अथक परिश्रमा नंतर मधु सॉफ्टवेर इंजिनियर झाला.
घरी जाम आनंदाचे वातावरण होते. आता तरी घरची परिस्थिती थोडी सुधारेल म्हणून वडीलही निर्धास्त होते.
आयुष्य भर काम करून करून जाम झाले होते बिचारे.
मधु ने पण मग विचार केला, ह्यापुढे घराला काहीही कमी पडू देणार नाही.
त्या नुकत्याच कॉलेज मधे पास झालेल्या मुलाने मग गरूड झेप घेतली.
आई वडील अडाणी असले तरी मधु ने मात्र रक्ताचे पाणी करून शिक्षण पूर्ण केले. सर्व इछा मारुन मारुन अनेक वर्ष जगत् राहिला.पण आता त्याला जग जिंकायचे होते आणि तो जग जिंकण्यासाठी निघाला होता.
तो राहत असलेल्या चळितच सुषमा राहायची. लहानपणापासूनच त्याचा तिच्यावर जीव होता.
पण गरीबीच्या मारांने तो इतका झुकला होता की त्याला वर तोंड करून तिच्यावर प्रेम जाहीर करणे ही कधी जमले नाही. सुषमा त्याची परिस्थिती जाणून होती. तिलाही तो मनापासून आवडायचा. काही वेळा शब्द महत्वाचे नसतात, त्याचप्रमाणे त्यांचे अबोले प्रेम चालू होते.
आता मधूच्या सर्व चिंता संपल्या होत्या..तो एक उच्च शिक्षीत माणूस झाला होता.
तोडा फार सेट्ल होऊन सुषमा ला तो आपल्या प्रेमा बद्दल सांगणार होता.
पण त्याला पुढे घडणार्या गोष्टींची कल्पनाही नव्हती.
मुळातच हुशार असलेल्या मधु ला अगदी कमी वेळातच चांगली नोकरी सुद्धा मिळाली.
आनंदी झालेल्या मधु ने देवाचे आभार मानले. मनात सुप्त असलेल्या इच्छा आता जाग्या होऊ लागल्या.
आयुष्य भर चाळीत ल्या त्या 10 बाय 10 च्या खुरड्यात काढल्यावर त्याने लगेच कर्ज घेऊन आई वडिलांना एका मस्त प्रशस्त फ्लॅट मधे आणले.
पगार चांगला असल्याने बँकेनेही कसलीही नाटके केली नाहीत आणि सरळ कर्ज मंजूर केले. मधु खूप खुश होता. त्याने मन भरून आपल्या आई वडिलांना प्रेम दिले होते आणि आज तो त्यांच्या साठी काही तरी करत होता, ह्या भावनेनेच तो भारावून गेला होता.
जागा आईसपाईस मोठी मिळाली तरी मनाच्या कोपर्यातून सुषमा चा रड्वेला चेहरा काही जाईना.
चाळ सोडतांना खिडकीतून हळूच डोकवून पाहणारी आणि डोळ्यात पाणी भरलेली सुषमा त्याला आठवली की मग त्याचे मन वेडे पिसे होऊन जात.
पण आपल्याला आवडलेली सुषमा आपल्या घरच्यांना आवडणार नाही हे त्याला ठाऊक होते...
असला विचार करून मग तो आणखीनच बिथरून जायचा.
आजही त्याला तो दिवस लक्षात होता ज्या दिवशी सुषमाचे लग्न ठरले होते.
तो लग्नाचा दिवसाही त्याला लख्ख आठवत होता. असे काही होईल असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
सुषमा लग्न करून गेली पण तिच्या आठवनी काही मधु च्या मनातून जाईना.
कसे बसे त्याने स्वताहाला सावरले. आणि थोड्याच दिवसात तो तिला अगदी विसरून सुद्धा गेला होता.
कसाबसा आयुष्य जगण्याचा तो प्रयत्न करत होता.
पण नियतीला काही औरच मान्य होते.
लग्न होऊन 2-3 महिनेही होत नाही तोच मधु ला सुषमा चाळीत दिसली.
त्याच्या काळजाचा ठाव गेला. निदान सुषमा बरोबर तरी असे व्हायला नको होते.
इतक्या दिवस गुलाबी निळ्या जांभळ्या रंगात नाहाणार्या सुषमच्या अंगावर पांढरा शुभ्र रंग बिलकुल शोभत नव्हता.
हो, सुषमा लग्न करून गेल्या नंतर अवघ्या 2 महिन्यातच तिच्या नवर्याचे निधन झाले होते.
संपूर्ण आयुष्य तिच्या समोर ओस टाकून तो तिला एकटीला सोडून निघून गेला होता.
त्या बिचारीचा ह्यात काहीही दोष नसतांना तिला सासर कडच्या लोकांनी असे उघड्यावर टाकले होते.
त्या रात्री मधु खूप रडला. पण त्याचा आता काहीही उपयोग होणार नव्हता. होणारी गोष्ट होऊन गेली होती.
हा सर्व जुना विचार करत असतांनाच त्याला जाग आली. आपले आई वडील अशा मुलीला स्वीकारणार नाही हे त्याने जाणले.
मधु मोठ्या धर्म संकटात सापडला होता.
एकीकडे संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले ते आई वडील आणि दुसरीकडे सुषमा.
ह्या दोघांचा मेळ घालणे त्याला काही जमत नव्हते.
गरीब आणि म्हातारे आई वडील आणि एकटी पडलेली सुषमा दोघांनाही आधारची गरज होती.
आणि त्या सर्वांनपेक्षा खरी आधारची गरज होती ती मधु ला....तो फार एकटा पडला होता.
काय करावे कळेना...कुणाला सांगावे ते ही कळेना...
तो आतल्या आत घुस्मटुन गेला होता.
त्याने घरी 1-2 वेळा विषय सुद्धा काढले पण काही उपयोग झाला नाही.
व्यवहारी जगाला भवनाप्रधान मधु चे म्हणणे पटत नव्हते.
तिकडे सुषमा ही बैचैन होती.
तिच्या समोर पूर्ण आयुष्य पडले होते. मनातले प्रेम ओठांवर आणण्यासाठी आता फार उशीर झाला होता.
दुख म्हणून तरी किती दिवस करत बसणार...शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करणे तिला भाग होते.
तिने मग एके ठिकाणी जॉब सुरू केला..थोड्याश्या पगारावर ती जेमतेम भागवू लागली.
मनाच्या कुठल्याश्या कोपर्यात मधु चा विचार सतत चालू असायचा..आणि हे सत्य ही समोर असायचे की मधु चे प्रेम हे माझ्यासाठी मृगजळ आहे.
कामात लक्ष लागेना.
तिकडे सुषमा ला तसल्या अवस्थेत पहिल्यापासून मधु चे ही कामात लक्ष लागेना..
दोघेही बैचैन झाले होते.
एखाद्या माणसावर प्रेम असतांना त्याचा सहवास न मिळणे ह्यासारखे दुसरे नरक नाही..
तोच नरक ही दोघं रोज अनुभवत होती...प्रत्येक क्षणाला....
सुषमा ची तब्येत सुद्धा खालावात चालली होती.
सारखे सारखे विचार करून आजारपण वाढु लागले होते.
न राहून सुषमाने शेवटी निर्णय घेतला.
एक पत्र लिहून तिने मधु चा कायमचा निरोप घेतला.
त्या पत्रात काय होते ते कुणालाही माहिती नाही...पण त्या नंतर मधु सुन्न झाला.
त्याने सर्वांशी बोलणे ही कमी केले...हळू हळू तो गपप्च झाला.
पुढे डोक्यावर परिणाम झाल्याने त्याला हॉस्पिटल मधे भरती करावे लागले..पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
आज सुषमा कुठे आहे हे कुणालाही ठाऊक नाही ...ती कुठे गेली ? का गेली ? कधी गेली..काही पत्ता नाही...
पण तुम्ही नीट शोधलित तर ती नक्की सापडेल .....मधु च्या हृदयात...कायमची...
जग जिंकायला निघालेल्या मधु चा दुर्दैवी अंत झाला....
1 comment:
great story
Post a Comment