Tuesday, May 12, 2009

चिवित्र पणा ...

तुम्ही कधी फॉरिन ला गेला आहात का ?
नाही ?
मग तुमचा कुणी मित्र वैइगेरे गेला आहे का ?
हो ? वेरी गुड....
त्याचे फोटो पहिले आहेत का ?
हो ? वेरी वेरी गुड.....
त्यात जास्तीत जास्त काय दिसते ??
काय सांगता ?? त्याचेच फोटो ??
आहो नाही नवल नाहीए....
काय आहे सामान्यपणे प्रत्येक माणसाचं हेच असतं...
प्रत्येक फोटो मधे मी आलोच पाहिजे असला हट्ट असतो त्यांचा.
कशासाठी कुणास ठाऊक...पण असतो...
अरे माहिती आहे आम्हाला तुम्ही फॉरिन ला गेला होतात...
आता प्रत्येक फोटो मधे तुमचे तोंड खूपसायचे काही कारण नाहीए...
पण नाही..प्रत्येक फोटो मधे बाकीचे सीन कमी .. किंबहुना नाहीच..पण यांचे तोंड मात्र आहे.
ज्या मित्राला आपण रोज पाहतो..किंबहुना भेटतो त्याचेच तोंड फोटोत पाहायला मला IRITATE होते.

बर एक दोन ठिकाणी असेल तर ठीक..पण नाही..हे स्वताहावर इतके प्रेम करतात की प्रत्येक फोटो च्या फ्रेम मधे हे हवेच..
मग कधी ताजमहाल च्या बाजूला मेन फोकस मधे हे आणि बापुडा ताजमहाल त्यांच्या बाजूला केविलवाणा उभा...
तीच तरहा प्रत्येक फोटो मधे..
च्यायला तुम्ही तिकडे आनंद घेण्यासाठी गेला होतात की परत आल्यावर लोकांना काहीतरी शाइनिंग मारायला दाखवावे लागेल ह्या साठी गेला होता ?
नाही .. मी असे नाही म्हणत की असे फोटो काढू नका...
पण आहो ते दुसर्यांना तरी दाखवू नका...
पाहणारा बोलत नाही पण त्याला मनातून "कधी एकदाचा ह्यांच्या घरातून निघतो" असे होते.

आम्हाला माहिती आहे हो..
फोटो मधे तुम्ही एकदम हीरो दिसत असला तरी आतून व्हिलन आहात तुम्ही...
तेव्हा प्रत्येक फोटो मधे कलमाडायची गरज नाही.

पण आपण फोटो कसले काढावे याचीही अक्कल असावी लागते माणसाला.
प्रत्येक फोटो मधे जर आपले तोंड आले पाहिजे असला हट्ट असेल तर मग घरीच मस्त फोटो सेशन करा की.

अजुन एक गंमत म्हणजे...हे लोकं तिकडे कुठल्याही गाडीच्या बाजूला जाऊन उभे रहातात..
माझा एक मित्र आहे सध्या फॉरिन ला..लाई सुखात आहे म्हणतो ..पण
फक्त स्वयंपाक स्वताहा करतो..
कपडे स्वताहा धुतो..
हसतो आणि राडतो सुद्धा एकटाच...पण तो लाई सुखात आहे...असो..

तर त्या कार्टून ने "HAMMER" गाडीच्या बाजूला उभा राहून फोटो काढला..
मी विचारले घेतली का रे? तर म्हणतो हो...हा हा हा हा हा
च्यायला गाडी आवडते ना ?
मग छान पैकी काढ की तिचा फोटो..माधेच तू कशाला हवा ठोंब्यासारखा ??
नाही म्हणजे तुला सांगायचे काय आहे त्यातून ?
अरे मूरखा, जी गोष्ट आपली नाही त्यावर हक्क दाखवून काही उपयोग आहे का ?
तो मालक तिथून ती गाडी घेऊन गेल्यावर तुझाकडे काय उरते ? दगड की माती ?

असले बोरिंग लोक फोटो दाखवून दाखवून इतके हैराण करतात म्हणून सांगू...
पण परत मायदेशी परतल्यावर साधे 1 चॉक्लेट सुद्धा आणत नाही.
ह्यांचा इतका अत्याचार सहन करा...
नको नको ते फोटो उगाच कौतुक करून पहा..
आणि परत फेड नाही ??? अरे हाड....
जेवढ्या प्रेमाने आपण आपले फोटो मित्रांना बळजबरीने पाहायला लावले तेवढ्याच आपुलकीने 1 चॉक्लेट तर आणायचे ना म्हषा....
पण नाही..इथे त्यांचे प्रेम आटुन जाते.
अर्थात सर्वच असे करत नाही..पण बहुतेक असे करतात.

मान्य आहे की आठवणी जपून ठेवल्या पाहिजेत पण त्याचे प्रदर्शन होते त्याचे काय ??
आठवणी ह्या प्राइवेट केटेगरी मधे येतात...नाही का ?

संदीप खरे यांची एक कविता आठवली ---
दाढी काढून पहिला
दाढी वाढून पहिला
चेहरा कंटाळवाणा
पण अबाधित राहिला




5 comments:

साळसूद पाचोळा said...

मस्त विचित्र पना आहे .. काहि काहि फोटो तर इतके विचित्र असतात तरिहि त्याचि स्तुति करावि लागतेच ... आपुलकिने दाखवितात बिचारे .. आपले तरि काय जाते वा वा छान छन म्हनायले ... बिन्भान्डवलि धंदाच आहे ...
very good keep it up..

Aniket Samudra said...

अगदी पटलं. मुर्खांचा बाजार दुसरं काय. सगळ्यांत जास्त पटलं ते म्हणजे पाहिजे तर काढा तुमचे पण फोटो.. पण ते स्वतःकडेच ठेवा ना! प्रत्येकाला तुमचे थोबाड दाखवायची काय गरज. दाखवायचेच तर बाकीचे दाखवा फोटो.

पोस्टशी पुर्ण सहमत :-)

http://manatale.wordpress.com

Adi said...

mitra mala maaf kar pan mi tuzhya ya post barobar purna pane sahamat nahiye....
nahi mi svatah abroad madhe aahe mhanun nahi mhant.
majhya mate photo kadhnya mage aani te publish karnya mage pratyekachya kahi bhavana astat...aani ase anek factors aahet je tu lakshat ghyaves ase mala ek Mitra mhanun vatate...konte te bhetlya var sangench....

Adi said...

baki post uttam lihitos......
mukhya mhanje manatun lihitos....

Mugdha said...

purnapane sahamat!
maajhya mate mi US madhali sagalich prekshaneey thale baghitali aahet aajwar..;) US la na jata ...
shevati jyacha tyach prashna aahe...