Monday, May 11, 2009

अरे लोकं गेले उडत ...

राम राम मंडळी..
काहीही लिहायच्या आधी मी एक गोष्ट क्लियर करणार आहे...
"हो मी रात्री चा काम करतो..माझे ऑफीस रात्री असते...."
कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर कृपया मला भेटू नये..."

च्यायला सर्वांना सांगून सांगून वैताग आला आहे.
ज्याला पहावे तो म्हणतो.. " अरे बाप रे, म्हणजे तू नाइट शिफ्ट करतोस का ??"
आणि मग तो माझ्या कडे हीन भावनेने बघायला लागतो...
मला खरच दया येते अशा लोकांची...
रात्रीचे काम करतो ह्याचा अर्थ मी वॉचमन आहे असे नाही...ही एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते.
आणि रात्री काम करायला मला आवडते हे मी डोके फोडून कुणालाही सांगत बसणार नाही.
किंबहुना मला त्याची गरज वाटत नाही.
मी अगदीच ह्या प्रश्नाने वैतगलो म्हणून ठरवले की ह्याच्या वरच ब्लॉग लिहावा.
ज्यांना कुणाला वाटत असेल की मी वॉचमन चे काम करतो त्या सर्वांना माझे एकच उत्तर -- "हो करतो मी..."

नाहीतरी लोक कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू पाहण्यापेक्षा वाईट पहिले पाहतात.
आहा हेच बघा ना...
मी जेव्हा माझ्या आयुष्यातली पहिली 4 वीलर गाडी (Accent) घेतली तेव्हा मला लोकांनी फार त्रास दिला होता.
कारण काय ?? तर मी ती सेकेंड हॅण्ड घेतली होत म्हणून...
मला लोक चिडवायचे...सेकेंड हॅण्ड म्हणून...

आता मी मागच्याच आठवड्यात नवी कोरी i10 sportz घेतली.
आता मात्र कुणी चिडवत नाही..नवी गाडी म्हणून.
तसा मी लोकांकडे फार लक्ष देत नाही.
आणि सल्ले फक्त माझ्या पेक्षा हुशार लोकांकडूनच घेतो..त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो.
काही लोकं अशीची कॉम्प्लेन्ट करतात की -- "शी तुझ्या कडे फक्त 29 इंची टी वि आहे..."
आता काय म्हणणार अशा लोकांना सांगा...
बर्‍याच लोकांनी ज्यांनी मला चिडवले त्यांच्यासाठीच हा ब्लॉग मी अर्पण केला आहे.
मला त्यांना कधी कधी धन्यवाद सुद्धा द्यावेसे वाटतात...कारण "निंदाकाचे घर असावे शेजारी" म्हणतात ना .. तसे ह्या सर्व लोकांमुळेच आजवर मी मला पुढे नेऊ शकलो आहे.
तेव्हा माझ्याकडे सेकेंड हॅण्ड गाडी आहे की नवीन गाडी हे बघण्यपेक्षा तुमच्या कडे काय आहे ह्याचा विचार आधी करावा...

आणि वस्तुंमधे तुलना करण्यापेक्षा विचारांची तुलना केली तर ते जास्त सोपे पडेल...नाही का ??

धन्यवाद.

3 comments:

Aniket Samudra said...

पटलं.
मध्ये मी पण नविन सॅन्ट्रो विकुन सेकंड हॅंड स्विफ्ट घेतली तेंव्हा माझा एक मित्र.. शी मारुतीची काय गाडी घेतोस आणि सेकंड हॅड काय.. मी आयुष्यात सेकंड हॅड आणि/किंवा मारुतीची गाडी घेणार नाही.

आता बघा स्वतःच मारुतीची ६ वर्षापुर्वीची जुनाट झेन घेतोय. काय बोलु मी?

http://manatale.wordpress.com

Jai said...

no comments just wanna said well said....
tyanchya karta actually special blog lihiyachi garaj pan nahiye....
anyways still not bag....
keep it up

Devendra said...

ohhh ... kalale bare ka .... bare zhale ekdache clear karun takle tu te ...

Bare Ek sang .. Company ne watchman thevla aahe ki nahi re tumchya ? Mhanje sahaj dokyat vichar aala mhanun vicharle aple !