Monday, March 23, 2009

चुक की बरोबर ...

राज त्या दिवशी मला भेटला. माझा अगदी जवळचा मित्र..शाळेपासून बरोबर आणि एकदम बोलका.
पण नेहमी सारखा बोलला नाही..इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन तो निघून गेला.
मला मात्र काही राहावेना. ह्याला नक्की काय झाले असेल ह्या विचारणे मला रात्र भर झोप आली नाही.
मी ठरवले. उद्या त्याला गाठायचे आणि विचारायचे.

ठरल्याप्रमाणे तो मला भेटला.
मी सुरवात केली.
मी - काय झाले आहे राज ? इतका गप्प का तू ?
तो - काही नाही
मी - काही नाही कसे ? तुझ्या अवतारा वरुनच समजते आहे .. सांग काय झाले ते ?

तो - काही नाही रे मामला बिकट आहे. कुणाला ही न सांगन्या सारखा. तू माझा बालपणीचा मित्र म्हणून सांगतो.

महिन्याभरा पुर्वी माझे लग्न झाले.
उत्तम सून मिळाल्यामुळे घरचे जम खुश.. मी ही छान बायको मिळाल्या मुळे खुश.
सर्व कसे मस्त जमून आले.
पण लागणा नंतर काही दिवसांनी अचानक बायको तुटक तुटक वागू लागली.
इतरण समोर ती छान वागायची ..पण एकंतात असतांना मात्र माझ्याशी अलिप्त राहायची.
काही ना काही कारण काढून ती माझ्या पासून दूर राहनेच पसंत करू लागली.
मला काही समजत नाही तिला काय झाले आहे म्हणून.
बर घरात कुणाशी बोलावं तर, सर्व जन म्हणतील - इतक्या गुणी मुलीला तू उगाच नाव ठेवत आहे. म्हणून तिथे ही बोलायची चोरी.

विषय इतका नाजूक आहे की मी कुठेही बोलू शकत नाही.
तिच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला मी. पण ती काहीच सांगत नाही.
मला हळू हळू एकटे वाटायला लागले आहे स्वतहाच्याच घरात.
कुणीतरी आनंदाचे बटन आयुष्यातून स्विच ऑफ केल्या सारखे वाटते.
मनात नको नको ते विचार येतात. अगदी जीव घेणा प्रकार होतो.
मी कुठल्या गोष्टीत कमी तर पडत नाहीए ना अशी एक भीती सारखी वाटत राहते.

त्याचा परिणाम आता कामात पडू लागला आहे.
बॉस रोज शिव्या घालतो. कामात 1000 चुका होतात.
जेवणात मूड लागत नाही...सारखा एकच विचार..."मी कुठे चुकतो आहे ?" बस्सससस्स्स्स्स्स्स्स्स....

बायको म्हणून मी तिने जवळ राहावे अशी अपेक्षा केली तर मी कुठे चुकलो ?
की मला अपेक्षा करायचा अधिकारच नाही ?

मला असे पाहून ऑफीस मधली सोनिया त्या दिवशी मला समजावायला आली.
काय झाले आहे हे जरी मी तिला सांगितले नसले तरी तिने मला छान दिलासा दिला.
लग्नापूर्वी तिने मला स्वताहहून लग्नासाठी विचारले होते.
पण घरचे परवानगी देणार नाही म्हणून मी तिला सरळ नाही म्हणून सांगितले होते.
मला माहीत आहे तिचे अजूनही माझ्यावर प्रेम आहे.
आता घरात असा प्रकार चालू असतांना मला तिची सोबत आवडते.
उगाच तिला नाही म्हणून मी चुकी केली असे वाटते.
घरी जाण्यापेक्षा मला तिच्या सोबत वेळ घालवायला आवडतो.

शेवटी मी ही एक माणूस आहे .. मला ही वाटते की माझ्यावर कुणीतरी प्रेम करावे.
आणि ते प्रेम जर मला सोनिया कडून मिळणार असेल तर किती दिवस मी माझ्या मनावर ताबा ठेवणार ?
मला ही काही भावना आहेत. विचार आहे.
त्यांचा असा गळा घोटून मी तरी किती दिवस जिवंत राहणार ?

असे नाही की मी काही प्रयत्न नाही केला ह्या प्रकारमधे.
पण जर समोरचा माणूस मदत करणाराच नसेल तर मग काय अर्थ उरतो प्रयत्न करायला ?

संपूर्ण आयुष्य असे काढण्यापेक्षा मी थोडे दिवस आनंदाने काढले तर मग बिघडले कुठे ?
हो मला सोनिया आता जास्त जवळची वाटते..पण मग मी त्याला काय करू ?
आयुष्यात एखादी गोष्ट एका दुकानात नाही मिळाली तर आपण दुसर्या दुकानात जातोच ना ?
मग मी ही थोडा आनंद मिळवण्यासाठी दुसरीकडे गेलो तर माझे काय बिघडले मग ?

मला नाही जगता येणार असे एकटे आयुष्य भर ...
कदाचित मी वेडा होईन असल्या वातावरणात काही दिवस आणखीन राहून.
म्हणूंच मी हा मार्ग निवडला आहे आता...
एवढे म्हणून त्याने मला प्रश्न केला... -- मला सांग मी केले ते बरोबर केले ना ?

ह्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते मला काही समजले नाही...मी तसाच शांतपणे घरी आलो.
राज च्या आयुष्यात असे काही होईल असे स्वप्नात सुद्धा कधी वाटलें नव्हते.
ह्याच विचारात अनेक दिवस गेले.
आणि एक दिवस राज मला अचानक भेटला थियेटर मधे...आनंदी दिसत होता ..आणि त्याच्या सोबत होती सोनिया....

तो बरोबर वागला की चुक हे काही मला ठाऊक नाही...
पण हो तो आनंदी होता हे नक्की.....

3 comments:

HAREKRISHNAJI said...

बऱ्याच वेळा असे होते, आपल्याला नक्की काय हवे आहे ते कळत नाही

Bhagyashree said...

mala vicharal tar, ha marg nave. bayko barobarche probs baykobarobarch solve karave.. baher konabarobar nahi!
ha tar paLpute pana ani anaitik marg zala! :(

HAREKRISHNAJI said...

आणि हो , लागतात हो कॉमेंटस साठी पैसे लागतात हो. लिहीपर्यंत तेवढा वेळ वीज जळाते, बॉडबँडचे फोनचे बील वाढते ना.