Tuesday, July 21, 2009

Continental Airlines वाल्यांच्या नाना ची टांग...

आज एक बातमी ऐकली, कलाम यांना विमानतळावर अपमानास्पद वागणूक दिली.
माझे डोके फार सटकले हे ऐकून.
प्रत्येक भारतीयाला चीड यावी असेच हे प्रकरण आहे.
जो माणूस एका देशाचा राष्ट्रपती होऊन गेला त्याला अशी वागणूक म्हणजे निरलज्जपणाचा कळस आहे.
कलाम यांचे विमानतळावर सेक्यूरिटी चेक घेण्यात आले.
त्यांचा मोबाइल, बूट वैइगेरे गोष्टी चेक करण्यात आल्या.

आणि हा सगळा प्रकार कुठे घडला तर म्हणे दिल्ली मधे.
च्यायला आजु बाजूचे लोक काय झोपले होते काय ?
त्या माणसाची सरळ गच्ची धरायची ना.
ज्याची लायकी नाही कलाम यांच्या सारख्या माणसांसमोर उभी राहायची त्याने कलाम यांची तपासणी करावी.
कलाम यांचे पण इथे कौतुक करवेसे वाटले.
एखादा भीकरडा मंत्री असता तर त्याने सर्व देश डोक्यावर घेतला असता.
सर्व न्यूज़ चॅनेल वर नुसता हा हा कार माजवला असता.

पण कलाम यांचा मोठेपणा इथे प्रकर्षाने जाणवतो.
त्यानी कुठलेही आधेवेढे घेतले नाही.
संपूर्ण चेकिंग ला सामोरे गेले.
कुठलाही गर्व नाही की माज नाही.
हीच मोठ्या माणसाची लक्षणे आहेत.
कलाम यांना मी देवासारखा मानतो.


आणखी एक गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार होऊन एप्रिल 24, 2009 ला झाला तरी कलाम यांनी एका शब्दानेही त्याचा उच्चार कुठे केला नाही. ना कुठली प्रेस कान्फरेन्स घेतली ना कुठे इंटरव्यू दिला.

मोठ्या लोकांच्या ह्याच गोष्टी त्यांना मोठे बनवतात.
ज्या माणसांकडे फालतू गोष्टींना वेळ आहे असेच आजचे मंत्री लोक आडळापट करतात.

पण खरच कलाम ग्रेट आहेत. ह्यात वाद नाही. पण म्हणून आम्ही असला अपमान सहन करू असे नाही.
मला खरच बघायला आवडेल की आपले हरामखोर नेते मंडळी आता काय दिवे लावतात.

स्वताहा बद्दल असले प्रकार झाले की सर्वांनाच मिरची झोंबते पण आता बघुया काय करतात ते.

पण जाता जाता पुन्हा एकदा.....हॅट्स ऑफ तो कलाम साहेब.
तुम्ही तरुण लोकांसमोर छान उदाहरण ठेवत आहात.
आपली एनर्जी कशी आणि कुठे वापरायची ते दाखवून देत आहात.
हॅट्स ऑफ टू यू सर.....

Monday, July 13, 2009

व.पु.काळे

कधी कधी प्रेमात पडायला कारण लागत नाही.
माझेही असेच झाले..
माझ्या ताई ने मला पार्ट्नर पुस्तक प्रेज़ेंट केले.
वास्तविक पाहता.."वाचन" हा मला वाटणारा सर्वात कंटाळवाणा प्रकार...(म्हणजे माझ्यासाठी)
पण मी जेव्हा ते पुस्तक वाचायला सुरवात केली तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडलो.

- पार्ट्नर, हे व. पु . काळे ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे.
तुम्ही जर वाचले नसेल तर नक्की वाचा.

ह्या पुस्तकाने मला वाचनाची इतकी गोदी लावली आहे की काय सांगू.
सध्या आमच्या घरी व.पु. काळे ह्यांची जवळपास सर्व पुस्तके आहेत.
आणि आम्ही सर्व मंडळी त्यांचे ग्रेट फेन्स झालो आहोत.

त्यांचे अजुन एक आवडलेले पुस्तक म्हणजे - वलय आणि हुंकार.

व.पु. काळे ह्यांचा मी एक भक्त आहे.
पार्ट्नर तर मी इतक्या वेळा वाचले आहे तरी पुन्हा वाचतांना एक नवी मजा वाटते.
खरच, काळे हे एक उत्तम लेखक होते.
त्यांनी लिहिलेले एकूण एक पुस्तक म्हणजे वाचकांना दिलेली पर्वणीच आहे.
व.पु.काळे ह्यांना माझा सलाम.

दिमाग का दही...

काय सांगू ..?
सॉलिड वैताग आला आहे.
माझ्या घरा समोर एक वेलडिंग चे दुकान आहे.
दिवस भर नुसती आदळ-आपट सुरू असते तिकडे.
जरा काही डोळा लागला की लगेच ..धाण धाण...
शी..एकदम बोरिंग...
च्यायला रेसिडेन्षियल एरिया मधे कुणी ह्यांना लाइसेन्स दिले काय माहिती.
माझ्या झोपेचे मात्र खोबरे झाले आहे.
जीव मुठीत घेऊन मी सध्या झोपतो.
बायको म्हणते की काही गोष्टी इग्नोर करायला पाहिजे.
मान्य आहे .. अगदी 100% मान्य आहे.
पण मला नाही जमत ना ते...मी काय करू ?
मी माझ्या रूम मधे सध्या जात सुद्धा नाही...आई च्याच रूम मधे झोपतो.
अगदी वैताग वैताग झाला आहे माझा.

Monday, July 6, 2009

मैत्रीण

बर्‍याच दिवसांनी वाट पाहून पाहून शेवटी एकदाचा पाऊस पडला.
आणि रस्त्यांबरोबर मन सुद्धा धुवून निघाले.
काही वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस मला अचानक आठवून गेला.

... अशाच एका पावसात चिंब भिजून मी ऑफीस ला दांडी मारायच्या विचारात असताना माझ्या बॉस चा फोन आला.
अर्जेंट काम आहे म्हणून तो माझी वाट पाहत होता. हुशार असण्याचे काही तोटे असतात हे मला त्या दिवशी आवर्जून जाणवले.
ऐरवी मस्त घरी जाऊन मी आई ला आज गरम गरम भजी आणि चहाचा बेत आखणार होतो.
पण माधेच पचका झाला.
झक मारुन घरी आलो. कपडे बदलले आणि तसाच ऑफीस च्या दिशेने निघालो.
मनातून जाम वैतगलो होतो. पण काही उपयोग नव्हता.
आज बस आणि रिक्षा दोघेही माझ्यावर कृपा करत नव्हते.
चांगला अर्धा तास स्टॉप वर थांबून शेवटी मला एक रिक्षा भेटली.

रिक्षा मधे आधीच काही लोक कोंबलेले होते. त्यात आणखी माझी भर पडली.
शेजारी बसलेला माणूस सुसाट सिगरेट ओढत होता. कुणाला त्याचा त्रास होतो आहे की नाही ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. बाजूच्या बाई च्या मांडीवर एक लहान पोरगं होतं. त्याची चप्पल चिखलाने माखाली होती.
त्याचे पाय राहून राहून मला लागत होते. जाम संताप येत होता. पण काय करणार. रिक्षा माझी नव्हती म्हणून सर्वांचे सोपस्कार मी नीट झेलत होतो.
शेवटी एकदाचे ऑफीस आले. सुटे पैसे असूनही मी रिक्षा वाल्याला काही ते दिले नाही.
त्या निमित्ताने मी माझ्या मनातली चीड व्यक्त केली.

रिक्षावाल्याने दिलेले प्रवचन ऐकून मी सरळ ऑफीस मधे शिरलो.
आतमधे गेल्यावर बॉस ने बोलावून घेतले.
"बाहेर काही मुली बसल्या आहेत. त्यांना आपण सेलेक्ट केले आहे. त्यांना कामाचे काय ते समजावून सांग" , बॉस म्हणाला.
मी मान हलवली आणि केबिन च्या बाहेर आलो.

बाहेर सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती.
अनेक लोक ऑफीस मधे असतांना माझी निवड त्या पोरींना ट्रेनिंग देण्यासाठी करण्यात आली होती.
मला अर्थात त्याच्यात काही इंट्रेस्ट नव्हता.
काही हुशार मंडळींनी लगेच येऊन माझे अभिनंदन वैगेरे केले.

मी सरळ त्यांच्या कडे वळलो.
3 जणी एका सोफ्यावर बसल्या होत्या.
तिघी बहुतेक मैत्रिणी असाव्यात. कारण मी जाण्याअगोदर त्या एकमेकींशी गप्पा मारत बसल्या होत्या.
त्यांच्या पैकी 1 जन जरा शांत होती. बाकीच्या दोघींनी आपण कसे हुशार आहोत ते मी न विचारता सांगायला सुरवात केली.

मला त्यात काही इंट्रेस्ट नाही हे बहुदा त्यांना समजले असावे.
बराच वेळ वायफळ बडबड करून त्या गप्प बसल्या.
मी त्यांना डेस्क दाखवला आणि काम सांगून निघून गेलो.

काही कारण नसतांना ती गप्प राहणारी मुलगी मात्र मनात घर करून गेली.
तिच्यात सुंदर म्हणावे असे काही नव्हते.
रंग सावळा. कळेभॉर डोळे. मोत्यासारखे स्वच्छ दात.
साधा पंजाबी ड्रेस, एक लांब वेणी.
कुठलाही मेकप नाही की लीप-स्टिक नाही.
बाकीच्या मुलींसारखा भपकेपणा नाही.
एकदम साधा पेहेनवा आणि शांत नजर.
खरच ती फारच सुंदर नाही पण आकर्षक मात्र नक्कीच होती.
काही लोकं दिसायला आकर्षक असतात.
एका नजरेने ते आपल्याला घायाळ करतात. अशीच काहीशी ती सुद्धा होती.

ती नुसतीच शांत नव्हती तर हुशार सुद्धा होती. थोड्याच दिवसात तिने सर्व काही आत्मसात केले.
मी ही मग थोडा वेळ मिळाला की मग तिच्या शेजारी जाऊन बसायला लागलो.
तिची हुशारी पाहून मी खरच थक्क झालो.
सर्व बोलत असतांना फक्त तिचा आवाज मला ऐकू यायचा.

मग गप्पांच्या नादात चहा होऊ लागला.
तासन्तास आम्ही एकमेकांशी गप्पा मारत बसायचो.
एरवी सुटी ची वाट पाहणारा मी मग ऑफीस ची वाट पहायचो.
तुम्ही म्हणाल की प्रेम वैगेरे झाले ह्याला. पण नाही निखळ मैत्री होती ती.
हो 3 वर्ष निखळ मैत्री होती आमची.
पण म्हणतात ना. "मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात होते" तेच झाले आमचे.
पण जेव्हा आम्ही मित्र - मैत्रीण होतो तेव्हा प्रेम हा शब्द आमच्या गावीही नव्हता.

आज काल फॅशन आहे. एका महिन्यात मुलं प्रेमात पडतात आणि 2 महिन्यात दुसरा जोडीदार निवडतात.
आपण कपडे बदलत नाही इतक्या लीलया ही लोकं पार्ट्नर्स बदलतात.
महिन्यभरच्या ओळखिला प्रेमाचे नाव देतात.
मला हे पटत नाही. प्रेम ही घाई घाई ने करण्याची गोष्ट नाही.
एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण असली म्हणजे ती / तो चांगला लाइफ पार्ट्नर असेलच असे नाही.
सच्चा प्रेमाला गरज असते ती निखळ मैत्रीची.
आज तीच 3 वर्ष मैत्रीण असलेली मुलगी माझी बायको आहे.
पण बायको पेक्षा ती माझी मैत्रीण आहे.

Yes she is my friend... A best friend.