बाप रे..6 वाजले...
आजही शर्मिले ची घाई तशीच चालू होती..जशी ती राहुल ला भेटण्यासाठी रोज व्हायची...
ऑफीस मधे काम ढीग भर पडले होते..पण राहुल ला भेटण्यासाठी तिचा जीव कसावीस होत होता...
लगबगीने तिने ऑफीस सोडले आणि ठरलेल्या ठिकाणी निघाली...
आज ट्रॅफिक सुद्धा जरा जास्तच होते असे तिला वाटून गेले..
आपल्याला एखाद्या माणसाला भेटण्याची घाई असेल तर अचानक ट्रॅफिक जास्तच वाटते.. तशी तिला ही वाटत होती...
घाई घाईने ती पोहोचली .. राहुल नेहमी प्रमाणे वाटच पाहत होता...
ती लेट आली म्हणून थोडे रूसवे फूगवे झाले..
पण नंतर सर्व काही नीट झाले. दोघे ही मग बराच वेळ गप्पा मारण्यात गुंग झाले.
गार्डन मधला वॉचमन शिटी मारत आला तेव्हा त्यांना समजले की अरे बाप रे 10 वाजले आहेत...इतके दोघे जन गप्पांमधे रंगले होते.
ही वेळ कधीच संपू नये असे दोघांना वाटत होते इतके एकमेकांवर त्यांचे प्रेम होते.
राहुल आणि शर्मिले आधी एकाच ऑफीस मधे काम करायचे...
तेव्हा पासूनची त्यांची ओळख होती...ओळखी चे रुपांतर शेवटी प्रेमात झाले होते..
तेव्हा पासूनची त्यांची ओळख होती...ओळखी चे रुपांतर शेवटी प्रेमात झाले होते.
दोघेही एकाच फील्ड मधे होते म्हणून विचार जुळून असायचे दोघांचे.
शर्मीलेला राहुल च्या हुशारीचा अभिमान होता..आणि राहुल ला शर्मिले च्या सरळ - सध्या स्वभावाचा.
राहुल चा स्वभाव एकदम मजेशीर होता आणि शर्मला एकदम सिन्सियर
राहुल ला प्रत्येक क्षणात जगायला आवडायचं आणि शर्मिले ला ही त्याच्या सोबत एकेक क्षण लाख मोलाचा वाटायचा..शर्मीलेच्या एका शब्दावर राहुल जीव ओवळून टाकायचा आणि ती ही तशीच होती..
शेवटी दोघांनी लग्न करायचे ठरवले..
शर्मीलेच्या घरून विरोध होता..पण कसेही झाले तरी लग्न करायचे च असे दोघांनी ठरवले..
शेवटी दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केले.
सुरवातीला थोडा प्रॉब्लेम झाला पण नंतर सर्व काही शांत झाले..
दोन्ही घरचा राग ओसरला..आणि दोन कुटुंब एकत्र झाले.
दोघे ही जॉब ला जायला लागले.
राहुल आणि शर्मिले ला एकमेकांचा मिळणारा सहवास आता हळू हळू कमी व्हायला लागला.
दोघेही करियर च्या मागे धावणारे असल्याने दोघे सारखे ऑफीस च्या कामात बिज़ी असायचे.
एकमेकांना वेळ काही देता येईना.
तिकडे शर्मिले ला ही कामपासून सवड मिळेना. दोघेही नोकरी करण्यात इतके बिज़ी झाले की त्यांना काही भानच उरले नाही.
जेव्हा पहावे तेव्हा काम काम आणि काम. सारखी भविष्याची चिंता.
दोघेही भविष्याच्या चिंतेत आपला वर्तमान काळ मात्र वाया घालवत होते.
पुढे पुढे 2-2 दिवसात एकदा बोलणेही कमी झाले.
राहुल ला फार वैताग यायचा. तो सारखा तिला फोन करायचा ऑफीस मधे.
पण तिच्या ऑफीस मधे तिला जास्त काही बोलता यायचे नाही. फोन पेक्षा शर्मिले चे कमावरच जास्त लक्ष असायचे.
कधी कधी राहुल ला वाटायचे की शर्मिलेने मस्त सुट्टी घ्यावी आणि एक दिवस एकमेकांनबरोबर घालवावा.
पण शर्मिले च्या ऑफीस मधे सर्व तिच्यावरच अवलंबुन असल्याने तिला सुट्टी काही घेता यायची नाही.
राहुल मात्र एका पायावर तैयार असायचा सुट्टी घ्यायला. पण एकटा तो तरी काय करणार घरी आणि सुट्टी घेऊन घेऊन किती दिवस घेणार ती सुद्धा ??
रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण आणि मग दोघेही दामलेली असल्याने झोप.
सुट्टी च्या दिवशी ही तीच गोष्ट. इतर दिवशी ऑफीस आणि घर अशी कसरत करून शर्मिले ला कंटाळा आलेला असायचा. म्हणून ती सुट्टी च्या दिवशी दुपारी झोपण्यावर भर द्यायची.
आणि राहुल चा प्लान काही औरच असायचा. पण तो ही तिच्या कडे पाहून गप्प बसायचा.
नाटकं सिनेमे फिरणं मज्जा करणं सर्व काही बंद...
दोघांमधे चर्चा अशी नाहीच.
यावर काही तरी मार्ग काढायला हवा होता.
दोघेही फक्त विचार करत राहीले...
अशी बरीच वर्ष गेली आणि एके दिवशी अचानक दोघांच्या ही लक्षात आले की आपण वयाची पन्नाशी कधीच गाठली आहे.
दोघे ही काम करण्यात इतके व्यस्त झाले होते की त्यांना आपण प्रेम विवाह केला हे सुद्धा लक्षात राहीले नाही.
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करता करता एकमेकांवर प्रेम करणेच राहून गेले.
एकमेकांना वेळ देनेच राहून गेले.
ज्या प्रेमसाठी आपण इतक्या दुनियेचा रोष पत्करून लग्न केले ते प्रेम आता हरवले होते.
आता उरला होता तो फक्त आठवणींचा कचरा.
आपल्या सारख्या असंख्य लोकांची आज अशीच अवस्था आहे.
प्रेम प्रेम करून आपण लग्न तर करतो पण एकमेकांना वेळ देनेच जमत नाही मग चीड चीड होते..वैताग येतो...संताप होतो..पण वेळ काही मिळत नाही.
आणि मग आयुष्याच्या उंबरठ्यावर समजते की आता फार उशीर झाला आहे.
आणि उरलेले आयुष्य मग गेलेल्या आयुष्याचा पस्तावा करण्यात निघून जाते.
तेव्हा आतापासूनच ह्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या जोडीदाराला वेळ द्या..
नाहीतर तुमच्यावर सुद्धा वेळ येईल हे म्हणण्याची -- कुणी वेळ देतं का वेळ ???