ऑफीस बाहेर चा धिंगाणा
ऑफीस मधला धिंगाणा लोकांना फार आवडला असं वाटलं...
म्हणून आता ऑफीस बाहेर चा धिंगाणा प्रस्तुत करत आहे..
वेळ : संध्याकाळी 5:30 ची
ठिकाण : ऑफीस च्या बाहेर..
आम्ही सर्वजण मिनी बस ची वाट पाहत होतो..
आदल्या दिवशीच आम्हाला सांगण्यात आले होते की उद्या मुंबई ला बोलावण्यात आले आहे...
हे आसचं असायचं ऑफीस मधे..वाट्टेल तेव्हा मुंबई दर्शन...
साला वैताग आलेला असायचा पण जावे लागायचे...
मग काय आम्ही जवळ पास 10-15 लोकं होतो...2 मुली आणि बाकी सर्व मुलं...
आम्ही ठरवलं...मिनी बस करायची...
पण आम्हाला काय अवदसा आठवली काय माहिती...आम्ही आमच्याच ओफीसे मधल्या एका मूर्खाचे ऐकले आणि त्याच्या ओळखीची मिनी बस ठरवून टाकली...
त्यांनी आम्हाला 5:30 वाजेचा टाइमिंग दिला होता..म्हणून मग आम्ही सर्व लोकं आमचे सामान घेऊन ऑफीस च्या बाहेर उभे होतो..जणू काही आम्ही ट्रिप लाच चाललो आहे...
पण नेहमी प्रमाणे त्या ड्राइवर ने टप्पा दिला...
तो ही काय करणार कारण गाडी ऑफीस मधल्या मूर्खंनी ठरवून दिली होती ना ?
ह्या लोकांना पैसे खायला नुसता चान्स पाहिजे असतो...खाल्ले पैसे...
हा तर आम्ही 5:30 पासून बस ची वाट पाहत होतो...
6 वाजले...7 वाजले..8 वाजले...तरी बस चा पत्ता नव्हता...
मी म्हणालो = "चला घरी..गेली उडत कंपनी...च्यायला असली बस अरेंज करतात का ?"
पण सर्वांनी सांगितले की थोडा वेळ वाट पाहु नाहीतर जाऊ मग घरी...
शेवटी बस आली....आणि आमचा जीव भांड्यात पडला...काचेचं भांडं असतं तर ते ही फुटलं असतं इतका जोरात पडला जीव...
बस आल्या आल्या आम्ही मराठी हिंदी इंग्लीश काय वाटेल त्या भाषेत त्या ड्राइवर ला शिव्या हासडल्या....
त्याने ही त्या मक्खा सारख्या खाऊन घेतल्या...
आम्ही जाम पेटलो होतो...ह्याचा बदला घेतलाच पाहिजे असे आम्ही ठरवले...
सर्व जन गाडीत बसले...आणि गाडी सुरू झाली..
टेप लावा..टेप लावा..असे कुणीतरी ओरडले...
तोच ड्राइवर म्हणाला.."टेप खराब झाला आहे..त्याचं काहीतरी करावे लागेल...
त्याला वाटले असं बोलळ्यावर पोरं गप्प बसतील..पण आम्ही अरे हाड...आम्ही आता गप्प बसणार नव्हतोच...
आम्ही त्याला गाडी एखाद्या एलेक्ट्रिक च्या दुकानात न्यायला लावली...
अर्धा तास झाला पण टेप काही नीट झाला नाही...
सर्व नीट होते ना होते तो पर्यंत...जवळ पास 11-12 वाजले होते रात्रीचे...
मग आम्ही उगाच उशीर करायचा म्हणून जेवायला थांबावे लागेल असे म्हटले...
मग मस्त सर्व जन एका धाब्यावर गेलो...
सॉलिड थंडी होती त्या दिवशी...
मग काय मस्त चिकन..मटण काय वाट्टेल ते मागवले..
आमच्या मधे 2 मुली सुद्धा होत्या...त्यांना बाजूला काढले पहिले...
उगाच ई..ई...शी शी...करत बसायला नको कोणी म्हणून...
म्हणून 3 ग्रूप केले...
Veg
Non Veg
Non Veg + Alcohol
आता चिकन मटण नुसते कसे खाणार...मग व्हिस्की...दारू....बियर....च्यायला मज्जाच मज्जा...
पी पी पिलो...मस्त टुन झालो...आणि मग गाडीत चढलो...
ड्राइवर पिलेला नव्हता...
गाडी मुंबई च्या दिशेने धावायला सुरूवात झाली...
पोरी जाम वैतागल्या होत्या...
सारख्या ई .ई करत होत्या...आणि नाकं मुरडत होत्या...
पण आम्हाला त्यांच्या कडे लक्ष द्यायला वेळ नव्हता...
आम्हाला फक्त एन्जॉय करायचे होते...एन्जॉय...!!!
गाडी मधला टेप तर चालू झाला नव्हता...मग जय ने मोबाइल काढला...
आणि मग काय धिंगाणा....
मस्त किशोर कुमार ची गाणी लावली...
"ओ साथी रे...." पासून तर "ये जवानी .." पर्यंत.. सर्व...
आम्ही तालासुरत एकमुखाणे गाणी म्हटली...
तो पर्यंत महाले मागच्या शिटावर आडवा झाला होता...
आणि दिलीश च्या पोटात गुडू गुडू व्हायला लागले होते...
शेवटी त्याने जे नको करायला पाहिजे ते केलेच...
सर्वांनी त्याला मनसोक्त शिव्या दिल्या..."च्यायला पचत नाही तर पितो कशाला रे ????"
पण तो एव्हाना चिंग झाला होता...तो गप झोपी गेला...
नंतर तो जागा झाला तेव्हा आधी गाडी थांबवून आम्ही ती खिडकी त्याच्याकडून साफ करून घेतली...
मग गाणी ऐकून आणि गाऊन कंटाळा आला...
इतक्यात प्रमोद ने आपल्या तोंडचे गटार उघडले...जे आत्तापर्यंत दारू पिऊन गप्प होते...
त्याला जोक सांगायची हुक्की आली होती...राजा राणी चे...
ते जोक मी इथे नाही लिहु शकत...sensored आहेत ...
साल्याने सॉलिड पकवले आम्हाला...एकामागे एक जोक सांगून सांगून....
त्याच्या जोक पेक्षा ... सांगण्याची जी पद्धत होती..त्यामुळे सॉलिड हसू यायचे...
तो जोक मधे अर्थ वैगेरे लावायच्य भानगडीत कधी पडत नसे...इतकी एनर्जी वेस्ट करणे त्याला आवडत नसे..
ह्या प्रमोद वर मी एक ब्लॉग लिहु शकतो ... इतका डेंजर हा मनुष्य आहे...
पुढे मागे मी लिहीन त्याच्यावरही काही तरी...
मग जोकचे एक सेशन झाले...
गाडी इगटपुरी च्या पुढे जाते ना जाते...तोच गाडीचे चाक पंक्चर झाले...
च्यामरी असला वैताग आला होता..त्यात हा नवीन प्रकार...
सर्व जन खाली उतरले...आणि ड्राइवर नवीन चाक बसवू लागला...
आम्ही तो पर्यंत जवळच्या धाब्यावर जाऊन मस्त चहा मारला...
ऐन थंडीत गरमा गरम चहा...वा क्या बात है...
पण प्रमोद ने इतके पॅक मारले होते की त्याचे तोंड काही बंद होईना...
त्याचे आपले जोक सांगणे चालूच होते...
महाले अजुन झोपलाच होता...साला गाडी पंक्चर झाली तरी खाली उतरला नाही...
त्याला आम्ही बकासुर म्हणायचो...कितीही जेवण झाले तरी हा उपाशीच असायचा नेहमी...
आणि कितीही काम असले तरी हा 6 वाजता घरी जाणारच...त्याचं नाव पुढे मी "6 च्या आत घरात" असं ठेवलं...
हा महाले फार कमी वेळा आमच्या बरोबर मुंबई ला आला...
माझे मित्र सांगतात की हा "40 रुपये देऊन टेंपो वर बसून येतो मुंबई ला.." हा हा हा हा
खरं खोटं आपल्याला माहिती नाही... :)
बाकी महाले आणि सुला वाइन्स यांचे फार जवळचे नाते आहे...सांगेन कधी वेळ मिळाला तर...
ड्राइवर ने ते चाक दुरुस्त केलं...आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला...
साल्या त्या ड्राइवर ने 4-5 लेट करून दिमाग का दही केला होता..म्हणून इछा असूनही मन त्याला मदत करायला धजावट नव्हते...
अरे गेला उडत...
दिलीप ने आपले कोल्हापुरचे मस्त ठेवणीतले प्रसंग सांगितले मग...
दीलिपच्या तोंडात जादू होती...
तो एकदा सांगायला लागला की मग फक्त ऐकावेसे वाटे...
पण एव्हाना सर्व जन थकून गेले होते...
रात्र भर असला धिंगाणा करून मग आम्ही शांत झोपी गेलो...ते सरळ गेस्ट हाउस आल्यावरच जाग आली...
गेस्ट हाउस वर पण बरीच लफडी झाली...पण ते नंतर पुन्हा कधीतरी लिहीन...
ही रात्र माझे सर्व मित्र कधीच विसरू शकत नाहीत...
कारण त्या दिवशी आम्ही जाम मज्जा केली होती...
आजही ती रात्र आठवली की अंगावर शहारे येतात...आणि पुन्हा एकदा तोच प्रवास करण्यासाठी मन उतावीळ होते...
टिप - कृपया हे सर्व धिंगाणे जुन्या ऑफीस मधले आहेत...