Monday, January 19, 2009

माझी पहिली नोकरी...

मित्रांनो..खरं तर सांगायला लाज वाटते..पण आता विषय निघालच आहे तर सांगतो...
माझी पहिली नोकरी एकदम बन्डल होती..
माझा एम. सी. एस ला असतांना अपघात झाला होता.. म्हणून मला एके ठिकाणी नोकरी करावी लागली....
तिकडे मालक धरून कुणालाही अक्कल नावाचा प्रकार नव्हता...
पहिली नोकरी मिळाली ती सुद्धा 1200 रुपये पगारवर...असली चीड आली होती म्हणून सांगू...
च्यायला..म्हणजे झक मारुन क्षिक्षण केले..एम. सी. एस झालो...आणि पगार किती तर म्हणे 1200...
अरे काही लाज सांगताना ... माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले...
घरी जाऊन काय तोंड दाखवू ???
घरचे काय म्हणतील...वडिलांनी इतके पैसे खर्च केले, आई ने इतका विश्वास ठेवला...त्याचा एका क्षणात चुराडा झाला...
पण मी दगमागलो नाही...देवाने परीक्षा घ्यायचे ठरवले असेल म्हणून बिंदास जॉइन झालो...
काही काळ गेला...पण मला तिकडच्या कामाची पद्धत काही पटेना...
तिकडे कोणीही माझ्या कोडिंग वर विश्वास ठेवायला तैयारच नव्हते....जसा काही मी ह्याच्या आधी बाजारात भज्याच विकत होतो...
आमच्या कॉलेज च्या जमान्यात (पुण्याला असतांना) मी एक चांगला प्रोग्रामर म्हणून ओळखलो जायचो..आणि इथे ही तरहा...
काही दिवस मुकाट पाने सहन केले मी..पण मग नंतर राहावेना...
सारखे वाटायचे की हे करण्यासाठी माझा जन्म नाही झालेला...माझे टार्गेट काही और होते...
मग एके दिवशी त्या दोन्ही बॉस लोकांना घातल्या शिव्या आणि मारली लात त्या नोकरी ला...
पुढे काही वर्ष असेच काही से जॉब केले...आले जे वाट्याला ते सर्व सहन केले...
पण देवाने शेवटी मला जे हवे ते दीलेच...आज मी सुखाने नासिक मधे च नोकरी करत आहे...
आणि स्व गावी राहण्याची सुखे अनुभवत आहे...

तुमची ही अशीच काहीशी कथा असणार हे मला नक्की ठाऊक आहे...
आता तुम्ही जर कठीण प्रसंगातून जात असाल तर लक्षात ठेवा....देव आहे नक्की कुठेतरी आहे...
आणि तो पाहतो आहे...तुमची जिद्द...मेहनत करायची तैयारी...
तो नक्कीच सर्वांचे चांगले करेन..
बोला गणपती बाप्पा मोरया....

3 comments:

Unknown said...

Too Good & motivating. The fact is everyone can compramise upto some extent & after that "Laat Ghala" & bhago ... :)

Arvind said...

Thanks Amit for your comment...

Narendra said...

humm its with most of our batch mates....even i done my first job without any salary fo 3-4 months then i got only 1500 rs..fir same thing ghaal shivya aani maar laath... and after 4 months of berojgari i got settle with CMM level 5 company and working there from last 4 yrs... gr8 1

Narendra