Friday, January 16, 2009

सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प्स....

हा कार्यक्रम पाहिल्यावर मला नेहमी एक प्रश्न पडतो....
ज्या वयात आपल्याला साधा शेम्बुड पुसायची अक्कल नव्हती, त्या वयात ही पोरं कशी काय गाणी गातात काय माहिती...
हे सर्व च्या सर्व कमालीचे हुशार आहेत...पोरांचे कौतुक तर आहेच हो...पण त्यातल्या त्यात मला अजुन एक गोष्ट कौतुक करावीशी वाटते...
ती म्हणजे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या दोघांची...
हे दोघे ज्या पध्दतीने त्या मुलांना मार्गदर्शन करतात ते खराच कौतुकास्पद आहे...
सध्या हजारो रिॅलिटी शो चालू आहेत...
त्यांचे परीक्षक पहिले तर वाटते की लोकसभा चॅनेल पाहोतो आहोत की काय...अक्क्ल नसलेले परीक्षक कुठून धरून आणतात काय माहिती हे चॅनेल वाले ...
बाकीच्या कार्यक्रमाच्या परीक्षकांना भांडायला वेळ मिळत नाही...ते काय शिकवणार आज च्या पिढीला...
नाही नाही..ह्या वेळी मी हिमेश बदद्ल नाही बोलणार...त्यानी बोलायला काही शिल्लक ठेवले आहे का ?
लाज कोळून पिणे कशाला म्हणतात ते त्याच्या कडे पाहून समजते....
बहुदा त्याला घरी घेत नसतील..सारखा सुरूर सुरूर करत असतो..म्हणून त्याला बाहेर वेळ घालावा लागत असणार...
तर असले एक नंबर चे बैल धरून आणले आहेत...अजुन एका बैला बद्दल लिहिवाशे वाटते...
तो सारखा "अटॅक अटॅक" करत असतो...माकडीच्याला केस कापायला वेळ नाही आणी चालला परीक्षक बनायला...
च्यायला अक्कल नसतांना ह्या लोकांचे बरे चालून जाते आज कालच्या जगात....
नाहीतर आपल्यालाच बघा ना..एका जॉब साठी 1000 इंटरव्यू द्यावे लागतात...
नाव, गाव, चड्डी, बनीयान....पार खोदुन खोदुन प्रश्न विचारले जातात...लै वैताग भाउ...
जाऊद्या तुम्ही मात्र आवर्जून हा कार्यक्रम पाहत जा...आणि आपल्या छोट्या दोस्तांना बॅक आप करा.....

1 comment:

Harshal said...

barobar ahe mitra... te hindi channel mi 4/5 varsha pasun baghitlelech nahit... channel scan karta karta vatet kuthe disle tar...

"little champs" mhanje aaplya marathitla satvik, gharguti progamme ahe.ekdum assal... sakas...janu kahi aaplya ghartlich manse aahet.ase aaplyala ka vatte?karan te je kahi ahe te genuine aahe. hindi valyansarkhe galla bharu ani natki nahi.

Jay maharashtra !!! jay little champs