मी बालपणी एकदम हुशार होतो...
आताही आहे पण आता शिंग फुटले आहे असे लोक म्हणतात...(मी बैल नसलो तरी... असो)
मी हुशार कसा होतो ते तुम्हाला सांगतो...
मला लहानपणी हमखास विचारले जायचे..."मोठ्यापनी तू काय होणार ????"
मी आपला मनाला वाटेल ते फेकायचो...
फेकायची सवय मला तिथुनच लागली...
कधी डॉक्टर कधी इंजिनियर कधी आर्मी मधे सैनिक...काय वाटेल ते...
आणि महत्वाचे म्हणजे समोरच्याला ऐकायला आवडेल ते मी काही ही फेकायचो...
पण अगदी खर सांगायचे तर मला ड्राइवर व्हयायचे होते...
माझे गाड्यांवर अतिशय प्रेम होते आणि आहे...
त्यामुळेच मला ड्राइवर व्हयायचे होते...पण फक्त मर्सिडीस गाडी चा च...
पण ते काही होऊ शकले नाही... असो..
लहानपणी आम्ही चाळीत राहत असु...
त्यामुळे आमचे विचार सुद्धा 10 x 10 चेच छोटे छोटे असायचे ...
शाळेपासून तर घरा पर्यंत सॉलिड मार खाल्ला मी....
अगदी एकही दिवस असा गेला नाही माझ्या आयुष्यात की ज्या दिवशी मी मार खाल्ला नाही...
सर मॅडम तर हात धून मागे लागलेले असायचे...
त्यांना कोण समजून सांगणार की सर्व जन न्यूटन..आइनस्टाइन नाही होऊ शकत ....
काही लोक सामान्य सुद्धा असतात...
आणि मला खरच रस नव्हता असले कोणी मोठे होण्याचा...
मी अरविंद म्हणूनच खुश होतो...आणि समाधानी होतो
आता मागे वळून पाहतो तर लक्षात येते की लहानपनीच्या काही स्वप्नांचा चुराडा झाला आहे....
जगाच्या रहाट गाडग्यात पिळून निघलेलो आहे....
लहानपणी पैसे नव्हते पण गरज ही वाटली नाही कधी त्याची...
शाळेत अक्षरशहा: फाटलेले कपडे घालून जायचो मी..पण त्याची लाज कधी बाळगली नाही ...
बरोबरीच्या मुलांचे छान छान कपडे, खेळणी ई. पहिले की वाटायचे आपल्याला कधी मिळणार हे सर्व....
कॉलेज मधे साधी साइकल सुद्धा नव्हती....आणि आज काळ चे मुलं मस्त गाडी फिरवतात...
वा वा..मज्जा आहे...
त्यावेळी साधे चॉक्लेट जरी मागितले तरी घरीची मंडळी आणि मास्टर म्हणायचे.... "स्वताहा कमव आणि मग सांग...."
कधी काहीही नवीन मागितले की हे उत्तर तैयार असायचे...
आजच्या जमान्यात बहुधा पालक असले प्रश्न विचारायला धजावत नसतील ...
पोरगं मागतय गाडी, घोडे आणि आई बाप देताय...
काय वाट्टेल ती हाउस पूर्ण करताते...पण त्यामुळे मुलगा वाईट वळनाला वैइगेरे लागत नाहीए ना ह्याची काळजी त्यांना नाही...
आमच्या वेळी मुलं सुद्धा आपल्या ऐपती प्रमाणे राहायची...
उगाच हे पाहिजे आणि ते पाहिजे असला हट्ट केला जायचा नाही....आणि केला तरी तो पुरवला जायचा नाही...
आज मान उंच करून सांगावेसे वाटते..की आमच्या गुरूंनी आणि घरच्यांनी कधी आयता पाण्याचा ग्लास दिला नाही हातात ...तर विहीर खनायला शिकवले त्यांनी....
पैशाचा आदर करायला शिकवला त्यांनी...जो आज पर्यंत उपयोगी येतो आहे...
आजही पैसे नाहीत असे नाही...
पण दिलेली शिकवण लक्षात आहे माझ्या...
म्हणूनच पैसे असतांनाही पीज़ज़ा हट .. मक्डोनाल्डस ...असल्या ठिकाणी जायची गरज वाटत नाही मला...
अगदी कितीही भूक लागली तर आम्हाला आजही आई च्या हातची भाकरी आणि भाजीच गोड लागते....
याला काही मंडळी कंजूषपणा म्हणतात...पण नो प्रॉब्लेम....छाती ठोकून सांगतो मी की आहे मी कंजूष....
काय करणार असल्या घाण सवयी आहेत आम्हाला...
इतके दिवस झाले लहानपण जाऊन पण अजूनही काही गोष्टी स्वछ लक्षात आहेत माझ्या....
शाळेचा पहिला दिवस...
पहिला वर्ग...
ते मित्र .. आवर्जून उल्लेख करावे असे निलेश सोनवणे आणि पराग पालवे.....
पहिले आणि शेवटचे नवीन दपतर...(ज्याला अलीकडे सॅक म्हणतात)
नवीन पुस्तकाचा वास...
वही आणि पुस्तकाला लावलेले नवीन कव्हर....
अशा कितीतरी गोष्टी स्मरणात आहेत माझ्या.... ज्या मी मेल्या शिवाय तरी मिटल्या जाणार नाही....
5 comments:
VAa !! Mitra Assal Likhan
Mala majya lahanpanichi aathavan karun dilis.
good post !!!
Good one dear......
actuality from my point of view you could have made it better, but still its good one......
I liked it....
Hi Arvind,
This is called "TRUE LIFE OF COMMAN MAN"... Ek aam aadmi ki life.
Most of went through the same phase & all that only brought us up to this position.
Moral of the post is : Insaan kitna bhi bada ho jaye par woo choti choti baato mein jo maza hai woo aur kisi bhi baat mein nahi ... Like home cooked food mein jo maza hai woo MacD mein nahi.
A small kid never thinks much & so he speaks what he wants too, but today as we are grown up we think too much on small things rather than enjoying the time.
Fantastic Post Arvind. Keep posting.
Thanks,
Amit
kalpana shakti taral aasli aani javal thdi dhadadi aasli manje aaush kadhi thambt nahi,sukha kadhi thambat nahi, te nity navi navi ugavata,
sukalelya fulana taknyache aaplyakade dhairy hav,navya sukhana jaga karun dhili ki ti na bolvata yetat... nilesh shaharkar
नमस्कार अरविंद पंत,
आता तू हा विचार करत असशील की नेहमी तुला जग्ग्या बोलणारा आणि तुला ज्याच्या तोंडून शिव्या ऐकवाश्या वाटतात तो निलेश सोनवणे आज तुला चक्क अरविंद पंत म्हणतोय...!
आज मी खुप खुश आहे, अरे तू मला पहिला मित्र मानतोस हे वाचून माझा आनंद गगनात मावेना, म्हणुन मी तुला नेहमीच्या स्टाइल मधे जग्ग्या न म्हणता अरविंद पंत असे संबोधले...! असो...
खरच, शाळेत असताना आपण तिघानी किती मजा केली आहे... तू, मी आणि पराग काहीही उद्योग करायचो... धिंगाना, मस्ती अगदी काहीही... तुला आठवते एकदा आपण (आबा-धोबी) खेळत असताना तू धावता धावता बास्केट-बाँल च्या पोलला जावून धड़कालास आणि तुझ्या डोक्याला लागले... तुझ्या डोक्यातून खुप रक्त येत होते, पण तू काही न झाल्या सारखेच दाखवत होतास. शेवटी तुला जेव्हा डॉक्टर चेक करत होते, जखमे वर औषध लावत होते, तेव्हा सुध्हा तू हसतच होता ... ग्रेट...!
तेव्हाच मला कळाले की जगतापच हे कार्ट रडण्यासाठी नव्हे तर लोकाना रडवण्यासाठी जन्माला आले आहे...! [:)]
(माझ्यातला नेहमीचा निल्या आता जागा होतो आहे... तुझ्या ब्लॉग वर शिव्यांचा वर्षाव होण्या आधी मीच तुझी रजा घेतो...)
जय शिवाजी-जय भवानी...
हर हर महादेव..........
Post a Comment