Monday, April 6, 2009

विचार बदला..

मी आज एका नातलगकडे गेलो होतो.
कसलिशी पूजा होती त्यांच्या कडे म्हणून मला बोलावण्यात आले होते.
मी गेलो.
त्यांचे घर एकदम प्रशस्त. टुमदार बंगलाच होता.
मी माझी गाडी पार्क केली तोच त्यांच्या घरातून धुराचा लोट च्या लोट बाहेर पडत होता.
मला थोडे टेन्षन आले पण पहिले तर काय ?? तिकडे होम चालू होता.

जवळपास 8-10 ब्राम्हण जोर जोरात मंत्र म्हणत होते.
मला सांगण्यात आले की ही पूजा 3 दिवस चालते.
मी म्हटले छान.
मग मी जाऊन एका कोपर्‍यात बसलो. मी त्यांची मजा पाहत होतो.
थोडे मंत्र म्हणून ब्राम्हण ऑर्डर द्यायचे, "1 मोठं भांड भरून शुद्ध तूप आणा..."
लगेच सगळीकडे धावाधाव...
सर्व जन तूप आणण्यासाठी पाळायचे.
मग नंतर फुलं...अगरबत्ती...काय वाटेल ते मागणी व्हयायची. आणि सर्व जन नुसती पळापळ करायचे.
मी मजा पाहत होतो.

इतक्यात एक भिकारी तिथे आला. साधारण 70-80 वय असेल त्याचे.
कपडे फटके घालणार्‍याला साधारण आपण भिकारी म्हणतो...म्हणून मी भिकारी म्हणालो.
एकदम सुकलेला होता तो. जणू काही जगण्याची इच्छा संपलेला.
त्याने पहिले की इथे पूजा चालू आहे म्हणून तो दारा बाहेर बसला काहीतर मिळेल ह्या आशेने.
त्याला घरातल्या काही मंडळींनी पहिले.
पुजेत कशाला हे विघ्न म्हणून त्यांनी त्याला हुसकावून लावले.
मला फार संताप आला.
तो बिचारा कसला विघ्न ???
तो तर तिथे शांत बसला होता. त्याने एका शब्दानेही काही अजुन मागितले सुद्धा नव्हते.
आणि त्या होमा मधे 2-4 बादल्या तूप ओतण्यापेक्षा त्या गरिबाला किमान एक पोळी तरी दिली असती.
जिवंत माणसाचे हाल करून देवाला पूजन्यात काय धर्म आहे ?
फक्त कुणी एक ब्राम्हण सांगतो म्हणून हांडे च्या हांडे वाया घालवणे मला पटत नाही.
इतका संताप संताप झाला म्हणून सांगू.
मी सरळ उठलो आणि पूजा आणि जेवण न करताच तिथून निघून गेलो.
मला नाही जमत असला भोंदु पणा.

तुम्हाला जर खरच देवाला प्रसन्न करायचे असेल तर असल्या पूजा करण्यापेक्षा सरळ जाऊन एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन त्याना काहीतरी करा.
एखाद्या शाळेत जाऊन गरीब मुलांना वह्या पुस्तक वाटा.
एखाद्याला रक्त दान करा...अशा आणि आणखी बर्‍याच प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात.

मला पर्वा नाही की तुम्ही काय म्हणाल ते.
I just don't care... because I know i am not talking something weird.
युगानुयूगे जे चालत आले आहे ते थोडे तरी बदलायला हवे आहे.
We can not follow each and everything blindly.

भगवान श्री कृष्ण सुद्धा सांगतात, की प्रत्येक माणसमधे देव आहे.
मग आपण त्याची पूजा का नाही करत ?
जे लोक फार देव देव करतात त्यांनी आयुष्यात नक्कीच फार पाप केलेले असते.
ते लपवण्यासाठी हे लोक देव देव करतात.
जर आपण स्वटहाशी प्रामाणिक राहिलो आणि दुसर्यांना त्रास होणार नाही असे वागलो तरी देव प्रसन्न होईल.
त्यासाठी 4-4 दिवस पूजा करण्यात काहीच अर्थ नाही.
आणि पूजा करून मन शुद्ध होत नसते. त्यासाठी विचार बद्लावे लागतात.
विचारांनी मन पवित्र असले की देव आपोआपच प्रसन्न होतो.
त्यासाठी 10-10 किलो तूप आणि उगाच पैसे वाया घालवायची गरज नाही.
तेव्हा समोरच्या माणसाला मदत करा...देव नक्की प्रसन्न होईल.