Friday, January 16, 2009

सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प्स....

हा कार्यक्रम पाहिल्यावर मला नेहमी एक प्रश्न पडतो....
ज्या वयात आपल्याला साधा शेम्बुड पुसायची अक्कल नव्हती, त्या वयात ही पोरं कशी काय गाणी गातात काय माहिती...
हे सर्व च्या सर्व कमालीचे हुशार आहेत...पोरांचे कौतुक तर आहेच हो...पण त्यातल्या त्यात मला अजुन एक गोष्ट कौतुक करावीशी वाटते...
ती म्हणजे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या दोघांची...
हे दोघे ज्या पध्दतीने त्या मुलांना मार्गदर्शन करतात ते खराच कौतुकास्पद आहे...
सध्या हजारो रिॅलिटी शो चालू आहेत...
त्यांचे परीक्षक पहिले तर वाटते की लोकसभा चॅनेल पाहोतो आहोत की काय...अक्क्ल नसलेले परीक्षक कुठून धरून आणतात काय माहिती हे चॅनेल वाले ...
बाकीच्या कार्यक्रमाच्या परीक्षकांना भांडायला वेळ मिळत नाही...ते काय शिकवणार आज च्या पिढीला...
नाही नाही..ह्या वेळी मी हिमेश बदद्ल नाही बोलणार...त्यानी बोलायला काही शिल्लक ठेवले आहे का ?
लाज कोळून पिणे कशाला म्हणतात ते त्याच्या कडे पाहून समजते....
बहुदा त्याला घरी घेत नसतील..सारखा सुरूर सुरूर करत असतो..म्हणून त्याला बाहेर वेळ घालावा लागत असणार...
तर असले एक नंबर चे बैल धरून आणले आहेत...अजुन एका बैला बद्दल लिहिवाशे वाटते...
तो सारखा "अटॅक अटॅक" करत असतो...माकडीच्याला केस कापायला वेळ नाही आणी चालला परीक्षक बनायला...
च्यायला अक्कल नसतांना ह्या लोकांचे बरे चालून जाते आज कालच्या जगात....
नाहीतर आपल्यालाच बघा ना..एका जॉब साठी 1000 इंटरव्यू द्यावे लागतात...
नाव, गाव, चड्डी, बनीयान....पार खोदुन खोदुन प्रश्न विचारले जातात...लै वैताग भाउ...
जाऊद्या तुम्ही मात्र आवर्जून हा कार्यक्रम पाहत जा...आणि आपल्या छोट्या दोस्तांना बॅक आप करा.....

माझ्या गैर मराठी वाचकांसाठी ...

माझे बोहोत सारे असे दोस्त है..जिनको मराठी नाही कळता है...
मग मैने ऐसा विचार केला..की उनके करता काही तरी होऊन जाउदे हिंदी मे...
म्हणून मी लिहिनेको बैठा है...बठा म्हणजे जेवणेको बसते है वैसा नाही...
वैसे माझा हिंदी म्हणजे ... पेड के निच गाव्हडि खडी ऐसा है...
अब ये मत विचारो के इसका अर्थ क्या है... गपचुप जाके किसी मराठी मित्र को विचार के आओ... थोडा कूच विचारा तो इमप्रेसन कमी नाही होणे वाला तुम्हारा...
और एक गोष्ट आधीच सांग के देता है....मै इधर काही मराठी का ठेका नाही लेणे बैठा हु...वो लेणे के लिये और भी लोग है...और मला जातीच्या नावावर कूच नाही बोलणे का है...कारण "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असे मी नुसते म्हणत नाही तर ते पाळतो सुद्धा....आणि एखाद्याला बांधव म्हटल्यावर जातीचा प्रश्न येता किधार है...
वैसे बघा जाए तो हिंदी का बोलबाला मराठी लोकांनीच केला आहे...
आता बघो ना...2 मराठी माणूस जेव्हा एकत्र येते है...तब ते हिंदीं मेच गप्पा गोष्टी करते है....मस्त पुरणपोळी के ऐवजी पीज़ज़ा खाते है...मारणे डॉ साला सबको...
मै तो मराठी हु और मी मराठी माधेच लिहिणार...कारण मराठी माझी मातृभाषा आहे... म्हणून सांगतो की ज्यांना हा ब्लॉग झेपत नाही..वो जाके मराठी शिक के आओ...कारण मेरा हिंदी तुम लोगो को झेपणे वा ला नाही है...
वो जपान बघा है क्या कधी ??? उनके देश मधे अजुन पण इंग्लीश नाही वापरते है...उनका काही पण प्रॉडक्ट बाजार मे आता है तो वो जपनीज भाषे मे होता है...
बाकी लोकांनी जपनीज शिकली पण त्यांनी इंग्लीश नाही शिकली...
म्हणून म्हणतो .. अरे बोलून तो बघो किती मजा आहे मराठी मे ....कुछ मदत लगी तो मै इधर हीच पडा है...बिंदास विचार के लेनेका...कळा ना...बस...
च्यामरी धरून फटाक...