ताबा घेतला..
आणि पोरांचे तोंड भरून कौतुक केले... "काय गातात राव अरविंद ही मंडळी...साला माझ्या पोरांना तर इतका सुद्धा मॅनर्स नाही... वेस्ट आहेत लेकाचे सर्व..." असे म्हणून जे काही तोंडाला येईल ते त्याने बाकायला सुरवात केली...
आम्हाला त्याची सवय झाली होती...

वश्या हा माझा लहान पणापासूंचा मित्र...
ह्याला लहान पणापासून कोणी तरी बनायचे होते, पण कोण बनायचे होते हे मोठे होईपर्यंत काही त्याला समजले नाही...
म्हणून तो कुणीही बनू शकला नाही...
आता एका लहानश्या कंपनी मधे कारकून म्हणून काम करतो आहे..

असो मी आपला वश्या घरी आला की त्याची जाम खेचायचो...
दुसर्याला सल्ला देणारा हा वश्या स्वताहा मात्र नेहमी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहायचा...
पोरांचे कौतुक आणि मागोमाग चहा झाल्यावर मी आपला सहज एक प्रश्न टाकला.
मी म्हणालो .."काय रे वश्या? लेका वोट कुणाला दिले तू ह्या मुलांपैकी ???"
बस प्रश्न विचारताच त्याचा चेहरा उतरला...
कारण वश्या हा आपल्या आपल्या सारख्या मंडळी पैकी एक होता...
ज्यांना कौतुक आणि सल्ले फार देता येतात, पण कृती मात्र शून्य असते...

वश्या ने एकलाही वोट दिले नव्हते हे जाणून होतो मी, कारण प्रश्न पैशाचा होता...
एक वोट करायची सुद्धा कधी त्याला गरज वाटली नाही.

ह्याचा वश्याने कॉलेज मधे असतांना पोरींसाठी 100-200 रुपये लीलया खर्च केले होते..
एका मुलीला लेकाने पार्कर चा पेन गिफ्ट केला होता...चक्क 200 रुपयाचा..
पण त्या मुलीने त्याच पेनने त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली होती..
ह्या वश्याने कधी एक रुपयाचा पेपर सुद्धा कधी विकत आणला नाही.
फुकटात मिळणार्या प्रत्येक गोष्टीचा ह्याने प्रचंड आनंद घेतला.

तर हा वश्या आधी असा नव्हता...
पण कॉलेज मधे असतांना तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि वेडा झाला..
ती मुलगी तर त्याला मिळाली नाही पण त्याच्या डोक्यावर पुरता परिणाम झाला..
कितीतरी दिवस तो कुणाशीच बोलायचा नाही..फक्त शांत असायचा..
नंतर पुन्हा तो वळणावर आला पण तेव्हा पासून तो विचित्र वागतो...
लोकं म्हणतात की तो "सायको" आहे ..पण मला कधी कधी तो अक्कल असलेल्या लोकान पेक्षा हुशार वाटतो..
कमीत कमी तो कुणाचे खोटे कौतुक तरी करतो...

पुढे मी लिहीन आणखीन ह्या वश्या बद्दल...

Sunday, February 15, 2009

ऐक सखी

सध्या व.पु. काळे ह्यांचे "ऐक सखी" पुस्तकाचे वाचन चालू आहे...
त्यांच्या हातात जादू आहे ..
एकदा पुस्तक हातात घेतले की पूर्ण झाल्या शिवाय खाली ठेववेसे नाही वाटत...
म्हणून ब्लॉग लिहायला कदाचित उशीर होईल...

लग्नाचा 2 रा वाढदिवस...

कालच माझ्या लग्नाचा 2 रा वाढदिवस साजरा केला...
मज्जा आली...आणि प्रेम विवाह करतांनाच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या...
मला साथ देणार्‍या बायकोचे आभार..
Thanks बायको.....

Thursday, February 12, 2009

Nasik to Mumbai

ऑफीस बाहेर चा धिंगाणा

ऑफीस मधला धिंगाणा लोकांना फार आवडला असं वाटलं...
म्हणून आता ऑफीस बाहेर चा धिंगाणा प्रस्तुत करत आहे..

वेळ : संध्याकाळी 5:30 ची
ठिकाण : ऑफीस च्या बाहेर..

आम्ही सर्वजण मिनी बस ची वाट पाहत होतो..
आदल्या दिवशीच आम्हाला सांगण्यात आले होते की उद्या मुंबई ला बोलावण्यात आले आहे...
हे आसचं असायचं ऑफीस मधे..वाट्टेल तेव्हा मुंबई दर्शन...
साला वैताग आलेला असायचा पण जावे लागायचे...

मग काय आम्ही जवळ पास 10-15 लोकं होतो...2 मुली आणि बाकी सर्व मुलं...
आम्ही ठरवलं...मिनी बस करायची...
पण आम्हाला काय अवदसा आठवली काय माहिती...आम्ही आमच्याच ओफीसे मधल्या एका मूर्खाचे ऐकले आणि त्याच्या ओळखीची मिनी बस ठरवून टाकली...

त्यांनी आम्हाला 5:30 वाजेचा टाइमिंग दिला होता..म्हणून मग आम्ही सर्व लोकं आमचे सामान घेऊन ऑफीस च्या बाहेर उभे होतो..जणू काही आम्ही ट्रिप लाच चाललो आहे...
पण नेहमी प्रमाणे त्या ड्राइवर ने टप्पा दिला...
तो ही काय करणार कारण गाडी ऑफीस मधल्या मूर्खंनी ठरवून दिली होती ना ?
ह्या लोकांना पैसे खायला नुसता चान्स पाहिजे असतो...खाल्ले पैसे...

हा तर आम्ही 5:30 पासून बस ची वाट पाहत होतो...
6 वाजले...7 वाजले..8 वाजले...तरी बस चा पत्ता नव्हता...
मी म्हणालो = "चला घरी..गेली उडत कंपनी...च्यायला असली बस अरेंज करतात का ?"
पण सर्वांनी सांगितले की थोडा वेळ वाट पाहु नाहीतर जाऊ मग घरी...
शेवटी बस आली....आणि आमचा जीव भांड्यात पडला...काचेचं भांडं असतं तर ते ही फुटलं असतं इतका जोरात पडला जीव...

बस आल्या आल्या आम्ही मराठी हिंदी इंग्लीश काय वाटेल त्या भाषेत त्या ड्राइवर ला शिव्या हासडल्या....
त्याने ही त्या मक्खा सारख्या खाऊन घेतल्या...
आम्ही जाम पेटलो होतो...ह्याचा बदला घेतलाच पाहिजे असे आम्ही ठरवले...
सर्व जन गाडीत बसले...आणि गाडी सुरू झाली..
टेप लावा..टेप लावा..असे कुणीतरी ओरडले...
तोच ड्राइवर म्हणाला.."टेप खराब झाला आहे..त्याचं काहीतरी करावे लागेल...
त्याला वाटले असं बोलळ्यावर पोरं गप्प बसतील..पण आम्ही अरे हाड...आम्ही आता गप्प बसणार नव्हतोच...
आम्ही त्याला गाडी एखाद्या एलेक्ट्रिक च्या दुकानात न्यायला लावली...
अर्धा तास झाला पण टेप काही नीट झाला नाही...

सर्व नीट होते ना होते तो पर्यंत...जवळ पास 11-12 वाजले होते रात्रीचे...
मग आम्ही उगाच उशीर करायचा म्हणून जेवायला थांबावे लागेल असे म्हटले...
मग मस्त सर्व जन एका धाब्यावर गेलो...
सॉलिड थंडी होती त्या दिवशी...
मग काय मस्त चिकन..मटण काय वाट्टेल ते मागवले..
आमच्या मधे 2 मुली सुद्धा होत्या...त्यांना बाजूला काढले पहिले...
उगाच ई..ई...शी शी...करत बसायला नको कोणी म्हणून...
म्हणून 3 ग्रूप केले...
Veg
Non Veg
Non Veg + Alcohol

आता चिकन मटण नुसते कसे खाणार...मग व्हिस्की...दारू....बियर....च्यायला मज्जाच मज्जा...
पी पी पिलो...मस्त टुन झालो...आणि मग गाडीत चढलो...
ड्राइवर पिलेला नव्हता...
गाडी मुंबई च्या दिशेने धावायला सुरूवात झाली...

पोरी जाम वैतागल्या होत्या...
सारख्या ई .ई करत होत्या...आणि नाकं मुरडत होत्या...
पण आम्हाला त्यांच्या कडे लक्ष द्यायला वेळ नव्हता...
आम्हाला फक्त एन्जॉय करायचे होते...एन्जॉय...!!!

गाडी मधला टेप तर चालू झाला नव्हता...मग जय ने मोबाइल काढला...
आणि मग काय धिंगाणा....
मस्त किशोर कुमार ची गाणी लावली...
"ओ साथी रे...." पासून तर "ये जवानी .." पर्यंत.. सर्व...
आम्ही तालासुरत एकमुखाणे गाणी म्हटली...

तो पर्यंत महाले मागच्या शिटावर आडवा झाला होता...
आणि दिलीश च्या पोटात गुडू गुडू व्हायला लागले होते...
शेवटी त्याने जे नको करायला पाहिजे ते केलेच...
सर्वांनी त्याला मनसोक्त शिव्या दिल्या..."च्यायला पचत नाही तर पितो कशाला रे ????"
पण तो एव्हाना चिंग झाला होता...तो गप झोपी गेला...
नंतर तो जागा झाला तेव्हा आधी गाडी थांबवून आम्ही ती खिडकी त्याच्याकडून साफ करून घेतली...

मग गाणी ऐकून आणि गाऊन कंटाळा आला...
इतक्यात प्रमोद ने आपल्या तोंडचे गटार उघडले...जे आत्तापर्यंत दारू पिऊन गप्प होते...
त्याला जोक सांगायची हुक्की आली होती...राजा राणी चे...
ते जोक मी इथे नाही लिहु शकत...sensored आहेत ...
साल्याने सॉलिड पकवले आम्हाला...एकामागे एक जोक सांगून सांगून....
त्याच्या जोक पेक्षा ... सांगण्याची जी पद्धत होती..त्यामुळे सॉलिड हसू यायचे...
तो जोक मधे अर्थ वैगेरे लावायच्य भानगडीत कधी पडत नसे...इतकी एनर्जी वेस्ट करणे त्याला आवडत नसे..
ह्या प्रमोद वर मी एक ब्लॉग लिहु शकतो ... इतका डेंजर हा मनुष्य आहे...
पुढे मागे मी लिहीन त्याच्यावरही काही तरी...

मग जोकचे एक सेशन झाले...

गाडी इगटपुरी च्या पुढे जाते ना जाते...तोच गाडीचे चाक पंक्चर झाले...
च्यामरी असला वैताग आला होता..त्यात हा नवीन प्रकार...
सर्व जन खाली उतरले...आणि ड्राइवर नवीन चाक बसवू लागला...
आम्ही तो पर्यंत जवळच्या धाब्यावर जाऊन मस्त चहा मारला...
ऐन थंडीत गरमा गरम चहा...वा क्या बात है...
पण प्रमोद ने इतके पॅक मारले होते की त्याचे तोंड काही बंद होईना...
त्याचे आपले जोक सांगणे चालूच होते...

महाले अजुन झोपलाच होता...साला गाडी पंक्चर झाली तरी खाली उतरला नाही...
त्याला आम्ही बकासुर म्हणायचो...कितीही जेवण झाले तरी हा उपाशीच असायचा नेहमी...
आणि कितीही काम असले तरी हा 6 वाजता घरी जाणारच...त्याचं नाव पुढे मी "6 च्या आत घरात" असं ठेवलं...
हा महाले फार कमी वेळा आमच्या बरोबर मुंबई ला आला...
माझे मित्र सांगतात की हा "40 रुपये देऊन टेंपो वर बसून येतो मुंबई ला.." हा हा हा हा
खरं खोटं आपल्याला माहिती नाही... :)
बाकी महाले आणि सुला वाइन्स यांचे फार जवळचे नाते आहे...सांगेन कधी वेळ मिळाला तर...


ड्राइवर ने ते चाक दुरुस्त केलं...आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला...
साल्या त्या ड्राइवर ने 4-5 लेट करून दिमाग का दही केला होता..म्हणून इछा असूनही मन त्याला मदत करायला धजावट नव्हते...
अरे गेला उडत...

दिलीप ने आपले कोल्हापुरचे मस्त ठेवणीतले प्रसंग सांगितले मग...
दीलिपच्या तोंडात जादू होती...
तो एकदा सांगायला लागला की मग फक्त ऐकावेसे वाटे...

पण एव्हाना सर्व जन थकून गेले होते...
रात्र भर असला धिंगाणा करून मग आम्ही शांत झोपी गेलो...ते सरळ गेस्ट हाउस आल्यावरच जाग आली...
गेस्ट हाउस वर पण बरीच लफडी झाली...पण ते नंतर पुन्हा कधीतरी लिहीन...

ही रात्र माझे सर्व मित्र कधीच विसरू शकत नाहीत...
कारण त्या दिवशी आम्ही जाम मज्जा केली होती...

आजही ती रात्र आठवली की अंगावर शहारे येतात...आणि पुन्हा एकदा तोच प्रवास करण्यासाठी मन उतावीळ होते...

टिप - कृपया हे सर्व धिंगाणे जुन्या ऑफीस मधले आहेत...

Wednesday, February 11, 2009

ऑफीस मधला धिंगाणा ...( Part 1)

वेळ = रात्री 12-1 ची ...
ठिकाण = माझी पुर्वी ची कंपनी...
दृष्य = मी आणि माझे टीम मेट्स काम करतो आहोत...

आमची त्या दिवशी फारच लागलेली होती...
नाही दोष आमचा नव्हता पण काय करणार नेहमी प्रमाणे आमची च मारली जाणार होती...
म्हणून काम करत बसावे लागले...
सर्वांच्या घरून धडा-धड फोन येत होते...कधी घरी येणार म्हणून...
पण काम झाल्याशिवाय घरी गेलो असतो तर प्रॉजेक्ट मॅनेजर ने दुसर्या दिवशी धिंगाणा केला असता...
म्हणून झक मारत थांबावे लागले...

हा तर रात्र बरीच झाली होती...
आम्ही जाम वैतागलो होतो...
दुसरी टीम जी आम्हाला सपोर्ट करत होती, तिचे सर्व मेंबर गुल झाले....
आणि आम्ही गाढवा सारखे काम करत बसलो होतो...
जशी काही सगळी खाज आम्हालाच होती...


कंपनी एकदम बकवास की जिथे साधी चहा ची सुद्धा सोय नाही...
सतराशे - साठ नियम...
हे करू नका ..ते करू नका...
साधे बाहेर गेलो आम्ही तरी 100 वेळा ऐकवणार...
तिकडे बॉस पेक्षा सेक्यूरिटीलाच जास्त अधिकार...
हे का करता..ते का करता...

एकदा मी, माझी टीम आणि माझा प्रॉजेक्ट मॅनेजर जेवायला बाहेर गेलो होतो..
तर सेक्यूरिटी सरळ प्रॉजेक्ट मॅनेजर लाच आडवायला निघाला...ईतना डेर कैसे हुआ म्हणून...
असली चिप कंपनी... ( तिच्या बद्दल कधीतरी लिहीन आणखी सविस्तर)

च्यायला .. इतक्यात माझ्या एका मित्रचे डोके सटके..
तो तडा तडा बाहेर गेला...
आणि मोबाइल मधे घेऊन आला...(मोबाइल सुद्धा allowed नव्हता ऑफीस मधे ... आता काय सांगणार आमच्या व्यथा .. )
बस बोहोत हुआ...अभी भाड मे गयी कंपनी ...
असे म्हणून त्याने " आपडी पोड पोड..." गाणे लावले..

मी त्या कंपनी मधे सीनियर होतो..
पोरांना मी खूप समजवले...पण आम्ही सर्वच वैतगलो होतो...
मग काय .. पाहता पाहता एक एक जन उठला...
आणि थोड्या वेळाने...आम्ही सर्व जणांनी त्या गाण्यावर मनसोक्त डॉन्स केला...

फोटो काढले...
काय वाट्टेल ते केले...
मज्जा आली...
नियम मोडताना इतकी मज्जा आयुष्यात कधीही आली नव्हती ...
शिवाजी महाराजांना एखादा गड जिंकल्यावर जितका आनंद झाला असेल तितका आनंद आजही ते फोटो पाहिल्यावर आम्हा सर्वांना होतो..

मॅनेज्मेंट ला शिव्या दिल्या...
प्रॉजेक्ट मॅनेजर ला सुद्धा शिव्या दिल्या...साला एवढ्या थंडी मधे तो मस्त गोधडी मधे झोपला असेल आणि आम्ही ऑफीस मधे मारत बसलो होतो...
त्या दिवशी खरच इतके मस्त वातावरण तैयार झाले होते की कुणालाही घरी जावेसे वाटत नव्हते...
सर्व जन जाम खुश होते...
आम्ही कंपनी चे नियम धाब्यावर बसवले होते...
आणि इथूनच आमच्या क्रांतीकारी लढ्याची सुरवात झाली होती...
त्या दिवशी अशा प्रकारे दिवाळी साजरी केली....
जय भवानी .. जय शिवाजी म्हणत आम्ही शेवटी ऑफीस सोडले...

आळस

लोकं हल्ली फार आळशी झाली आहेत...
काही विचारू नका..
माझा असाच एक मित्र (?) ..त्याला मी कौतुकने विचारले आजचा पेपर वाचला का ?
तर उत्तर मिळाले... " एखादा माणूस दे वाचायला..."

मी मनात म्हणालो "भाड मे जा साले..."
इतका आळस कसा असु शकतो हो माणसांना....?
मला खरच आश्चर्य वाटते ...
उद्या लग्नात "बायको ला माळ घालायला कंटाळा आला आहे ... " किंवा "हनिमून ला माझ्या ऐवजी तूच जा अरविंद, मला जाम कंटाळा आला आहे."
असे म्हटले नाही म्हणजे मिळवले...

नाही...माझी काही ही बळजबारी नाही....की पेपर वाचच म्हणून...
आणि असल्या लोकांसाठी तर पेपर वाले अजिबातच लिहीत नाही...
पण कंटाळा यायला काही लिमिट ???

कुणाला मदत करायला कंटाळा...
कुणाची विचार पूस करायला कंटाळा....
ऑफीस मधे जायला कंटाळा...
गेलेच तर काम करायला कंटाळा...
घरी आल्यावर बायको / घरची मंडळी काम सांगते म्हणून कंटाळा..
मित्रांना फोन करायला कंटाळा...
नुसता कंटाळा...

मला तर आनंद ह्या गोष्टी चा वाटतो की ...हे जर का स्वतंत्र पूर्व कळता असते तर देश कधीच स्वतंत्र झाला नसता...
मुलींसाठी 2 -3 तास वाया घालवणारी ही कार्टी आता बघा...
कसा पगार देते ह्यांना कंपनी काय माहीत...
तेव्हा नाही म्हणत का ? "कंटाळा आला आहे आज पगार नको..."

आपण बोम्ब मारतो अमुक एक काम करत नाही ... तमुक एक काम करत नाही...
पण तुम्ही जर स्वतहच आळशी असाल तर मग तुम्हाला कुणालाही बोलायचा अधिकार नाही मग. ..

आणि असल्या लोकांचे लग्न बर होते...
कशी काय निभावतात लग्न काय माहिती ही मंडळी ???

तुम्ही जर का सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचे फॅन असाल तर तुम्ही त्यांचे "कंटाळा..." ह्या विषयावरचे गाणे नक्की ऐकले असेल
"आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो ....
चाकोरीचे लिहून कागद साहीस पाठवतो ... !!!"

ह्या अशा लोकांसाठीच गाणे आहे ते......
मी नाही सांगू शकणार की माझ्या मनात किती चीड आहे असल्या लोका बद्दल...

पण मी मात्र ठरवले आहे की असल्या लोकांना दुरून डोंगर साजरे असे म्हणून दूरच ठेवावे...
कारण आळस हा एकद सौनसर्ग जान्य रोग आहे ..
आणि " ये बिमारी छुनेसे फेलती है..."

Tuesday, February 10, 2009

Life is calling....

आता गप्प बस...
मी मनाला पकडून सांगून टाकले आहे...
पण ते काही माझे ऐकत नाही...
सारखे सैरा वैरा धावत असते....लगाम नसलेल्या घोड्यसारखे...
जसा पाण्यात दगड टाकल्यावर पाणी स्थिर व्हायला खूप वेळ लागतो तसे काहीसे माझ्या मनाचे आहे...
एकदा विचार चक्र चालू झाले की मग ते बंद होणारच नाही...

आज माझी गाडी सिग्नल जवळ येऊन थांबली...
मी गाडीची काच खाली केली आणि सिग्नल कधी संपतो याची वाट पाहायला लागलो....
इतक्यात एक लहानसा मुलगा आणि बहुधा त्याची बहीण असावी अशी एक मुलगी माझ्या गाडी जवळ आले...
कपड्यांवरून ते गरीब वाटत होते...
घाई घाई ने त्यांनी गाडी पुसायला सुरवात केली....
हा प्रसंग काही नवीन नव्हता मला ... पण एरवी लक्ष देणारा मी, पण आज माझ्या मनात विचारांचे काहूर माजले...

कसे जगत् असतील हे ...???
आपल्या सारख्यांना जिथे इतका पगार असूनही पुरत नाही...आणि उरत नाही...
ह्या असल्या काळात ह्यांचे कसे भागत असेल ???
बरं ह्यांना जन्म देणारे आई वडील तरी ह्यांचा विचार करत असतील का ?
काय भवितव्य आहे ह्यांचे... ???
ठीक आहे आज दया आली म्हणा किवा काहीही म्हणा त्यांना आपण पैसे देणार...पण उद्याचे काय ??
शेवटी मी सुद्धा एक माणूस आहे..रोज रोज पैसे देणे परवडेल का मला ह्यांना.. ??


मी एकदा असेच एकदा एका गरीब माणसाला पैसे दिले होते..पण त्याने माझ्या समोर जाऊन बीडी विकत घेतली...
दुख: झाले मला पण एकदा पैसे दिले की त्याचा विचार नसतो करायचा..म्हणून मी विचार करायचा नाही असे ठरवले...
पण माझे मन ऐकेल तर शप्पत....




काय करता येईल आपल्याला ह्या लोकांसाठी ह्याच्याच विचारात आहे मी सध्या...
मला माहिती आहे की मी जास्त काही करू शकत नाही...पण थोडे तरी करू शकतो ना मी...
म्हणूनच मी तर ठरवले आहे की उगाच मंदिरात दान-धर्म करण्यापेक्षा मी ते पैसे गरीब लोकांसाठी वापरणार आहे...आणि सद्ध्या वापरत आहे...

मंदिरात दान-धर्म करण्यावर आपला विश्वास नाही...
त्यापेक्षा त्या मंदिराच्याच बाहेर बसलेल्या एखाद्या अपंग माणसाला जर थोडी मदत केली तरी देव प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही...

देवाला 5-10 रुपयांची माळ घालण्यापेक्षा तेच पैसे एखाद्या जिवंत माणसाचे कमीत कमी पोट भरू शकते...
ह्याचा अर्थ मी देवाला मानत नाही असे नाही...पण मी मानसांमधे देव पाहणारा माणूस आहे...

मित्रांनो आपल्यालाच काहीतरी केले पाहिजे ह्याच्यासाठी...
तुम्ही अगदी काही नाही तर एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या...
त्याचा फक्त पुस्तकांचा खर्च उचला....बस बाकी काही मागने नाही....

जवळपासच्या शाळेत जा...तिथे प्रिन्सिपल ला भेटा..
ते संगतील की किती मुलांना मदतीची गरज आहे...त्यातील कमीत कमी एकाची जबाबदारी तरी घ्या...

तुम्हाला कदाचित ही गंमत वाटत असेल...पण हो तुम्ही हे करू शकता...
जो पर्यंत ह्या देशाचा तरुण जागा होत नाही तो पर्यंत ह्या देशात काही ही होऊ शकत नाही...
आणि 1-2 हजार रुपयांनी तुमचे काही काही होईल असे मला वाटत नाही...

मला काही पुढारी वैगेरे बनायचे नाहीए...पण फक्त मनात जे विचार चालू होते त्यांना मी एक वाट करून दिली आहे...
शेवटी पैसे आणि निर्णय तुमचाच आहे...

ह्या देशाचे काही ही होऊ शकत नाही असे आपण म्हणतो...पण मग आपण काय करतो त्यासाठी ??
कुठून तरी सुरवात करावी लागणार आहे आपल्याला... मग आज पासूनच का नको ???

लहानपण देगा देवा...

मी बालपणी एकदम हुशार होतो...
आताही आहे पण आता शिंग फुटले आहे असे लोक म्हणतात...(मी बैल नसलो तरी... असो)

मी हुशार कसा होतो ते तुम्हाला सांगतो...
मला लहानपणी हमखास विचारले जायचे..."मोठ्यापनी तू काय होणार ????"

मी आपला मनाला वाटेल ते फेकायचो...
फेकायची सवय मला तिथुनच लागली...
कधी डॉक्टर कधी इंजिनियर कधी आर्मी मधे सैनिक...काय वाटेल ते...
आणि महत्वाचे म्हणजे समोरच्याला ऐकायला आवडेल ते मी काही ही फेकायचो...

पण अगदी खर सांगायचे तर मला ड्राइवर व्हयायचे होते...
माझे गाड्यांवर अतिशय प्रेम होते आणि आहे...
त्यामुळेच मला ड्राइवर व्हयायचे होते...पण फक्त मर्सिडीस गाडी चा च...
पण ते काही होऊ शकले नाही... असो..

लहानपणी आम्ही चाळीत राहत असु...
त्यामुळे आमचे विचार सुद्धा 10 x 10 चेच छोटे छोटे असायचे ...
शाळेपासून तर घरा पर्यंत सॉलिड मार खाल्ला मी....
अगदी एकही दिवस असा गेला नाही माझ्या आयुष्यात की ज्या दिवशी मी मार खाल्ला नाही...
सर मॅडम तर हात धून मागे लागलेले असायचे...
त्यांना कोण समजून सांगणार की सर्व जन न्यूटन..आइनस्टाइन नाही होऊ शकत ....
काही लोक सामान्य सुद्धा असतात...
आणि मला खरच रस नव्हता असले कोणी मोठे होण्याचा...
मी अरविंद म्हणूनच खुश होतो...आणि समाधानी होतो

आता मागे वळून पाहतो तर लक्षात येते की लहानपनीच्या काही स्वप्नांचा चुराडा झाला आहे....
जगाच्या रहाट गाडग्यात पिळून निघलेलो आहे....
लहानपणी पैसे नव्हते पण गरज ही वाटली नाही कधी त्याची...
शाळेत अक्षरशहा: फाटलेले कपडे घालून जायचो मी..पण त्याची लाज कधी बाळगली नाही ...
बरोबरीच्या मुलांचे छान छान कपडे, खेळणी ई. पहिले की वाटायचे आपल्याला कधी मिळणार हे सर्व....

कॉलेज मधे साधी साइकल सुद्धा नव्हती....आणि आज काळ चे मुलं मस्त गाडी फिरवतात...
वा वा..मज्जा आहे...

त्यावेळी साधे चॉक्लेट जरी मागितले तरी घरीची मंडळी आणि मास्टर म्हणायचे.... "स्वताहा कमव आणि मग सांग...."
कधी काहीही नवीन मागितले की हे उत्तर तैयार असायचे...
आजच्या जमान्यात बहुधा पालक असले प्रश्न विचारायला धजावत नसतील ...

पोरगं मागतय गाडी, घोडे आणि आई बाप देताय...
काय वाट्टेल ती हाउस पूर्ण करताते...पण त्यामुळे मुलगा वाईट वळनाला वैइगेरे लागत नाहीए ना ह्याची काळजी त्यांना नाही...

आमच्या वेळी मुलं सुद्धा आपल्या ऐपती प्रमाणे राहायची...
उगाच हे पाहिजे आणि ते पाहिजे असला हट्ट केला जायचा नाही....आणि केला तरी तो पुरवला जायचा नाही...

आज मान उंच करून सांगावेसे वाटते..की आमच्या गुरूंनी आणि घरच्यांनी कधी आयता पाण्याचा ग्लास दिला नाही हातात ...तर विहीर खनायला शिकवले त्यांनी....
पैशाचा आदर करायला शिकवला त्यांनी...जो आज पर्यंत उपयोगी येतो आहे...

आजही पैसे नाहीत असे नाही...
पण दिलेली शिकवण लक्षात आहे माझ्या...
म्हणूनच पैसे असतांनाही पीज़ज़ा हट .. मक्डोनाल्डस ...असल्या ठिकाणी जायची गरज वाटत नाही मला...
अगदी कितीही भूक लागली तर आम्हाला आजही आई च्या हातची भाकरी आणि भाजीच गोड लागते....
याला काही मंडळी कंजूषपणा म्हणतात...पण नो प्रॉब्लेम....छाती ठोकून सांगतो मी की आहे मी कंजूष....
काय करणार असल्या घाण सवयी आहेत आम्हाला...


इतके दिवस झाले लहानपण जाऊन पण अजूनही काही गोष्टी स्वछ लक्षात आहेत माझ्या....

शाळेचा पहिला दिवस...
पहिला वर्ग...
ते मित्र .. आवर्जून उल्लेख करावे असे निलेश सोनवणे आणि पराग पालवे.....
पहिले आणि शेवटचे नवीन दपतर...(ज्याला अलीकडे सॅक म्हणतात)
नवीन पुस्तकाचा वास...
वही आणि पुस्तकाला लावलेले नवीन कव्हर....

अशा कितीतरी गोष्टी स्मरणात आहेत माझ्या.... ज्या मी मेल्या शिवाय तरी मिटल्या जाणार नाही....

Thursday, February 5, 2009

Miss-take ( मिस्टेक )

माझ्याकडे एक टी-शर्ट आहे...
त्याच्यावर लिहिले आहे...
"Life is interesting ... if you make mistakes..."
नाही...वाचायला छान वाटते हो हे सर्व...
पण प्रत्यक्षात मात्र सर्वच लोचा आहे...
तुम्ही चुक केली की तुमची समोरचा मारणाराच...
ती चुक का झाली .. कशी झाली ? पुढे होणार नाही ह्यासाठी काय करायला हवे...इ.इ. प्रश्न त्यावेळी काही कामाचे उरत नाहीत...
उरते ती फक्त चीड..."तुझ्यकडून ही चुक झालीच कशी ??"

अरे मी काही देव आहे का ?? ( मी देव आनंद नाही म्हणालो)
होतात .. चुका माणसाकडुणचं होतात...
त्यात इतके टेन्षन घ्यायचे आणि विशेष म्हणजे द्यायचे काहीच कारण नाही...
चंद्रावर सोडलेले यान सुद्धा कधी कधी जमिनीवरच कोसळते...
प्रत्येक गोष्ट पर्फेक्ट व्हायलाच पाहिजे का ??
कशासाठी हा अट्टहास ????

आणि समजा एखद्यावेळी एखादी गोष्ट चुकली तर समोरच्याला समजावून सांगता येते ना...
की जेणे करून तो ती चुक पुन्हा करणार नाही...
त्यासाठी त्याला झापायचे कशाला ??
आणि माणसाकडून चुका जर झाल्याच नाही तर मग टेस्टिंग वाले काय करणार ???
उपाशी मरतील की ते लेकाचे ???
देवाकडून ही कधी कधी चुक होते..तर माणूस काय चीज आहे ???
तर मग चुक झाल्यावर लोक इतक्या विचित्र पने रिॅक्ट का करतात ???


माझ्या जुन्या कंपनी मधलीच गोष्ट सांगतो...
माझ्याकडून एक चुक झाली...ज्याला आपण इंग्लीश मधे मिस्टेक म्हणतो...
बॉस ने लगेच बोलावले...( बहुदा त्याच्या घरी बायको चे भांडं झाले असावे...)
बस मग पुढे काय ??? माझे पूर्ण खानदान ऑफीस मधे निघाले...
अरे माझे पूर्वज काय कोडिंग करायचे का ???
पण नाही..बॉस चिडला की तो मग कुणाच्याही बपाचा नसतो...
मला झाप झाप झापण्यात आले....
माझ्यासाठी ते काही नवीन नव्हते...
पण परिणामी माझ्या मनात एक घृणा निर्माण झाली...बॉस बद्दल...
मग तो कधीही म्हणाला की - आज काम आहे ..रात्री थोडे थांबावे लागेल...माझे उत्तर नाहीच असायचे...
कारण काही ही असो..पण मनातून त्याच्या साठी काम करायचा मूडच गेला होता...
हेच जर मला त्याने प्रेमाने समजावून सांगितले असते..तर त्याच्या वर जीव सुद्धा ओवळून टाकला असता आपण...
पण आता आपल्या कडून काम होणार नाही त्याच्या साठी...

मला स्वताहाला असे वाटते की ..माणसपेक्षा चुक मोठी असूच शकत नाही...
तुम्ही एखाद्या कडून चुक झाली असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगा....
तो गुलाम होईल तुमचा....

ह्याचा दुसरा असा परिणाम होतो की .. मग लोक चुक झाल्यावर सांगायला घाबरतात...
आणि मग जेव्हा दुसर्याला ती चुक समजते तेव्हा फार उशीर झालेला असतो...

मला सांगा.. न्यूटॉन ने बल्प चा शोध लावला तेव्हा तो 9999 वेळी चुकलाच होता ना ???
आणि "practice make man perfect " हे आपण मग कशाला झक मारायला म्हणतो का ???

न्यूटन जर 9999 वेळा चुकला नसता तर बल्प चा शोध कुणाच्या बापाने लावला असता मग ???
माणूस चुकुन चुकन च शिकतो...तो काही जन्मताच हुशार असायला हवा आहे का ???

आता बघा..मी वरती एडिसन च्या ऐवजी न्यूटन लिहिले...झाली चुक...मग काय ????
पण मी ती बरोबर केलीच ना ??

म्हणून सांगतो मित्रांनो..चुका पोटात घालायला शिका....
आज तुम्ही भले खालच्या पोस्ट ला असाल..पण उद्या वरच्या पोस्ट वर गेल्यावर तुम्हाला याच नक्कीच फायदा होईल...
आणि हा फायदा नुसताच ऑफीस मधे नाही तर बाहेर सुद्धा होईल....

म्हणून म्हणतो...."जानेदे ना मामू...टेन्षन नही लेनेका...गलती हो जाती है रे मामू..."

Wednesday, February 4, 2009

स्वदेश....

समाजाला लागलेला एक घाण रोग म्हणजे...." पाय ओढणे "
मी अनेक वेळा पहिले आहे...सर्व जन आपापले बघण्यात इतके गुंग झाले आहेत की त्यांना दुसर्‍याचे कौतुक करायला वेळ नाही...
किंबहुना दुसर्यांचे कौतुक केल्यावर जणू काही आपल्या खिशातले पैईसेच जाणार अशी काही मंडळी वागतात...
मला सांगा ना...एखाद्याने चांगले काम केले..तर मग "अरे वा मस्त..." एवढे म्हणायला कुणाच्या बपाचे काय जाते..
पण नाही...जिथे तिथे ईगो मधे आंलच पाहिजे..त्या शिवाय तर इंच भारही हलत नाही...
एखाद्याला चांगली नोकरी लागली की मनात नुसती आग आग होते..वर दिसत नसली तरीही...
लगेच पगार विचारला जातो...
जे लोक नोकरी लागल्यावर पगार विचारतात त्यांच्या कणखाली द्याविशी वाटते...
हे लोक स्वतहचा पगार मात्र कुणालाही समजू देत नाही..किंबहुना ह्यांच्या घरी सुद्धा माहिती नसते की आपल्या दिव्याला किती पगार आहे...
पण हे लोक दुसर्‍याचा पगार मात्र खोडून खोडून विचारतात...

आणि असल्या विचारण्याला कारण बहुतेक वेळा हेच असते की "माझा पगार किती ने कमी किंवा जास्त आहे..."

पुढे थोडे विषयांतर झाल्या सारखे वाटेल..पण तो ही पैशाचाच एक भाग आहे...

सोडून द्या हे सर्व...

पगारामुळे जर माणूस मोठा छोटा झाला असता तर मग काय होते...
पैशामुळे आपण स्वतहाची फार ओढाताण करतो आहोत मित्रांनो...
माझे काही मित्र आहे जे परदेशी आहेत...पण सगळी कडे प्रॉब्लम्स आहेत...
तिकडे राहूनही ते काय करतात ?? ऑफीस वरुन घरी आल्यावर घरीच जेवण बनवतात...
एकही मित्र नाही ... घरची मंडळी नाही...
आहे फक्त पैसा....अमाप पैसा...

असा पैसा काय कामाचा ???

अर्थात कशाला प्राधान्य द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..
पण माझे विचाराल तर -- मला पैसा नको...बस हवा तो सहवास...आपल्या लोकांचा....
पोटा पुरता पैसा मिळाला की बस..बाकी काही नको...

आणि घरच्यांना सोडून राहणे तर नकोच नको...
मग तुम्ही मला घर-कोंबडा म्हणा नाहीतर होम सिक म्हणा....आहे मी...

2 वर्ष मुंबई मधे काढली आहेत मी..
माणूस स्वतहाची ओळख विसरून जातो त्या दिव्यांच्या झगमगाटात......
आणि काही बनण्यासाठी आपले गाव सोडावे लागते असे थोडेच आहे...??
असे कितीतरी उदाहरणे आहेत की ज्यांनी आपल्या गावात राहून पूर्ण देश आणि विदेश सुद्धा गाजवला आहे...
हा मोठ्या शहरामधे संधी जास्त आहेत..पण तुमच्याकडे क्षमता असली की झाले..बाकी काही लागत नाही...

आपल्याला अगदी मोहन भार्गव नाही बनायचे ..पण कमीत कमी मेलराम तर बनू शकतो ना आपण ???

तुम्ही फांदीवर बसलेला पक्षी बघितला असेलच कधी....
तो त्या फांदीवर अवलंबुन नसतोच कधी....कारण त्याला त्याच्या पंखांवर पूर्ण विश्वास असतो....
आणि सिह हा नेहमी जंगलातच शोभून दिसतो....

आणि आयुष्याच्या वळणावर जर कधी ठेच लागलीच ...
तर मागे वळून पाहिल्यावर हाकेच्या अंतरावर जवळचे कोणी हवे...बरोबर ना ?

Tuesday, February 3, 2009

कुणी बाम देता का बाम...

कुणी बाम देता का बाम...(आयोडेक्स किंवा टाइगर सुद्धा चालेल)...
अशी काहीशी परिस्थिती श्रीलंका टीम ची झाली आहे...
गेल्या 3 मॅच मधे त्यांची असली मारली आहे इंडियन टीम ने की ते मायदेशी परतल्यावर कुणी बाम देता का बाम...(आयोडेक्स किंवा टाइगर सुद्धा चालेल) म्हणतील...
वाईट धुतला त्यांना...
सेहेवाग आणि युवराज...टोप्या उडाल्या भाऊ....
काय खेळले ... वा वा...
मला स्वताहा ला मॅच पाहतांना असे वाटत होते की जाऊन त्या श्रीलंकेच्या खेळाडूंचे अश्रू पुसावे...
पण इंडियन टीम ने इतके झकास प्रदर्शन केले की त्यांच्या समोर काही पर्याय उरला नाही...

इंडियन टीम चे हे असे असते...
नाही तर नाहीच खेळणार .. आणि एकदा खेळले की मग त्या दिवशी समोर कुणीही असो..त्यांच्या चींध्या उडनारच...
मला कौतुक करवेसे वाटते ते आपल्या टीम वर्क चे...आज खरच ते सुंदर होते...
सर्वजन एकदम आक्रमक दिसत होते...जणू काही ते म्हणत होते की आणे दो साला जिसको भी आणा है..हम तैयार है...


संगाकारा चांगला खेळला पण त्याचा शेवटी काहीही उपयोग झाला नाही....
ओझा ने चांगलीच बोलिंग केली...गाडी चांगलाच जोरावर होता आज...4 विकेट्स घेतल्या त्याने...
5 च्या सीरीस ची टूर्नमेंट 3 मॅचस माधेच संपली आणि पुन्हा एकदा इतिहास रचला गेला...
आपण तर जाम खुश आहे आज...
मज्जा आली...

फक्त बातम्यांमधे बातमी सांगताना "जय हो..जय हो..." हे स्लम डोग चे गाणे का वाजवत होते न्यूज़ चॅनेल वाले...ते काही समजले नाही...
मागे लगान आला तेव्हा "बार बार हा.. बोलो यार हा..." सॉलिड वाजवले ह्याच न्यूज़ वाल्यांनी ...
न्यूज़ वाले मस्त आहेत पण...एकच वीडियो 100000 वेळा कसा दाखवायचा हे ह्यांच्या कडून शिकावे...

जाऊद्या पण..उगाच विषयांतर करायला मी काही राखी सावंत नाही...(ती बाई आहे हे जाणून आहे मी... )
पण आज मज्जा आली....

Monday, February 2, 2009

दोस्ती....

काल मी असाच ऑफीस मधे बसलो होतो...नेहमीसारखा विचार करत...आणि कोडिंग चे प्रॉब्लेम सॉल्व करत..
इतक्यात एक मित्र ऑनलाइन भेटला..म्हणाला अरविंद हे गाणे ऐकले आहे का ??
मी म्हणालो कुठले बुवा... तो बोलला -- "तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार...तेरा एमोसिनल अत्याचार...."
मी म्हणालो नाही बाबा..
तो म्हणाला जरूर ऐक एकदम झाक्कस आहे... मी ही विचार करून खूप वैतगलो होतो, म्हनून
म्हटले चला मस्त गाणे ऐकून मूड बनवू...
मग मी ते गाणे घाई घाईने डाउनलोड केले...आणि ऐकले ....
साला असला संताप झाला म्हणून सांगू...एकदम बकवास गाणे होते ते...
हे बघा पोरं असं काहीतरी करतात...पण मित्र आहे ना काय करणार ..??? पण नंतर जेव्हा मी ते गाणं खूप वेळा ऐकले तेव्हा तेच डोक्यात बसले...आणि आता मी सुद्धा दुसर्यांना हेच गाणे रेफर करतो आहे... हा हा हा हा

पण काहीही म्हणा...मित्र असले की बरं वाटतं....
पोरं त्रास देतात .. पण मजा वाटते...आणि ती नसली की आयुष्य भकास वाटते...

अर्ज किया है...

"राह चलते को राह भुलाते है दोस्त...
सोडा बोलके दारू पिलाते है दोस्त....
कूछ भी करलो बोहोत पकाते है दोस्त...
लेकिन याद साले बोहोत आते है दोस्त.... "


कॉलेज मधले आयुष्य मस्त होते...
हसा खेळा...लाइन मारा... टाइम पास करा... घरी जा ... झोपा...मग कुणीतर मित्र घरी येतो..तो लात घालून उठवतो...म्हणतो चाल...
आपण विचारायचे नाही...गप्प रस्ता पकडायचा...तो कट्यावर नेतो...
मग तिकडे कुठल्याशा पोरीचे विषय निघतात...सर्वे जन मनसोक्त तोंड सुख घेतात...आणि पुन्हा रात्री जेवण झाल्यावर सुटटा मारणे के लिये कट्टा....

लोक म्हणतात आजची पोरं वाया गेली...
पण ते पॉज़िटिव विचार का करत नाही..
कुठल्याही कट्यावर जा...तिकडे एका काडेपेटीच्या कडीत कमीत कमी 10 सिगरेट सहज पेट्टात...इतकी बचत करत असेल का कुणी जगात..??? सांगा ???

सॉलिड ऐश होती..त्या वेळी..

सुदैवाने मला खूप छान मित्र भेटले... (ते सुद्धा बहुधा हेच म्हणत असावे ... हा हा हा )
नासिकमधे ... पुण्यात...आणि मुंबई मधे सुद्धा...

सर्वांची फार आठवण येते पण काही फोन करणे जमत नाही...
कारण जग झोपते तेव्हा अरविंद जागा असतो आणि अरविंद जागा असतो तेव्हा जग झोपते.... असा काहीसा उल्टा प्रकार आहे....
म्हणून मुद्दाम मी ही पोस्ट लिहायला घेतली...

काही मित्र माझे असे आहेत की ज्यांच्या तोंडून भेटल्यावर शिव्या ऐकल्यशिवय मला दिवस जातच नाही...
आणि काहींना शिव्या दिल्याशिवाय राहावत नाही...

मित्र होतात सुद्धा एकदम पटकन....
त्याला काही रुल नाही...आता माझेच बघा ना...
कॉलेज च्या पहिल्या दिवशी मी ज्याच्याशी मारामारी केली तोच माझा एकदम जिगरी मित्र होईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते मला....

कॉलेज मधे असतांना शिकलो होतो....
जर
अ = ब आणि ब = क
तर

अ = क

हे मी बर्‍याच वेळा दोस्ती मधे अनुभवले आहे...

दोस्ती चा महिमा फार थोर आहे..हे काय मी सांगायला नकोच...
जय आणि वीरू ने ते आधीच सिद्ध केले आहे...
उगाच नाही त्यांनी गाडीचे पेट्रोल वाया घालवुन " ये दोस्ती हम नाही छोडें गे.... " गाणे म्हटले...

मैत्री तून अनेक नाती निघतात...
अगदी अचानक पणे...
कधी भाऊ .. कधी बहीण ( हे सध्या तरी क्वचितच ) ..कधी प्रेमिका (हे जरा जास्त च) ..कधी प्रेमी....
अगदी माझे लग्न झाले ती माझी बायको सुद्दा माझी कित्येक वर्ष मैत्रीण होती...

मला फक्त काही लोकांचा राग येतो ...
उदा. स्मिता पाटील, राज कपूर...इ.इ.
ह्यांनी काहीशा प्रमाणात दोस्ती ला काळिमा फसला आहे...
कसा ???
आहो तिचे ते गाणे नाही का ???

"दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है...
उमर भर का गम हमे इनाम दिया है... "

कुठला गम दिला काय माहीत...बहुतेक फाविकोल दिला असेल...

आणि राज कपूर चे "दोस्त दोस्त ना राहा..."

पण आजही दिल चाहता है चे गाणे ऐकले की मस्त वाटते...
आणि आठवतो तो मैत्रीतला प्रवास...
सहज...सुखकर...हळवा..निस्वारथी....प्रेमळ...स्वछन्दि...भाऊूक आणि हवा हवा सा....

Ghajini...डोक्याला ताप...

काल पर्यंत मी फार खुश होतो ... एकदम टेन्षन फ्री
पण मला काल काय अचानक अवदासा आठवली काय माहिती...
आणि मी "गजिनी" पहिला.... अरे हाड...
च्यायला डोक्याला ताप .. एकदम डोके आउट झाले...
तुमच्या पैकी कुणाला हा पिक्चर आवडला असेल तर मी तुमचा जाहीर मुका घ्यायला तैयार आहे...

किती फालतू सीन्स आहेत पिक्चर मधे काय सांगू तुम्हाला...
तरी मला कितीतरी लोक सांगत होते की तो पिक्चर बघ म्हणून...
पण सहसा मी जास्त फेमस झालेले पिक्चर पहाणे टाळतो...कारण माझी चाय्स थोडी वेगळी आहे...

पहिली गोष्ट ... आमिर खान एका मोठ्या कंपनी चा चेर्मन असून सुद्दा तो कसा दिसतो हे कुणाला ही ठाऊक नाही हेगणित काही मला झेपले नाही...
आणि कुठल्याही कंपनी चा चैयरमॅन एखाद्या सेल्समन सारखा लोकांच्या दारी जातो --- ते ही फक्त एक होर्डिंगसाठी ????
च्यायला आमच्या इथला किराणावाला सुद्धा असे काही करणार नाही ...

दुसरी गोष्ट -- तो मूरखा सारखा तिला सांगायला ( झापायला ) जातो आणि चक्क प्रेमात वैगेरे पडून येतो... ??
पडतो तर पडतो आपल्या बपाचे काय जाते ?? पण मग ह्या गाढवला तिला इतके सुद्धा सांगता येत नाही की "हा मैही हु वो पागल संजय सिंघहनिया जो होर्डिंग के काम के लिये आया था.... "
मी केव्हा पासून बघत होतो की हा साला तिला केव्हा सांगणार की मीच तो आहे...
मार डबल डेकर च्या वरच्या सीट वर बसून सांगतो की "अगर उसने प्यार के लिये हा कर दि तो मै उसको बता डुंगाके मै कौन हु ... "
अरे मग साल्या सांग की...इंटर्वल होऊन पिक्चर सुद्धा संपतो पण ह्याला काही सांगता येत नाही...
अगदी प्रेक्षकांना सुद्धा समजते की हाच तो..पण कल्पनाला समजतच नाही...वाह रे मुहोब्बत...

इतकी बावळट स्टोरी लिहिली आहे लिहिणार्यानी की जाऊन थियेटर मधला पडदा ब्लेड ने फाडून टाकावा इतकासंताप होतो ...

मग पुढे हे सांगायची काय गरज होती की "माझ्या नसलेल्या आईचे ऑपरेशन करायचे आहे..."...
गॅप सांगायचे ना की मी मीटिंग ला चाललो आहे...पण तो असे सांगेल तर शप्पथ...
कारण हीरो चे कॅरक्टर लिहितांना त्याच्यात खचून मूर्खपणा भरला आहे...

मग ती बावळट हीरोइन पूर्ण दिवस इकडे तिकडे टँगळ मंगळ करते आणि रात्री 1 वाजता त्याला भेटायलाबोलावटे...पैसे द्यायला..
तो ही आपल्याच पठडीतला मस्त पैसे घेतो...आणि निघून जातो.. आहे की नाही गंमत...

मग पुढे ट्रेन मधला एकदम फालतू किस्सा ... ट्रेन ला डबे 3 ..
एका डब्यात फक्त ही हेरॉईन .. दुस-यात पळवून आणलेल्या पोरी आणि तिसर्या मधे हेरॉईन ची मदत करण्यासाठीडिरेक्टोरे ने पाठवले ले सैनिक-- जे सध्या बॉर्डर वर नसतात ...तर ट्रेन मधे पोरींची कामे करतात.... ; अरेहाड....काही पण..

आता मात्र माझा संताप अनावर झाला...
मी थियेटर मधून उठून डिरेकटर च्या घरीच जाणार होतो...पण बायकोने आडवले म्हणूननाही गेलो ....

पुढे गजिनी नावाचे एकदम कॉमेडी कॅरक्टर...
नाहीतरी आपल्या Bollywood मधे व्हिलन बावळट दाखवावेच लागतात नाहीतर पिक्चर चालत नाही...
जर व्हिलन हुशार दाखवले तर हीरो आणि हेरॉईन चे लग्न कसे होईल मग ???
क्लाइमॅक्स मधे व्हिलन उगाच बडबड करण्यापेक्षा गोळी नाही घालणार का हीरो च्या ?

तर हा गजिनी..स्वताहा जाऊन हेरॉईन ला "हिरानंदाणी " मधे मारतो...
आहो हिरानंदाणी मधे सेक्यूरिटी असते... हे आम्हाला माहिती आहे..
नवीन आलेल्या प्रत्येक माणसाची नोंद गेट वर होतेच...जाऊद्या बहुतेक गजिनी कडे गेट पास असेल...

पुढचा सीन...हेरॉईन च्या घरात गुंड .. मग हा मोबाइल गाडीत मधे विसरतो... वा वा...
म्हणजे हेरॉईन ला मारायचे आहे ना मग तिला डाइरेक्टर कसा ही मारणारच ... आपण काय हीरो सुद्धा तिला वाचवूशकत नाही मग...

बर दोघांचे खून होतात...सुरवातीला ही एका इनस्पेक्टर चा खून होतो ..पण त्याची चौकशी वैगेरे होत नाही...
आहो गुंड मेल्यावर चौकशी होते मग पोलीस मेल्यावर नको व्हायला का ?

मधे जिया खान ला घ्यायचे काही कारण नव्हते...
तिचा आणि आक्टिंग चा काही एक संबंध नाही हो... आम्ही पहिले आहे तिला "निशब्ध" ह्या सिनिमा मधे...
तिच्या गावात आक्टिंग क्लास नव्हते मग तिला आक्टिंग कधी आणि कशी येणार ??
तिला बापडी ला देह प्रदर्शन करायला राहू देत बाकी...तिला उगाच त्रास देऊ नका...


शेवटी कसेही करून हीरो गजिनी ला मारतोच ...
आहो म्हणजे काय ? डाइरेक्टर ने त्याला त्याचेच तर पैसे दिले आहेत ना...

गजिनी ला जर हीरो ने इंटर्वल च्या आधी मारले असते तर हा पिक्चर जास्त चालला असता...
आणि लोकांचा वेळ सुद्धा वाचला असता...

डाइरेक्टर साठी मला एक सल्ला द्यावसा वाटतो... "असले पिक्चर प्रथम आपल्या गल्लीतल्या लोकांना दाखव... कमीत कमी त्यांना स्क्रिप्ट तरी वाचायला दे ... मग ते संगतिल की हा पिक्चर चांगला की वाईट... ते ... "

आणि एक प्रश्न मनात येतो तो हा की --- "हा पिक्चर चालला कसा ??? फक्त आमिर च्या बॉडी मुळे की काय ???? "

च्यायला डोक्याला ताप.....