लई भारी ना भो...
"सानिया-भूपती एंटर फाइनल ऑफ ऑस्ट्रेलियन ओपन..."
वा क्या बात है....
मागे मी एका ब्लॉग एंट्री मधे सानिया मॅडम वर टीका केली होती..
ती आता मी जाहीरपणे मागे घेत आहे...
तुम्ही मॅच पहिली नसेलच म्हणून सांगतो..झक्कास झाली मॅच...
काय राव...माणूस आहात की मुंगूस तुम्ही... ???
ही घ्या आता हाइलाइट्स बघा...
भूपती ला मानले आपण..
साला क्या खेळता है ??? वा एकदम कडक...
तुम्हाला माहिती नसेल म्हणून पुन्हा एकदा सांगतो...
भूपती हा मेन्स च्या डबल्स च्या फाइनल्स मधे सुद्धा पोहोचला आहे..
उद्या मॅच आहे ती...
भूपती तोड्लस मित्रा...एकदम तोड्लस...
त्याच्या कडे ऑलरेडी 6 grand slam titles आहेत...डबल्स चे...
काय म्हणावे या माणसाला..
एकच खंत आहे.. भारता मधे क्रिकेट सोडून इतर कुठल्या ही खेळा ला फार कौतुक आणि पैसा मिळत नाही...
ही दयनिय अवस्था आहे...
मला माहिती नाही की आपल्यापैकी किती लोक टेनिस प्रेमी आहे..
पण मी मात्र आहे...आणि भारता तर्फे कोणी खेळत असेल तर मी आवर्जून टेनिस मॅच पाहतोच...
तसा इतर वेळी सुद्धा पाहतो .. पण फक्त लेडीज टुर्नामेन्ट्स ....
काय तुम्ही सुद्धा ???? वाह छान....
पण क्रिकेट मला काही झेपत नाही...आणि मी पाहतही नाही...
मागे मी फार क्रिकेट वेडा होतो...पण मग मधल्या काळात जे काही अझरूद्दीन आणि त्याच्या सवंगड्यांनी केले ते पाहून संताप संताप झाला माझा...
तेव्हाच पाणी हातात घेऊन ठरवून टाकले की बस..आज पासून मॅच पहाणे बंद... एकदम भीष्म यांच्या प्रमाणे...
च्यायला म्हणजे आम्ही इकडे डोळे ताणून ताणून आक्खा दिवस घालून मॅच पाहावी आणि ह्या हाराम खोरांनी पैसे खाऊन मजा करायची...
क्या येडा समझा है क्या...?????
पण एकदम खर सांगतो...सचिन ची बॅटिंग पहाणे काही आज पर्यंत मला आवरता आले नाही..
म्हणजे सचिन खेळत असे पर्यंत तरी माझ्या घरी टीवी चालूच असतो...
तो आऊट झाला की स्वयंपाक घरातून लगेच आवाज येतो.. "चला आता उठा..."
काय करणार...उठवे लागते..
पण कोणी काहीही म्हणो..आज मज्जा आली...
ऑस्ट्रेलियन ओपन च्या डबल्स फाइनल्स मधे इंडियन्स...वा एकदम झकास...
टोप्या उडाल्या भाऊ... म्हणजे इंग्लीश मधे (HATS OFF Dude) ...
Keep up the good work... लई भारी...
No comments:
Post a Comment