Monday, March 23, 2009

चुक की बरोबर ...

राज त्या दिवशी मला भेटला. माझा अगदी जवळचा मित्र..शाळेपासून बरोबर आणि एकदम बोलका.
पण नेहमी सारखा बोलला नाही..इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन तो निघून गेला.
मला मात्र काही राहावेना. ह्याला नक्की काय झाले असेल ह्या विचारणे मला रात्र भर झोप आली नाही.
मी ठरवले. उद्या त्याला गाठायचे आणि विचारायचे.

ठरल्याप्रमाणे तो मला भेटला.
मी सुरवात केली.
मी - काय झाले आहे राज ? इतका गप्प का तू ?
तो - काही नाही
मी - काही नाही कसे ? तुझ्या अवतारा वरुनच समजते आहे .. सांग काय झाले ते ?

तो - काही नाही रे मामला बिकट आहे. कुणाला ही न सांगन्या सारखा. तू माझा बालपणीचा मित्र म्हणून सांगतो.

महिन्याभरा पुर्वी माझे लग्न झाले.
उत्तम सून मिळाल्यामुळे घरचे जम खुश.. मी ही छान बायको मिळाल्या मुळे खुश.
सर्व कसे मस्त जमून आले.
पण लागणा नंतर काही दिवसांनी अचानक बायको तुटक तुटक वागू लागली.
इतरण समोर ती छान वागायची ..पण एकंतात असतांना मात्र माझ्याशी अलिप्त राहायची.
काही ना काही कारण काढून ती माझ्या पासून दूर राहनेच पसंत करू लागली.
मला काही समजत नाही तिला काय झाले आहे म्हणून.
बर घरात कुणाशी बोलावं तर, सर्व जन म्हणतील - इतक्या गुणी मुलीला तू उगाच नाव ठेवत आहे. म्हणून तिथे ही बोलायची चोरी.

विषय इतका नाजूक आहे की मी कुठेही बोलू शकत नाही.
तिच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला मी. पण ती काहीच सांगत नाही.
मला हळू हळू एकटे वाटायला लागले आहे स्वतहाच्याच घरात.
कुणीतरी आनंदाचे बटन आयुष्यातून स्विच ऑफ केल्या सारखे वाटते.
मनात नको नको ते विचार येतात. अगदी जीव घेणा प्रकार होतो.
मी कुठल्या गोष्टीत कमी तर पडत नाहीए ना अशी एक भीती सारखी वाटत राहते.

त्याचा परिणाम आता कामात पडू लागला आहे.
बॉस रोज शिव्या घालतो. कामात 1000 चुका होतात.
जेवणात मूड लागत नाही...सारखा एकच विचार..."मी कुठे चुकतो आहे ?" बस्सससस्स्स्स्स्स्स्स्स....

बायको म्हणून मी तिने जवळ राहावे अशी अपेक्षा केली तर मी कुठे चुकलो ?
की मला अपेक्षा करायचा अधिकारच नाही ?

मला असे पाहून ऑफीस मधली सोनिया त्या दिवशी मला समजावायला आली.
काय झाले आहे हे जरी मी तिला सांगितले नसले तरी तिने मला छान दिलासा दिला.
लग्नापूर्वी तिने मला स्वताहहून लग्नासाठी विचारले होते.
पण घरचे परवानगी देणार नाही म्हणून मी तिला सरळ नाही म्हणून सांगितले होते.
मला माहीत आहे तिचे अजूनही माझ्यावर प्रेम आहे.
आता घरात असा प्रकार चालू असतांना मला तिची सोबत आवडते.
उगाच तिला नाही म्हणून मी चुकी केली असे वाटते.
घरी जाण्यापेक्षा मला तिच्या सोबत वेळ घालवायला आवडतो.

शेवटी मी ही एक माणूस आहे .. मला ही वाटते की माझ्यावर कुणीतरी प्रेम करावे.
आणि ते प्रेम जर मला सोनिया कडून मिळणार असेल तर किती दिवस मी माझ्या मनावर ताबा ठेवणार ?
मला ही काही भावना आहेत. विचार आहे.
त्यांचा असा गळा घोटून मी तरी किती दिवस जिवंत राहणार ?

असे नाही की मी काही प्रयत्न नाही केला ह्या प्रकारमधे.
पण जर समोरचा माणूस मदत करणाराच नसेल तर मग काय अर्थ उरतो प्रयत्न करायला ?

संपूर्ण आयुष्य असे काढण्यापेक्षा मी थोडे दिवस आनंदाने काढले तर मग बिघडले कुठे ?
हो मला सोनिया आता जास्त जवळची वाटते..पण मग मी त्याला काय करू ?
आयुष्यात एखादी गोष्ट एका दुकानात नाही मिळाली तर आपण दुसर्या दुकानात जातोच ना ?
मग मी ही थोडा आनंद मिळवण्यासाठी दुसरीकडे गेलो तर माझे काय बिघडले मग ?

मला नाही जगता येणार असे एकटे आयुष्य भर ...
कदाचित मी वेडा होईन असल्या वातावरणात काही दिवस आणखीन राहून.
म्हणूंच मी हा मार्ग निवडला आहे आता...
एवढे म्हणून त्याने मला प्रश्न केला... -- मला सांग मी केले ते बरोबर केले ना ?

ह्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते मला काही समजले नाही...मी तसाच शांतपणे घरी आलो.
राज च्या आयुष्यात असे काही होईल असे स्वप्नात सुद्धा कधी वाटलें नव्हते.
ह्याच विचारात अनेक दिवस गेले.
आणि एक दिवस राज मला अचानक भेटला थियेटर मधे...आनंदी दिसत होता ..आणि त्याच्या सोबत होती सोनिया....

तो बरोबर वागला की चुक हे काही मला ठाऊक नाही...
पण हो तो आनंदी होता हे नक्की.....

Nano आली रे..

आजच टीवी वर पहिले ..
टाटा इस लॉंचिंग टाटा नानो...ते मोस्ट अवेटेड कार
न्यूज़ वल्यांनी जनतेचे इंटरव्यू दाखवले.
सर्व जन एकच सांगत होते...."आता सामान्य लोक सुद्धा कार घेऊ शकतील "
हो ते तर आहेच..पण किमतीच्या बाबतीत तुम्ही फसले जाऊ नये म्हणून थोडे लिखाण काम करत आहे मी.

नानो अगदीच काही 1 लाख रुपयांना मिळणार नाही.
तिचे 3 मॉडेल्स टाटा ने बाजारात काढले आहेत.
सर्वात चिप जे आहे त्यात काहीच फेसिलिटी नाहीत...एसी पवर स्टियरिंग काही नाही..
बाकीच्या मॉडेल्स मधे काही फसिटलित्य दिल्या आहेत त्यांनी.

सर्व जन ह्या गाडीचे कौतिक करण्यात गुंग असले तरी मला मात्र एक गोष्टीची जाम काळजी वाटते.
ह्या गाडी च्या सेफ्टी बद्दल मी अजूनही कन्फ्यूज़ आहे. मला बोनेट नसलेल्या गाड्या चालवायला खूप भीती वाटते.
कारण समोरून कुणी ठोकले तर बचावसाती काहीच उरत नाही. म्हणून मला लांब (बोनेट) असलेल्या गाड्या आवडतात.
अर्थात हे झाले माझे मत.
तुम्हाला काय वाटते ते पहा आणि ठरवा गाडी घ्यायची की नाही ते.

दुसरी एक गोष्ट म्हणजे ट्रॅफिक ...त्याची तर वाट लागणारच...
आज काळ कॉलेज मधले बहुतेक स्टूडेंट्स महागड्या बाइक्स कॉलेज मधे आणतांना दिसतात.
आता बाप ही विचार करेल .. ह्याला 90 हजाराची बाइक घेण्यापेक्षा एक नानो घेऊन देऊ म्हणजे सुट्टी च्या दिवशी तीच गाडी मलाही वापरता येईल...नाही का ?
बस मग काय सर्व लोक नानो नानो करतील..आणि टाटा मात्र मस्त खीषे भरेल.
बाकी सर्व लोकांकडे नानो असतांना लोक शाईनिंग कशी मारतील काय माहिती.
पुर्वी जशी मारुती 800 असणार्‍यांना मध्यम वर्गीय समाजचे तसेच काहीसे नानो चे होणार ...

आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर.
नानो च्या फक्त मागच्या टाइयर ला स्टेपणी आहे.
म्हणजे चुकुन तुमचे पुढचे टाइयर पंक्चर झाले तर त्याला ही स्टेपणी चालणार नाही.
वेळ मारुन नेण्याकरता तुम्ही वापरु शकता ही स्टेपणी पण इतर वेळी नाही.
कारण नानो चे दोन्ही चाक वेग वेगळे आहेत. पुढचे टाइयर स्लीम आहे तर मागचे ब्रॉड ( कारण एंजिन मागे आहे).

ही तर फक्त एक सुरवात आहे..पण अशा बर्‍याच त्रुटी ह्या गाडीत निघण्याची शक्यता आहे.
कारण 1 लाखत गाडी देणे गंमत नाही. टाटा ने छान प्रयत्न केला आहे, पण आता बघू पुढे काय होते ते.

माझे ऐकल तर गाडी लगेच बुक करण्याच्या भानगडीत पडू नका..

WAIT FOR REVIEW AND THEN DECIDE.... TILL THEN WAIT AND WATCH...

लिखानकाम सुरू...

आज माझ्या जुन्या ऑफीस मधे गेलो होतो.
मजा आली..सर्व जुनी मंडळी भेटली...आणि काही पोरी पण दिसल्या.
काही नवीन आणि काही जुन्या.
आपल्याला त्या गचाळ ऑफीस मधली एकही गचाळ पोरगी आवडत नाही..खरं सांगतो..
सर्व पोरी आपल्या डोक्यात जातात..आहो असतील देखण्या तर सांगाव ना...
उगाच उद्या राखी सावंत मकडली तर ती काही मधुबाला दिसणार आहे का ?
च्यायला ह्यांना पगार टिचभर पण नखरा पाहावा तर काय सांगणे...वा वा...
जाऊद्या आपल्या बपाचे काहीही जात नाही आणि जाणार पण नाही...
मला इथे फक्त ईतकेच सांगायचे आहे की "माझे लग्न झाले आहे .. आणि मला कुठल्याही पोरी कडे पाहण्याची आवड आणि गरज दोन्ही ही नाही..
तेव्हा फक्त उद्या रस्त्यात चुकुन कधी दिसल्याच आपण तरी उगाच नाक मुरदू नये...मला तुमच्या कडे पाहायला वेळ आणि हौस नाही..

नेक्स्ट..

हा तर मी सांगत होतो...पोरं भेटली सर्वांनी आग्रह केला की मी ब्लॉग लिहीणे का बंद केले म्हणून...
आणि ब्लॉग आवडळ्याची पावती ही दिली.
मला फार आनंद झाला..
हा तर ब्लॉग लिहीणे बंद केले नाही..
बस थोडा वेळ कमी पडतो आहे सध्या..म्हणून थोडे थोडे लेट होते..ईतकेच..

पण थोडा धीर धरा..
मै जरूर लिखूंगा...ये वादा है मेरा...
सध्या साठी जाता जाता ...

तिला पहिले मी...ती होती अगदी सुंदर ...
तिच्या नयनांनी केले माझ्या मनाला आतुर...

तिला पाहून मग मी वेडा झालो..
तिच्या विचारात पुरता बुडून गेलो...

ती असावी जवळ असे सारखे वाटते...
नी नसली की जिणे भकास वाटते..

तिच्या सहवासात मला आनंद मिळतो...
ती नसली की मग मी असाच जळतो...

तिच्यावाचून जिणे ?? कल्पनाच नाही ...
तिच्या वाचून माझी , कोरीच वही..

तिच्यासाठीच जन्म, तिच्यासाठीच प्राण...
तिच्यावाचून नाही जाणार प्राण


ती ध्यास ती भास..
ती स्वप्न ती श्वास...

तीच माझ्या प्रेमाचा पाया
अशी ती माझी विजया...

टिप - कविता चोरलेली नसून स्वतहाच लिहिलेली आहे..


पैसा...

राम आणि शाम दोघे मित्र...
दोघे एकदम हुशार आणि मेहनती...
दोघे उच्च शिक्षीत...
कॉलेज संपल्यानंतर ते एके ठिकाणी इंटरव्यू साठी गेले...
इंटरव्यू झाला ...
राम पास तर शाम नापास झाला..
राम ने तिथेच 1-2 वर्ष काढली...शाम ने दुसर्या कंपनी मधे जॉब सुरू केला..
राम ची कंपनी मोठी असल्याने त्याचा पगार लगेच वाढत गेला..
शाम ची कंपनी छोटी होती म्हणून त्याचा पगार काही वाढला नाही..
राम छान पैकी पैसे कमवायला लागला...शाम कसबसा जगू लागला...
राम ला पैशांची मग हाव सुटली...शाम मात्र शांत होता..जे मिळेल त्यात समाधानी होता..
राम ने मग नोकर्या बदलायला सुरवात केली...एक झाली की दुसरी...
शाम ने मात्र एकाच कंपनी मधे जम बसवला..
राम ने पैसे मिळवण्याच्या नादात गाव सोडले..दुसर्या गावी जाऊन तो जॉब करू लागला...घरापासून दूर...
शाम सुद्धा हुशार असल्याने त्याला ही अशा ऑफर येऊ लागल्या...
राम ने क्षणाचाही विचार करता लगेच दुसर्या गावी बिस्तर हलवले..
शाम ने मात्र आपल्याच गावात राहण्याचा निर्णय घेतला..आणि त्याने दुसर्या कंपनी ला नाही म्हणून सांगितले...
राम पैशासाठी मग गावोगवी फिरू लागला...त्याला पैसा मिळत होता पण टेन्षन सुद्धा तितकेच वाढत होते...
बरोबर कुणी नाही...बस तो एकटा आणि पैसे...घरची मंडळी सुद्धा नाही...
इकडे शाम घरच्या लोकांबरोबर खुश होता..पैसे कमी मिळत असले तरी तो समाधानी होता...
आणि मिळणार्या पैशांवर घर चालवत होता..कुठलीही हाव करता...
राम ने परगावी छान घर बांधले...आलिशान एकदम मोठे...
पण त्या घरात राहायला लोकं मिळेनात...तो एकटा भुता सारखा राहू लागला...
इकडे शाम ने गावातले आपले घर मिळणार्या पैशांमधे दुरुस्त करून घेतले...
घर लहान होते पण घरातले मनाणे मोठे होते...

राम च्या घरात सर्व सुख सोयी होत्या .. पण त्याचे काही मन लागेना...
त्याला आधरची गरज होती..पण जवळ कुणीच नव्हते...
या उलट शाम कडे आधार होता..आई आणि वडिलांचा ..आणि गावात राहणार्या आपल्या मित्र मंडळींचा...
खूप वर्ष लोटले गेले...

60 वर्षांनंतर....
राम ने गडगंज प्रॉपर्टी कमावली...
शाम मात्र 60 वर्षं पुर्वी होता तसाच राहिला..गरीब...
दोघेही अचानक मरण पावले...
दोघेही रिकाम्या हाताने आले होते आणि रिकाम्या हातानेच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला...
राम च्या बरोबर त्याने कमावलेली प्रॉपर्टी आली नाही...पण हे पाहायला तो जिवंत राहिला नव्हता..
त्याने आयुष्य भर मर मर केली...कशासाठी ?? पैशासाठी ???
पण त्याच्या सोबत काय आले ??? 1 रुपया सुद्धा नाही...
ज्या पैशांवर त्याने इतके जिवापाड प्रेम केले त्यानेच त्याला असा दगा दिला...

राम ने संपूर्ण आयुष्य एकटयानेच काढले...
ज्या वयात आई वडिलांना त्याची गरज होती त्या वेळी तो पैशाच्या मागे होता..
जगाच्या नजरेत राम एक यशस्वी माणूस होता...आणि शाम एक अपयशी माणूस...
पण त्यांच्या आई वडिलांच्या नजरेत तर काही और होते...
खरच राम यशस्वी होता का ??? आणि शाम अयशस्वी ???

विरलेले स्वप्न...

अथक परिश्रमा नंतर मधु सॉफ्टवेर इंजिनियर झाला.
घरी जाम आनंदाचे वातावरण होते. आता तरी घरची परिस्थिती थोडी सुधारेल म्हणून वडीलही निर्धास्त होते.
आयुष्य भर काम करून करून जाम झाले होते बिचारे.
मधु ने पण मग विचार केला, ह्यापुढे घराला काहीही कमी पडू देणार नाही.
त्या नुकत्याच कॉलेज मधे पास झालेल्या मुलाने मग गरूड झेप घेतली.
आई वडील अडाणी असले तरी मधु ने मात्र रक्ताचे पाणी करून शिक्षण पूर्ण केले. सर्व इछा मारुन मारुन अनेक वर्ष जगत् राहिला.पण आता त्याला जग जिंकायचे होते आणि तो जग जिंकण्यासाठी निघाला होता.
तो राहत असलेल्या चळितच सुषमा राहायची. लहानपणापासूनच त्याचा तिच्यावर जीव होता.
पण गरीबीच्या मारांने तो इतका झुकला होता की त्याला वर तोंड करून तिच्यावर प्रेम जाहीर करणे ही कधी जमले नाही. सुषमा त्याची परिस्थिती जाणून होती. तिलाही तो मनापासून आवडायचा. काही वेळा शब्द महत्वाचे नसतात, त्याचप्रमाणे त्यांचे अबोले प्रेम चालू होते.
आता मधूच्या सर्व चिंता संपल्या होत्या..तो एक उच्च शिक्षीत माणूस झाला होता.
तोडा फार सेट्ल होऊन सुषमा ला तो आपल्या प्रेमा बद्दल सांगणार होता.
पण त्याला पुढे घडणार्या गोष्टींची कल्पनाही नव्हती.

मुळातच हुशार असलेल्या मधु ला अगदी कमी वेळातच चांगली नोकरी सुद्धा मिळाली.
आनंदी झालेल्या मधु ने देवाचे आभार मानले. मनात सुप्त असलेल्या इच्छा आता जाग्या होऊ लागल्या.
आयुष्य भर चाळीत ल्या त्या 10 बाय 10 च्या खुरड्यात काढल्यावर त्याने लगेच कर्ज घेऊन आई वडिलांना एका मस्त प्रशस्त फ्लॅट मधे आणले.
पगार चांगला असल्याने बँकेनेही कसलीही नाटके केली नाहीत आणि सरळ कर्ज मंजूर केले. मधु खूप खुश होता. त्याने मन भरून आपल्या आई वडिलांना प्रेम दिले होते आणि आज तो त्यांच्या साठी काही तरी करत होता, ह्या भावनेनेच तो भारावून गेला होता.
जागा आईसपाईस मोठी मिळाली तरी मनाच्या कोपर्यातून सुषमा चा रड्वेला चेहरा काही जाईना.
चाळ सोडतांना खिडकीतून हळूच डोकवून पाहणारी आणि डोळ्यात पाणी भरलेली सुषमा त्याला आठवली की मग त्याचे मन वेडे पिसे होऊन जात.
पण आपल्याला आवडलेली सुषमा आपल्या घरच्यांना आवडणार नाही हे त्याला ठाऊक होते...
असला विचार करून मग तो आणखीनच बिथरून जायचा.

आजही त्याला तो दिवस लक्षात होता ज्या दिवशी सुषमाचे लग्न ठरले होते.
तो लग्नाचा दिवसाही त्याला लख्ख आठवत होता. असे काही होईल असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
सुषमा लग्न करून गेली पण तिच्या आठवनी काही मधु च्या मनातून जाईना.
कसे बसे त्याने स्वताहाला सावरले. आणि थोड्याच दिवसात तो तिला अगदी विसरून सुद्धा गेला होता.

कसाबसा आयुष्य जगण्याचा तो प्रयत्न करत होता.
पण नियतीला काही औरच मान्य होते.
लग्न होऊन 2-3 महिनेही होत नाही तोच मधु ला सुषमा चाळीत दिसली.
त्याच्या काळजाचा ठाव गेला. निदान सुषमा बरोबर तरी असे व्हायला नको होते.
इतक्या दिवस गुलाबी निळ्या जांभळ्या रंगात नाहाणार्या सुषमच्या अंगावर पांढरा शुभ्र रंग बिलकुल शोभत नव्हता.
हो, सुषमा लग्न करून गेल्या नंतर अवघ्या 2 महिन्यातच तिच्या नवर्याचे निधन झाले होते.
संपूर्ण आयुष्य तिच्या समोर ओस टाकून तो तिला एकटीला सोडून निघून गेला होता.
त्या बिचारीचा ह्यात काहीही दोष नसतांना तिला सासर कडच्या लोकांनी असे उघड्यावर टाकले होते.
त्या रात्री मधु खूप रडला. पण त्याचा आता काहीही उपयोग होणार नव्हता. होणारी गोष्ट होऊन गेली होती.

हा सर्व जुना विचार करत असतांनाच त्याला जाग आली. आपले आई वडील अशा मुलीला स्वीकारणार नाही हे त्याने जाणले.
मधु मोठ्या धर्म संकटात सापडला होता.
एकीकडे संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले ते आई वडील आणि दुसरीकडे सुषमा.
ह्या दोघांचा मेळ घालणे त्याला काही जमत नव्हते.

गरीब आणि म्हातारे आई वडील आणि एकटी पडलेली सुषमा दोघांनाही आधारची गरज होती.
आणि त्या सर्वांनपेक्षा खरी आधारची गरज होती ती मधु ला....तो फार एकटा पडला होता.
काय करावे कळेना...कुणाला सांगावे ते ही कळेना...
तो आतल्या आत घुस्मटुन गेला होता.
त्याने घरी 1-2 वेळा विषय सुद्धा काढले पण काही उपयोग झाला नाही.
व्यवहारी जगाला भवनाप्रधान मधु चे म्हणणे पटत नव्हते.

तिकडे सुषमा ही बैचैन होती.
तिच्या समोर पूर्ण आयुष्य पडले होते. मनातले प्रेम ओठांवर आणण्यासाठी आता फार उशीर झाला होता.
दुख म्हणून तरी किती दिवस करत बसणार...शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करणे तिला भाग होते.
तिने मग एके ठिकाणी जॉब सुरू केला..थोड्याश्या पगारावर ती जेमतेम भागवू लागली.
मनाच्या कुठल्याश्या कोपर्यात मधु चा विचार सतत चालू असायचा..आणि हे सत्य ही समोर असायचे की मधु चे प्रेम हे माझ्यासाठी मृगजळ आहे.
कामात लक्ष लागेना.
तिकडे सुषमा ला तसल्या अवस्थेत पहिल्यापासून मधु चे ही कामात लक्ष लागेना..
दोघेही बैचैन झाले होते.
एखाद्या माणसावर प्रेम असतांना त्याचा सहवास मिळणे ह्यासारखे दुसरे नरक नाही..
तोच नरक ही दोघं रोज अनुभवत होती...प्रत्येक क्षणाला....

सुषमा ची तब्येत सुद्धा खालावात चालली होती.
सारखे सारखे विचार करून आजारपण वाढु लागले होते.
राहून सुषमाने शेवटी निर्णय घेतला.
एक पत्र लिहून तिने मधु चा कायमचा निरोप घेतला.
त्या पत्रात काय होते ते कुणालाही माहिती नाही...पण त्या नंतर मधु सुन्न झाला.
त्याने सर्वांशी बोलणे ही कमी केले...हळू हळू तो गपप्च झाला.
पुढे डोक्यावर परिणाम झाल्याने त्याला हॉस्पिटल मधे भरती करावे लागले..पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

आज सुषमा कुठे आहे हे कुणालाही ठाऊक नाही ...ती कुठे गेली ? का गेली ? कधी गेली..काही पत्ता नाही...
पण तुम्ही नीट शोधलित तर ती नक्की सापडेल .....मधु च्या हृदयात...कायमची...

जग जिंकायला निघालेल्या मधु चा दुर्दैवी अंत झाला....