Thursday, April 16, 2009

शिक्षण...

साला एक जमाना होता.
आमचे सर मॅडम आम्हाला सॉलिड चपटाळून काढायचे.
मागचा पुढचा कसलाही विचार न करता.
पण आम्हाला कधी काही वाटले नाही त्याचे.
कारण एकच - ते आमच्या भल्यासाठी काही तर करत आहे हे मनात ठाम असायचे.

त्यामुळे तो मार सुद्धा काही तरी शिकवून जायचा.
ते म्हणतात ना - छडी लगे छम्छम विद्या येई घम घम (कृपया विद्या म्हणजे विद्या बालन नाही.. उगाच फालतू विनोद नको)
आम्ही..म्हणजे मी तरी खूप मार खाल्ला शाळेत असतांना.
म्हणजे केस माझे कधीच कापलेले नसायचे..त्यावरून तरी हमखास मार असायचा मला.
हे झाले एक कारण. अशी हजारो करणे आहेत की ज्यामुळे मला बेदम मार खावा लागला आहे लहानपणी.

आजही मला माझे सर्व शिक्षक आठवतात.
काही आवडते तर काही न आवडते.
विशेष म्हणजे शारीरिक शिक्षण ह्या विषयासाठी आम्हाला एक सर होते.
त्यांचा सॉलिड राग आहे मला अजूनही.
आहो आमच्या स्पोर्ट्स रूम मधे शाळेने आमच्याच फी भरलेल्या पैशामधून क्रिकेट किट घेतले होते.
फार जीव जायचा ते खेळण्यासाठी.
पाचवी ला असतांना वाटायचे की सहावीत गेल्यानंतर तरी मिळेल...
सहावीत गेल्यानंतर वाटायचे की सातवीत तरी...आठवीत तरी...
असे करता करता दहावी सुद्धा पास झालो आम्ही पण ते किट काही बाहेर आले नाही.

च्यायला संताप संताप व्हायचा नुसता...
तीच तरहा कंप्यूटर ची.
शाळेत असतांना कौतुकने कंप्यूटर विषय घेतला.
कमीतकमी कंप्यूटर बघायला तरी मिळेल ह्या आशेने.
पण तिथेही तेच. तो मास्टर प्रॅक्टिकल च्या वेळी सुद्धा वर्गात बसवून थेरी शिकवत बसायचा.
का ??? हा अन्याय का ?? हे मला आज पर्यंत समजलेले नाही.

आज मी सॉफ्टवेर इंजिनियर झालो...अगदी पोस्ट ग्रॅजुयेशन सुद्धा केले कंप्यूटर मधे मी.
पण शाळेने काही हातभार लावला असे म्हणता येणार नाही मला..सॉरी..
हा पण त्या वेळी जर कंप्यूटर ला कमीत कमी हात जरी लावू दिला असता आमच्या मास्टरांनी तरी थोडी का होईना चालणा मिळाली असती.
पण नाही.
शाळेतील प्रत्येक वस्तू फक्त पाहण्यासाठी.....
फक्त बघत राहा...डोळे दुखे पर्यंत....पण ती मिळणार मात्र नाही.

मग मला फार चीड यायची.
किती वेळा सांगून झाले शिक्षकांना पण काही फरक पडला नाही.
आम्हाला हवे ते जर शिक्षक देत नाहीत तर आम्ही सुद्धा का म्हणून त्यांचे ऐकायचे ??
मग बंड पुकारले जायचे. फिज़िक्स च्या वेळी टेस्ट ट्यूब फोडल्या जायच्या.
वर्गात गोंधळ व्हयायचा. कवायतीच्या तासाला वेडे वाकडे व्यायाम केले जायचे.
बेंच कोरले जायचे. फळे उगाच रंगवले जायचे...खूप धिंगाणा व्हयायचा.

त्या मानाने आजची मुलं खरच नशिबवन आहेत.
काळाप्रमाणे शाळांनिही स्वताहाला बदलले आहे.
आता तर बालवाडी पासूनच हे लोक जाहिरात करतात - कंप्यूटर वैइगेरे, ए सी क्लासरूम...च्यायला मजा आहे.

आजही पि. टी किवा कंप्यूटर चे सर समोर दिसले तर वाटते की त्यांना ओरडून ओरडून विचारावे की सर का तुम्ही असा अन्याय केला आमच्यावर ?

आम्ही असे काय घोडे, गाढव मारले होते शाळेचे म्हणून हा सूड उगवला तुम्ही आमच्यावर ?

शाळेत असतांना संस्कृत ही भाषा शिकायला मला जिवावर यायचे.
मला नाही जमायचे ते - रामा रॅमो रामहा प्रथमा...द्वितीया...काही काही कळायचे नाही मला.
वीट यायचा शिक्षणाचा.
तेव्हा सुद्धा संस्कृत च्या मॅडम रोज समाचार घ्यायच्या माझा.
आले चुकुन तर ठीक, नाहीतर टोले...
यायचे काही नाही मला, म्हणून टोले ठरलेले.

अरे मान्य आहे की संस्कृत ही आपल्या देशाने सर्वांना दिलेली फार मोठी देणगी आहे...मान्य आहे.
पण मला नाही झेपत ती तर मी काय करू ?

आणि माझे आजपर्यंत संस्कृत न आल्याने काहीही अडले नाहीए.
मी किराणा दुकानात गेल्यावर - "त्वं किराणा देव्स्य" म्हणत नाही.
आणि जेवायला बसल्यावर - अहं खादामि म्हणत नाही.
ऑफीस मधे सुद्धा - अहं काम करश्यासे वैइगेरे म्हणत नाही....
मग काय फायदा त्याचा ??

मला कंप्यूटर मधे इण्टरेस्ट होता त्यावेळी...ते तर मला नाही दिले..मग माझ्या डोक्यावर काही ही आपटले तरी काही फायदा होणार आहे का ?
शेवटी माणसाची इच्छा ज्यात असेल तेच काम तो चांगले करू शकतो - हे एकमेव सत्य आहे.

मग मला ज्या वयात कंप्यूटर शिकायची तीव्र इच्छा होती त्यावेळी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र .. ई. ई. विषयांनी माझे जीवन कुरटडून टाकले अगदी.

त्यामुळे मला तरी वाटते की माणसाला खरच ज्याची गरज आहे त्याचे शिक्षण देणे त्याला महत्वाचे आहे.

मी बर्‍याच वेळा वाचले आहे की काही लोक अगदी दुर्गम भागात जाऊन त्यांना शिक्षण देतात.
सॉरी, पण मला नाही पटत ते.
तुम्ही आदिवासी लोकांना जर A,B,C,D... शिकवायला लागले तर त्यांना त्याचा काय फायदा ?
पण तेच त्यांना जर त्यांना भूगोल वैइगेरे शिकवले...जे त्यांना उपयोगी पडेल रोज च्या जीवनात , तर ते महत्वाचे आहे.
की जेणे करून दिशा कशी ओळखावी, पक्षांचे स्तलांतर म्हणजे काय...असले काही तरी शिकवले तर त्याचा त्यांना काहीतरी फायदा आहे. नाहीतर त्यांच्या समोर A,B,C,D.. चे डोकं फोडून काही फायदा नाही.

उदाहरणार्थ - जर जंगलात तुम्ही प्राण्यांसाठी शाळा सुरू केली तर विषय कुठले कुठले ठेवणार तुम्ही ?
कारण जर तुम्ही उडण्यासाठी चा विषय ठेवला तर वाघ सिंह त्यात नापास होतील...
आणि ताकदीचा विषय ठेवला तर पक्षी त्यात फेल होतील.
झाडावर चढायचा विषय ठेवला तर मकडाशिवाय जास्त कोणी पास होऊ शकणार नाही.

अशीच काहीशी अवस्था आपलीही आहे.
आपल्याला कशात इण्टरेस्ट आहे ह्याचा विचार करायला वेळचं भेटत नाही.
कारण एकदा आपण 5 वर्षाचे झालो की बालवदिपासून शिक्षण नावाचे भूत आपल्या मागे लागते.
आणि ते कमीत कमी 10 वी झाल्याशिवाय आपला पीछा काही सोडत नाही.

तो पर्यंत कुणीतरी नेमुन दिलेल्या किवा कोणीतरी ठरवलेल्या आभ्यासावर रट्टा मारुन पास होन्यावर आपण जास्त भर देतो.
त्यात काही जन पाठांतर छान असल्याने बोर्डत येतात...आणि काही जन त्या स्पर्धेत नापास होतात.
म्हणून आपण त्यांना "ढ़" म्हणणे चुकीचे ठरेल.

एखादा नापास झाला म्हणजे तो "ढ़" असे नाही.
असेही असु शकते की त्याचा इण्टरेस्ट दुसरीकडे असेल...आणि तो वाट पाहत असेल की कुणीतरी येऊन मला त्या विषयात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करेल.

आणि शाळेचे शिक्षण महत्वाचे असेलही पण खरे शिक्षण आहे ते जगात जगण्याचे.
शेवटी देवानेही पहिल्या माणसाला जेव्हा जन्माला घातले असेल तेव्हा कुठे पहिली, दुसरी होती.....तो ही अनुभवातूनच शिकत गेला असेल की नाही.
बस हा थोडा विचार करायचा मुद्दा आहे...बघा विचार करून थोडा.
आणि हो पण कुणी तुम्हाला भेटला की जो नापास झाला आहे तर कृपया त्याला "ढ़" समजू नका, सध्यातरी हीच विनंती आहे.

Gmail Down For sometime...



We do not see this normally...so I took screenshot when gmail was actually down.


Tuesday, April 14, 2009

निवडणुका आणि आपण

निवडणुका आल्या...
आणि ह्यांची फक्वेगिरी सुरू...
असले डोके पिकले आहे म्हणून सांगतो...
च्यायला, सर्व साले हरमखोर आहेत...
काय एकमेकांवर आरोप चालू आहेत वा वा..
छान प्रतिमा ठेवताहेत तुम्ही देशा समोर.
एक म्हणतो पंतप्रधान दुबळा....दुसरा म्हणतो मला हे म्हणणारा कुठे गेला होता कंधार हाइजॅक च्या वेळी...
अरे बस करा रे ही फालतू गिरी...
च्यायला स्वतहाचे भांडं विसरून जरा देशकडे बघा जरा.
सल्यांनो तुम्ही देशाची दशा आधीच बिघडावून ठेवली आहे आणि आता काय बोंबाबोंब चालू आहे ?
काही लाज तरी ठेवा..माहिती आहे मला राजकारणात आल्या पासून ती सुद्धा विकली आहे.

लोकांची मतं मिळवण्यासाठी काय वाटेल ते करतील हे.
एक जन जय हो चे गाणे कॉपीराइट घेऊन वापरतो आणि दुसरा त्याची मोडतोड करून वापरतो.
ए. आर. रेहेमान ने ते गाणे तुमच्या सारख्या फालतू माणसांसाठी नाही लिहिले.

सगळीकडे साला ह्यांचाच प्रचार.
निवडून आल्यानंतर काय उखडून घेणार आहात तुम्ही ??
ह्यांच्या सारखे नालायक लोक अजुन पर्यंत पैदा झाले नव्हते कधी.
तो लालू इतका भ्रष्टाचार करून सुद्धा वर तोंड करून फिरतो आहे.
त्याचे काय उखडून घेतले तुम्ही सर्वांनी ?
संसद भवन वर हल्ला करणर्‍याचे काय उखडून घेतले तुम्ही ?
लांब कशाला, त्या कसब चे काय उखाडले तुम्ही ?
आम्ही भरलेल्या इनकम टॅक्स च्या जिवावर त्याला खाऊ पिवू घालताहेत ना ?
नीट काळजी घ्या हा त्याची...उगाच बिछार्याला सर्दि खोकला होईल.

त्या शरद पवारचा तर पंतप्रधान होण्यासाठी काय जीव चालला आहे काय माहिती.
रोज कुठल्या ना कुठल्या पक्षाचा उंबरठा झीजावत असतो तो.

हे साले निवडणूक आली की गरीबा सारखे मतं मागणार..आणि नंतर बॅंक भरणार.
बरं निवडणुकीला उभे कोण रहातात ?
गल्ली बोळतील ह्या आणि अशाच पक्षचे लोकं.
त्यांना मत नाही द्यायचे तर मग कुणाला द्यायचे मग आपण ??
कारण आपल्या समोर ऑप्षन असायला हवा ना ??

इथे लोक 2 वेळ चे जेवायचे कसे मॅनेज होईल ह्याचा विचार करतात आणि हे हारामखोर पैसे खातात.
बरं खातात तर खातात किती ??? काही लिमिट ??
ह्यांचा बॅंक बॅलेन्स ऐकून आपल्याला घाम फुटतो.
आमचा पगार कमी असला तरी साला इनकम टॅक्स किती भरावा लागेल ह्याच विचारणे घाम फुटतो...
आणि हे बघा...बिंदास डिक्लेर करतात...400-500 कोटी संपत्ती....

तुम्हाला माहिती नसेल कढचीत म्हणून सांगतो.
निवडणूक लढवतांना आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याचा तपशिल द्यावा लागतो.
आता मला सांगा..एखाद्या कडे निवडणूक लढविण्या आधी 100 रुपये असतील आणि नंतर पुढे त्याच्या कडे 1000000 रुपये असतील तर साहजिक आहे की त्याचा 1 तर पगार इतका नाही.
म्हानुजे त्याने नक्की पैसे खाल्ले असणार...
ही गोष्ट माझ्या सारख्याला समजते पण त्या पक्षा मागे धावणार्या लोकांना समजत नाही.
तुम्हाला ह्या लोकांची गंमत सांगतो..पैशा साठी कुठल्या थराला जातील हे बघा...
आमच्या जुन्या घरच्या, जुन्या म्हणजे अगदी मी शाळेत असतांनाच्या, एरिया मधे एक नगर सेवक राहायचा.
त्याने निवडून आल्या नंतर इतका पैसा खाल्ला की त्याला तो नंतर लपावणे ही कठीण होऊन बसले.
बर इतका पैसा खाऊन त्याचे समाधान होईल तर तो राजकारणी कसला ?
5 वर्ष खा खा पैसा खाल्ला...पण नंतर पुढे आमचा वार्ड महिला आरक्षित झाला.
तर त्या थोर पुरुषाने त्याच्या बायकोला उभे केले.

ज्या बायकोला तो रोज तुडव तुडव तुडवायचा तिला जनतेची सेवा करायला उभे केले.
ज्या बाई चे घरात तिचा नवरा ऐकत नाही, ती जनतेची सेवा करणार का ?
आणि अशा बाई ला तिचा नवरा तिचा असा 1 तरी निर्णय घेऊ देईल का ?
अरे लाज वाटली पाहिजे .. बर आख्ख्या गावाला माहिती की हा बायको ला तुडवतो तरी त्याच्या प्रचाराला ही गर्दी.....
लोकं पण फार भिकारी बाबा...पैसे मिळाल्यास काय वाटेल ते करतील.

कॉंग्रेस ची एक आड पहिली ..
एक शेतकरी सांगत असतो...की कॉंग्रेस ने माझे कर्ज माफ केले म्हणून मी माझे मत त्यांनाच देणार.
अरे वा..छान आहे म्हणजे. कर्ज माफ करायला सोनिया बाई ला काय जमीन उपसावी लागली की डोंगर खोदावा लागला ?
नियम बनवणारे हेच आणि आमलत आणणारे हेच. मग काय ... नुसता नांगा नाच.


प्रत्येक पक्ष आपापले काही ना काही (कळीचे) मुद्धे घेऊन रिंगणात उतरला आहे.
मी काही कुन्या एका पक्षा ची बाजू घेणार नाही किवा मला तसे काही करण्यात काही हौस ही नाही.
पण मी तुम्हाला ह्या ब्लॉग द्वारे विनंती करू इच्छितो की प्लीज़...आता तरी सुधरा.
भ्रष्ट आणि नालायक लोकांना मतं देऊ नका.
मत देण्या आधी नेत्याच्या नावावर कुठला गुन्हा आहे की नाही ते जरूर पहा...कारण गुन्हेगार नेता मारझोड करण्या शिवाय काहीही करू शकत नाही.
आणि हो त्याचे शिक्षण पण पहा.

लक्षात ठेवा...हे लोक आपले मालक नाहीत...आपले सेवक (नोकर) आहेत.
आणि निवडून आपण त्याला आपल्या देशाची काहीतरी प्रगती होण्यासाठी देतो...निवडून आल्यावर भरपेट पैसे खाण्यासाठी नव्हे.

दरवेळी कुणीतरी निवडून येणार.
मग तो त्याचे घर प्रशस्त बांधणार...
आपल्या नातेवाईकांना मोठ्या पगाराच्या नोकर्‍या लावणार...
घरच्यांच्या नावावर लाखो-करोडो रुपये ठेवणार...
आलिशान गाडीतून फिरणार..
आपल्या सहकार्यांचे खिसे सुद्धा भरणार...
5 वर्षात 50 वर्षाची कमाई करणार..
आणि ऐशोारमात राहणार...

पण आपण ????
रोज सकाळी उठून तीच तीच महागाई वाढली ची तक्रार करणार ....
त्याच छप्पर नसलेल्या बस स्टॉप वर उभे राहणार...
हजारो खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालणार...
आणि आता आहोत तसेच जगणार........
पण आपण जर आता नीट उमेदवारला वोट दिले तर ही परिस्थिती आपण बदलू शकतो..
सच्चे को चुनीये..अच्छे को चुनीये

तेव्हा विचार पक्का आणि भ्रष्ट नेत्याच्या तोंडावर बुक्का....

जय हिंद.

Monday, April 6, 2009

विचार बदला..

मी आज एका नातलगकडे गेलो होतो.
कसलिशी पूजा होती त्यांच्या कडे म्हणून मला बोलावण्यात आले होते.
मी गेलो.
त्यांचे घर एकदम प्रशस्त. टुमदार बंगलाच होता.
मी माझी गाडी पार्क केली तोच त्यांच्या घरातून धुराचा लोट च्या लोट बाहेर पडत होता.
मला थोडे टेन्षन आले पण पहिले तर काय ?? तिकडे होम चालू होता.

जवळपास 8-10 ब्राम्हण जोर जोरात मंत्र म्हणत होते.
मला सांगण्यात आले की ही पूजा 3 दिवस चालते.
मी म्हटले छान.
मग मी जाऊन एका कोपर्‍यात बसलो. मी त्यांची मजा पाहत होतो.
थोडे मंत्र म्हणून ब्राम्हण ऑर्डर द्यायचे, "1 मोठं भांड भरून शुद्ध तूप आणा..."
लगेच सगळीकडे धावाधाव...
सर्व जन तूप आणण्यासाठी पाळायचे.
मग नंतर फुलं...अगरबत्ती...काय वाटेल ते मागणी व्हयायची. आणि सर्व जन नुसती पळापळ करायचे.
मी मजा पाहत होतो.

इतक्यात एक भिकारी तिथे आला. साधारण 70-80 वय असेल त्याचे.
कपडे फटके घालणार्‍याला साधारण आपण भिकारी म्हणतो...म्हणून मी भिकारी म्हणालो.
एकदम सुकलेला होता तो. जणू काही जगण्याची इच्छा संपलेला.
त्याने पहिले की इथे पूजा चालू आहे म्हणून तो दारा बाहेर बसला काहीतर मिळेल ह्या आशेने.
त्याला घरातल्या काही मंडळींनी पहिले.
पुजेत कशाला हे विघ्न म्हणून त्यांनी त्याला हुसकावून लावले.
मला फार संताप आला.
तो बिचारा कसला विघ्न ???
तो तर तिथे शांत बसला होता. त्याने एका शब्दानेही काही अजुन मागितले सुद्धा नव्हते.
आणि त्या होमा मधे 2-4 बादल्या तूप ओतण्यापेक्षा त्या गरिबाला किमान एक पोळी तरी दिली असती.
जिवंत माणसाचे हाल करून देवाला पूजन्यात काय धर्म आहे ?
फक्त कुणी एक ब्राम्हण सांगतो म्हणून हांडे च्या हांडे वाया घालवणे मला पटत नाही.
इतका संताप संताप झाला म्हणून सांगू.
मी सरळ उठलो आणि पूजा आणि जेवण न करताच तिथून निघून गेलो.
मला नाही जमत असला भोंदु पणा.

तुम्हाला जर खरच देवाला प्रसन्न करायचे असेल तर असल्या पूजा करण्यापेक्षा सरळ जाऊन एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन त्याना काहीतरी करा.
एखाद्या शाळेत जाऊन गरीब मुलांना वह्या पुस्तक वाटा.
एखाद्याला रक्त दान करा...अशा आणि आणखी बर्‍याच प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात.

मला पर्वा नाही की तुम्ही काय म्हणाल ते.
I just don't care... because I know i am not talking something weird.
युगानुयूगे जे चालत आले आहे ते थोडे तरी बदलायला हवे आहे.
We can not follow each and everything blindly.

भगवान श्री कृष्ण सुद्धा सांगतात, की प्रत्येक माणसमधे देव आहे.
मग आपण त्याची पूजा का नाही करत ?
जे लोक फार देव देव करतात त्यांनी आयुष्यात नक्कीच फार पाप केलेले असते.
ते लपवण्यासाठी हे लोक देव देव करतात.
जर आपण स्वटहाशी प्रामाणिक राहिलो आणि दुसर्यांना त्रास होणार नाही असे वागलो तरी देव प्रसन्न होईल.
त्यासाठी 4-4 दिवस पूजा करण्यात काहीच अर्थ नाही.
आणि पूजा करून मन शुद्ध होत नसते. त्यासाठी विचार बद्लावे लागतात.
विचारांनी मन पवित्र असले की देव आपोआपच प्रसन्न होतो.
त्यासाठी 10-10 किलो तूप आणि उगाच पैसे वाया घालवायची गरज नाही.
तेव्हा समोरच्या माणसाला मदत करा...देव नक्की प्रसन्न होईल.

Friday, April 3, 2009

Why google is so successful ???

आज एक बकवास वेबसाइट पहिली..
म्हणजे बर्‍याच दिवसापासून माहिती आहे मला ती वेबसाइट.
आज न्यूज़ मधे वाचलं की गूगल विकत घेणार आहे म्हणे ती साइट.
FUCK OFF ....

च्यायला त्या साइट मधे काहीच नाहीए..पण मग ती इतकी फेमस कशी झाली ?
तुमच्या आमच्यामुळेच हो...
सध्या सर्वांना टाइम पास हवा आहे.
इंटरनेट आज जवळपास सर्व घरांमधे आहे..पण त्याचा उपयोग काय होतो आहे, आपण ते कशासाठी वापरतो आहे ह्याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही.
मग ते ओर्कुत असो नाहीतर फेसबुक .. सर्व लोक नुसता टाइम पास करतांना दिसतात.
काही फायदा होत नाही ह्या साइट नी...हा साइट वाले पैसा मात्र छान कमावतात.

आधी गूगल मला ग्रेट कंपनी वाटायची, पण आता नाही.
गूगल एक मोनॉपली तयार करत आहे.
गूगल चे स्वतहाचे असे डेवेलप केलेले प्रॉडक्ट म्हणजे फक्त जाहिराती चे ज्याला आपण गूगल Ads म्हणतो.
त्यानंतर गूगल मॅप वैइगेरे नंतर आले..पण सर्वात प्रथम गूगल Ads होते फक्त.

मध्यंतरीच्या काळात गूगल ने मस्त डोके वापरले.
त्यांनी मार्केट चा आढावा घेतला आणि कुठल्या अशा साइट आहेत ज्या जास्त चालतात, अशा शोधून काढल्या.
आणि पुढे जाऊन त्या विकत घेतल्या.
ह्या मधे गूगले ने काय केले ???? तर फक्त ती कंपनी किंवा त्या कंपनी चे प्रॉडक्ट विकत घेतले.
त्याला आपल्या नावाचा शिक्का लावला आणि परत तेच प्रॉडक्ट गूगल च्या नावाने बाजारात आणले.

तुम्ही जर आज पहिले तर आज जवळ पास बर्‍याच वेबसाइट्स गूगल ने हव्या तेवढ्या पैशांना विकत घेतल्या आहेत.
त्या उलट माइक्रोसॉफ्ट ला हे जमले नाही..बिल गेट्स मागे पड्न्याला हेच कारण आहे.
त्याने माइक्रोसॉफ्ट मधे स्वताहा सर्व निर्माण केले. त्याने कधी कुठल्या कंपनी ला ओवर्टेक करायचा प्रयत्न केला नाही. (निदान सुरवातीच्या काळात).
तो फक्त विंडोज सॉफ्टवेर डेवेलप करत राहिला...आणि गूगल ने त्याच्या मागून फक्त 10 वर्षात त्याच्या पुढे जाण्यासाठी मार्ग शोधून काढला.

तुम्ही नीट पहाल तर तुम्हाला ही हे जाणवेल की गूगल ही कंपनी "सावकार" असतो ना त्याच्या सारखी आहे.
हे सावकार सुद्धा पहा... खेड्यात जाऊन तिकडच्या लोकांकडून त्यांच्या वस्तू कमी पैशात विकत घेतात.
आणि शहरात जाऊन त्याच वस्तू जास्त पैशांना विकतात...काहीसे असेच गूगल करत आहे.
अशाने वेबसाइट किवा प्रॉडक्ट बनवणारे मात्र थोड्या पैशात खुश होतात आणि गूगल आपला पसारा आणखीनच वाढवत जाते.
म्हणून गूगल ला मोठे करण्यात आपणही जबाबदार आहोत...समजले का ?

गूगल ची अजुन एक गंमत सांगाविषी वाटते.
गूगले मधे सर्व कामगार ( इंजिनियर) लोकांना 3 किवा 6 महिन्यात एक प्रॉजेक्ट कंपल्सरी करावा लागतो.
कशासाठी ?? आरे मूर्खांनो...हेच तर..हेच काळात नाही तुम्हाला.
असे वर्ष भरातले सर्व प्रॉजेक्ट एकत्र करून गूगल मग त्यातले टॉप 10 प्रॉजेक्ट काढतो.
आणि मग त्यातला सर्वात छान कॉन्सेप्ट असलेला प्रॉजेक्ट मग गूगल च्या नावावर लॉंच करतो.
हा ज्याची ती कॉन्सेप्ट असते त्याला काही तर बक्षिश मिळते पण जास्त फायदा कुणाचा होतो ???
गूगल ला काही ही न करता रेडीमेड कॉन्सेप्ट आणि प्रॉजेक्ट मिळतात.

बाकीच्या कंपनी मधे डिसिशन हे वरच्या लोकांकडून खालच्या लोकांकडे येतात.
पण गूगल मधे कॉन्सेप्ट ही खालची मंडळी वरच्या लोकांना रेडीमेड देतात.

आणि हेच कारण आहे की ज्यामुळे गूगल आपल्या इंजिनियर ची खूप काळजी घेते.
त्यांच्या साठी काय हवे नको ते सर्व पाहते. आणि म्हणूनच गूगल ही काम करण्यासाठी सर्वात उत्तम कंपनी म्हणून मानली जाते.

पण या सर्वात असे नाहीए की गूगल काहीच काम करत नाही.
करते पण जास्त करून टेकोवर करण्यात तिचा जास्त इण्टरेस्ट आहे असे वाटते.

अभी समझा ??? Why google is so successful ???