Thursday, January 15, 2009

जय बजरंग बली की जय....

जय बजरंग बली की जय....
तुम्ही म्हणाल आज अचानक बजरंग बली कसा काय आठवला ह्याला...काही स्वप्नात दारसिंघ तर नाही आला ना ह्याच्या....
नाही नाही...तसे काही नाही....मला देव आठवला त्याला एक कारण आहे...
काय आहे सध्या मी व्यायाम शाळा लावली आहे...म्हणजे मला लावायला सांगण्यात आले आहे...
जळला मोहरा त्या आमीरखानचा... कशाला त्याने बॉडी बनवली काय माहिती...
आता आमची ही सुद्धा मागे लागली आहे माझ्या....
म्हणाली..आमीर सारखी बॉडी बनवा नाहीतर भांडी घसा...रोज....
आता काही पर्याय आहे का माझ्या समोर... ?? सांगा...
लागावे लागले कामाला...शेवटी...वजन उचलने परवडले पण भांडी घासणे नको......
बर आमची आधीची बॉडी म्हणजे एक पसली ची...त्यात आमिर सारखी बॉडी बनवणे म्हणजे एक मोठा कार्यक्रमच ...
मला तुम्ही काहीही करायला सांगा...म्हणजे अगदी हिमेश चे गाणे सुद्धा ऐकू शकतो मी... सन्नी देओल चा पिक्चर सुद्धा बघू शकतो मी...
पण सकाळी उठून व्यायाम करणे म्हणजे...जीव जातो हो माझा...ते माझे गाव नाही...
आणि स्नायू ताणून बजरंग बली होण्यापेक्षा पोट वाढवून गणपती होणे चालेल मला...
तर सांगायचा मुद्दा असा..की सध्या घरी व्यायाम चालू आहे..एकदम जोरात...
आमिर ला ही हेवा वाटावा असा...आणि सन्नी देओल च्या कणखाली मारावा असा....
तेव्हा लक्षात ठेवा .. रस्त्याने जतांना एखादा आमिर सारखी बॉडी असलेला प्राणी तुम्हाला सापडला तर तो नक्की मी असेन....
तेव्हा बोला जय बजरंग बली की जय......

3 comments:

VJ said...

Sahi arechya chukalach ki ho amache .. bola Jay Bajrang bali ki Jay!!!!

Harshal said...

bharich lihayla laglyas re tu gadya... ase kar tu kolhapurla ja... tikde akhadyat ja..mag tuja hoil marathi gajabhau...pailwan ... hahah

Unknown said...

Aga kaay Vijaya...!
Kiti trass deshil amachya chimukalya mitrala...
Tyane body banavanyacha kitihi prayatna kela tarihi to "GHAJANI" cha Amir khan na disata "Rab Ne..." wala Shahrukh disel (Dheri wadhlela) ...
:D