Friday, January 15, 2010

परत गॅलरी मधे जाण्याची माझी हिंमत होणार नाही ...

आज सकाळी (म्हणजेच) तुमच्या दुपारी उठलो. माझी झोपेतून उठाल्यानंतर एक सवय आहे.
मी कधीही झोपेतून उठलो की पहिले गॅलरी मधे जातो..बाहेरचे वातावरण पाहतो...मस्त वाटते..
पण आज मात्र बाहेर जे पहिले ते पाहून माझे डोके सटकले. आमच्या बिल्डिंग च्या खाली एक मस्त एकदम छान असे झाड आहे. त्या झाडकडे पहिले की एकदम शांत वाटते. आज जेव्हा मी बाहेर पहिले तेव्हा ते झाड मला चक्क तोडलेले दिसले.
बस..माझा सर्व मूड डाउन झाला.

कुठल्या हरामखोराणे ते झाड तोडले असेल ह्यावर माझ्या डोक्यात वादळ चालू झाले.
रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या असलेल्या झाडाला कोण कशाला तोडेल हेच मला समजत नवते.
तेवढ्यात आई म्हणाली - खाली जे डॉक्टर चे क्लिनिक आहे ना त्याने तोडायला लावले ते झाड. कारण काय तर त्याची पाटी दिसत नव्हती म्हणे..

वास्तविक पाहता हा डॉक्टर दिवसभर अगदी माशा मारत बसलेला असतो.
त्याच्याकडे कुत्रे सुद्धा येत नाही.( तो जानावरांचा डॉक्टर नाही). बापाने कष्टाने शिक्षण केले आणि बपाच्याच पैशाने ह्याने क्लिनिक चालू केले. अशा कुठल्याशा मूर्खाने कुणीतरी दुसर्याने लावलेले झाड तोडले.
आयुष्यभर दुसर्यांच्या उपकरावर जगणार्‍या ह्या माणसाला ते झाड तोडतंना काहीच कसे वाटले नाही ?
विशेष म्हणजे आपण ते झाड लावले नाही तर मग आपल्याला ते झाड तोड्याचा हककच उरत नाही.
इतके साधे सुद्धा त्या गढवला समजू नये ?

संपूर्ण जग ओरडून ओरडून झाडे लावा-झाडे जगवा सांगत असतांना कुणीतरी शुल्लक माणसाने झाड तोडावे ?
अशा माणसाला कोण डॉक्टर म्हणेल ? साला झाडे लावायचा पत्ता नाही आणि झाड तोडायला पहिला नंबर ?

बर इतके करूनही काय कमावणार हा माणूस ? पैसा ?
अरे ज्याला ग्लोबल वॉरमिंग साठी काही करता येत नाही त्याने कितीही पैसा कमावला आणि अगदी मर्सिडीस जरी घेऊन फिरला तरी काय फायदा आहे ?

क्लिनिक चे नाव काय तर म्हणे "संजीवनी" अरे हाड...कुत्रा साला..
पैसा कमवण्यासाठी इतका घानेरडा प्रकार ? लाज कशी वाटत नाही रे ह्या लोकांना ?
अशा लोकांची धिंड काढली पाहिजे .. माणुसकीच्या नावाला कळिम्बा आहेत हे.

खरच मनापासून सांगतो की मला खरच अगदी घरातले गेले इतके दुख झाले आहे. माझे फार आवडीचे झाड होते ते.
बेअक्काल माणूस साला..
मी तर ठरवून टाकले आहे की - मारणे पसंत करेन मी पण पुन्हा ढुन्कुनही त्याच्या क्लिनिक ची पायरी चढनार नाही.
अशा माणसांपेक्षा डुकर बरी....

पण सांगायला आनंद वाटतो की जवळच्याच एका माणसाने हा झाड तोडतंनचा प्रकार पहिला आणि लगेच त्याला थांबवले.
तो पर्यणत बरेच झाड कापून झाले होते. बहुतेक तो माणूसही माझ्या सारखाच निसर्ग प्रेमी असावा..कारण तो इत्क्यावर थांबला नाही तर त्याने लगेच महानगर पालिकेत त्या डॉक्टर विरुद्ध कंप्लेंट केली.

महानगर पालिकेले लोकं येऊन त्याचे नाव लिहून घेऊन गेले आहे.
पुढे काय होईल माहिती नाही. पण माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली आहे.

पण खरच सांगतो की परत गॅलरी मधे जाण्याची माझी हिंमत होणार नाही .. :(

- एक दुखी निसर्गप्रेमी...

4 comments:

अपर्णा said...

ह्म्म्म्म...खरंच शिकली-सवरलेली माणसं अशी कशी वागतात काय माहित...एक निसर्गप्रेमी म्हणताय म्हणून एक सांगु का??जमलं तर तुम्ही स्वतःच एक झाड लावा... गांधीगिरी म्हणून नाही तर आपला खारीचा वाटा म्हणून....असं म्हणतात झाड लावताना फ़ळाची आशा धरू नये...:)

रोहन... said...

तू तक्रार केलीस की नाही ?? कारण अगदी स्वतःचे झाड़ असले तरी ते तोडायला परवानगी लागते... सोडू नकोस.. जाउन कम्प्लेंट कर आणि त्याला शिक्षा व्हायला हवी रे..

Suhas Diwakar Zele said...

हो, बरोबर म्हणतोय रोहन, जाउन कम्प्लेंट कर

Sandeep said...

एकदम छान, जगतापांना शोभेल अशा भाषेत लिहिलीय अगदी.