Friday, January 30, 2009

Sania-Bhupathi enter final of Australian Open

लई भारी ना भो...

"सानिया-भूपती एंटर फाइनल ऑफ ऑस्ट्रेलियन ओपन..."
वा क्या बात है....
मागे मी एका ब्लॉग एंट्री मधे सानिया मॅडम वर टीका केली होती..
ती आता मी जाहीरपणे मागे घेत आहे...
तुम्ही मॅच पहिली नसेलच म्हणून सांगतो..झक्कास झाली मॅच...
काय राव...माणूस आहात की मुंगूस तुम्ही... ???

ही घ्या आता हाइलाइट्स बघा...






भूपती ला मानले आपण..
साला क्या खेळता है ??? वा एकदम कडक...
तुम्हाला माहिती नसेल म्हणून पुन्हा एकदा सांगतो...
भूपती हा मेन्स च्या डबल्स च्या फाइनल्स मधे सुद्धा पोहोचला आहे..
उद्या मॅच आहे ती...

भूपती तोड्लस मित्रा...एकदम तोड्लस...
त्याच्या कडे ऑलरेडी 6 grand slam titles आहेत...डबल्स चे...
काय म्हणावे या माणसाला..
एकच खंत आहे.. भारता मधे क्रिकेट सोडून इतर कुठल्या ही खेळा ला फार कौतुक आणि पैसा मिळत नाही...
ही दयनिय अवस्था आहे...

मला माहिती नाही की आपल्यापैकी किती लोक टेनिस प्रेमी आहे..
पण मी मात्र आहे...आणि भारता तर्फे कोणी खेळत असेल तर मी आवर्जून टेनिस मॅच पाहतोच...
तसा इतर वेळी सुद्धा पाहतो .. पण फक्त लेडीज टुर्नामेन्ट्स ....

काय तुम्ही सुद्धा ???? वाह छान....

पण क्रिकेट मला काही झेपत नाही...आणि मी पाहतही नाही...
मागे मी फार क्रिकेट वेडा होतो...पण मग मधल्या काळात जे काही अझरूद्दीन आणि त्याच्या सवंगड्यांनी केले ते पाहून संताप संताप झाला माझा...
तेव्हाच पाणी हातात घेऊन ठरवून टाकले की बस..आज पासून मॅच पहाणे बंद... एकदम भीष्म यांच्या प्रमाणे...
च्यायला म्हणजे आम्ही इकडे डोळे ताणून ताणून आक्खा दिवस घालून मॅच पाहावी आणि ह्या हाराम खोरांनी पैसे खाऊन मजा करायची...
क्या येडा समझा है क्या...?????

पण एकदम खर सांगतो...सचिन ची बॅटिंग पहाणे काही आज पर्यंत मला आवरता आले नाही..
म्हणजे सचिन खेळत असे पर्यंत तरी माझ्या घरी टीवी चालूच असतो...
तो आऊट झाला की स्वयंपाक घरातून लगेच आवाज येतो.. "चला आता उठा..."
काय करणार...उठवे लागते..

पण कोणी काहीही म्हणो..आज मज्जा आली...
ऑस्ट्रेलियन ओपन च्या डबल्स फाइनल्स मधे इंडियन्स...वा एकदम झकास...
टोप्या उडाल्या भाऊ... म्हणजे इंग्लीश मधे (HATS OFF Dude) ...

Keep up the good work... लई भारी...

Sunday, January 25, 2009

भाडे थकल्यामुळे हे दुकान नवीन जागेवर हलवण्यात आले आहे...

भाडे थकल्यामुळे हे दुकान नवीन जागेवर हलवण्यात आले आहे...
कृपया उगाच इथे क्लिक करत बसू नये...

आमचा नवीन पत्ता : -
http://blog.verticalsoftwares.com


- आपला विश्वासू
अरविंद

Friday, January 23, 2009

Are we really unite ????


Now that the 26th January is coming nearby...
i have jotted down with one question.... ARE WE REALLY UNITE ????

If your answer is YES then let me remind you of certain incidences that happened over past few months...

1. We have seen riots between two groups people in Mumbai ...
2. We are trying to tackle the problem between KARNATAKA and MAHARASHTRA now...

With so many issues being pending how can we just waste our time in such matters ?
We have a main issue of terrorism...and no other issue stand more important than this ...
Because in such small battles we are actually wasting our energy, whereas we should focus on much more important issues than this...
Its like we are helping terrorist in other way... they are trying to spoil unity of our country..
and if we keep fighting like this between ourselves then we are doing their job...
And over the years it will become hard to distinguish the difference between us and them...
We know our politicians... they are so careless about this country and each individual wants to earn money out of the post he/she posses...

They have money to renovate their bunglows...
They have money to buy and sell party members...etc..etc..
They have lot many other jobs to do other than serving this country...

We can not depend on them...we have to stand on our own...
I heard an interview of one of the minister while TAJ incidence took place ...
He was the minister who were there in TAJ hotel when terrorist attacked that hotel...
when a reporter asked him how he felt inside TAJ in such a tragic situation ..
he replied -- "I enjoyed each and every moment of it..when i came to know that we are not allowed to come out of our room in TAJ..I PLANNED FOR ELECTION'S AGENDA FOR MY PARTY...."

Just look at the shameless statement which our honorable minister is giving on air...
i should have been there in the place of that reporter...i would have killed him....

Such basters are ruling INDIA...
I really thank GOD that SAVARKAR, BABU GENU, BHAGAT SING, SUKHDEV and all those freedom fighters are not with us...they would have cried over this situation...

Come on guys ... these people had not sacrificed their lives for this INDIA...
they had some other picture of this country in MIND....
and its our duty to paint their imagination...

BHAGAT SING was hanged to death at the age of 23...
Let us not waste their sacrifice...

Lets stand and pray for united INDIA...

JAI HIND....

And snapped a Golden Globe Nomination....

AR Rahman has composed music for a London West End musical, scored a Chinese film, conducted the Birmingham Symphony Orchestra and created tunes for more than 100 Indian films. But composing music for British director Danny Boyle's "Slumdog Millionaire" was a new challenge.

Boyle simply wanted a score with energy and an edge for his film about the travails of an 18-year-old orphan from the slums of Mumbai who goes on to win a staggering Rs.20 million on India's "Kaun Banega Crorepati" game show.

But there was a twist. The perfectionist Rahman was given just three weeks to plan and execute the score. "We had met and talked about it for about two months. But I had to finish it quickly as Boyle wanted to start mixing the film by August," Rahman told IANS in a telephonic interview from New York.

"It's probably one-fifth of the time I normally take. For one thing, a normal film has about 150 cues. But in this one there were only 17-18 cues for me. Boyle uses music very less but very efficiently."

Rahman's task was made easier by the easygoing nature of the director. "I have worked with different people. Most Westerners are generally reserved. But Boyle was different - like a friend, very helpful. It was like working for Mani Ratnam, Rakeysh (Omprakash Mehra). He was very excited about India. He loved India. He loved Mumbai. He loved everything," says the maestro.

The time at hand may have been much less than the Chennai-based composer is used to, but that fact appears to have had no effect on the final score. "Slumdog Millionaire" music is already attracting Oscar buzz.

To start the season on an auspicious note, it has just picked up an award - Best Score of the Year from the LA Film Critics Association. Rahman also received a Golden Globe nomination for Best Original Score and two Critics Choice nominations - Best Score and Best Song for "Jai Ho".

The score was lent extra momentum by the presence of Mathangi "Maya" Arulpragasam, better known as 31-year-old dance music phenomenon MIA. Though she herself was born in London, MIA's parents are Sri Lankan Tamilians, a connection that informed and enhanced the film's score.

Rahman says: "...It (the South Asian connection) did have an impact. She is very young. Very futurist. Knew how to take the film forward. I knew her work. She knew my work and that helped."

"She asked me, 'Why don't you stop doing sentimental stuff?' That's how the music acquired that edgy feeling, that you wanted to fly away from it. She was definitely an inspiration."

Though Indian audiences will have to wait till January to see the film, the awards have already started pouring in. The US' National Board of Review has named "Slumdog Millionaire" the best film of 2008, while the film bagged the 'Best British Independent Film' prize at the British Independent Film Awards.

With honours coming in thick and fast, Rahman has a relatively sedate reaction to the prospect of an Indian composer achieving a first - an Academy Award (or even nomination) for music.

"I don't know whether it excites me personally. But a small-budget film getting the kind of recognition it is getting certainly makes you feel good."

AR Rahman is already well known in the West, but the accolades the film and his score are gathering should lead to greater prominence for this softspoken genius from Chennai.

"In a way it would help me to build a bridge with my Western listeners. It would lend to a better appreciation of my music in the West."


Source:http://www.india.com/entertainment/movies/how_ar_rahman_scored_slumdog_millionaire_1970

रिसेशन...

माझा एक मित्र...
एकदम हुशार...अगदी नजर लागावा इतका हुशार...
CMM 5 कंपनी मधे काम करणारा ..एक हुशार सॉफ्टवेर इंजिनियर ...
घरची परिस्तिथि बेताचि...अगदी गरीब कुटुंबातुन वर आलेला....आणि बरीच मेहेनत करून पुढे गेलेला ...
एक दिवस असाच भेटला...
म्हणाला...अरविंद जॉब बघ माझ्यासाठी...
मला धक्काच बसला...मी म्हणालो..अरे तू तर CMM 5 कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर आहेस ना..मग ??
तो एकाच शब्दात म्हणाला...रिसेशन...
आज आपण जर आपल्या आजु बाजूला पहिले तर हीच परिस्तिथि आहे...
कित्येक हुशार मुलं...मुली...अचानकपणे ह्या रिसेशन च्या विळख्यात अडकलेले आहेत...
माझ्या बरोबर काम करणारे कित्येक लोक आज घरी बसलेले आहेत...
फार वाईट वाटते त्यांच्याकडे पाहून...
काहींचे लग्न झालेले..काहींनी कर्ज घेतलेले...प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम आहेच...
आता ही मंडळी काय करतील...????
कंपनी ने कढतांना हा विचार नाही केला... ज्या कंपनी ने तोंड भरून कौतुक करून ह्यांना मोठ्या पगारवर नोकरी दिली होती, त्याच कंपनी ने आता त्यांना रस्त्यावर आणले होते....
इतक्या लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत की मोजनेही कठीण आहे...आणि त्यांना पुन्हा जॉब मिळणे ही कठीण आहे...
अशा परिस्थितीत टेन्षन तर साहजिकच येणार...त्याला उपाय नाही...
मग काय करावे... ????
बाकी काही नाही ..पण आपण एक गोष्ट करू शकतो...
नोकरी चालू असे पर्यंत जो काही पैसा मिळेल...त्याचा योग्य वापर केला तर अशा दिवसात...निदान नोकरी मिळे पर्यंत तरी...त्या पैशाचा उपयोग होऊ शकतो...
बाकी आपले प्रयत्न चालू ठेऊन देवा वर विश्वास ठेवा...सर्व काही ठीक होईल...

Thursday, January 22, 2009

...च्यायला मी आता राजा होणार !!!

बस आता खूप झालं ...
साला वैताग आला आहे...
रोज लवकर उठा...तयारी करा...गाडी काढा..ऑफीस ला जा...
मर मर काम करा...तरी पण प्रॉजेक्ट मॅनेजर च्या शिव्या खा...खड्ड्यात गेले ते काम...
मी काय ठेका घेतलाय का ? अरे शेवटी मी माणूस आहे...
स्वताहा साठी सुद्धा वेळ नाही मला ह्या कामाच्या गडबडीत...
आणि इतके काम करून शेवटी मिळते काय ?? चार पैसे...जे कधीच पुरत नाही...
म्हणून आपण तर ठरवून टाकले आहे...मी पुढल्या जन्मी राजा होणार...
त्यासाठी काय वाट्टेल ते करेन..गणपती पाण्यात ठेवेन..शनि देवाची पूजा करेन...पण मी राजा होणार...
राजा झाल्यावर पहिले मी पूर्ण गत-जन्मीच्या प्रॉजेक्ट मॅनेजर ची लिस्ट मागून घेईन...
त्यांना सैन्यात भरती करेल...आणि मग उगाच नको नको त्या देशाशी पंगा घेईन...उगाच युद्ध करेन...
मारेणात का ते सर्व...माझ्या बपाचे काय जाणार आहे....
पण मरायची शक्यता कमी आहे...कोण सांगो दुसर्या देशातही मॅनेज्मेंट चे लोक असतील तर....?????????
मग काय हे साले एकत्र होऊन आपल्यावरच चढाई करतील...
प्लान मे चेंज....
मी सरळ त्यांना गोळयाच घालेन..
बंदुकीच्या नाही हो...उंदीर किंवा झुरळाच्या....
त्याने नक्की मारतील हे....उगाच बंदुकीच्या गोळयांचा खर्च कशाला ???
आणि हो..अशा राज्य कारभारासाठी मला काही सेनापती नेमायला लागतील...
तुमची इछा असेल तर त्वरित संपर्क साधा...

विशेष टिप -- मुलींनी अर्ज केला तरी चालेल. दरबारात इतर कामे करण्यासाठी, जसे स्वयंपाक करणे..कपडे धुने...इ. आणि खुद्द महाराजचे मनोरंजन करण्यासाठी काही लोकांची गरज आहे.

Tuesday, January 20, 2009

प्रेम केलय का कधी प्रेम...(भाग 1)

काही लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि मग आपले सर्व विश्वच व्यापून टाकतात...
त्या लोकांचा प्रभाव आपल्यावर इतका पडतो की हळू हळू त्यामुळे आपले विचार बदलत जातात..आपोआप..नकळत..अभवितपणे...
आणि मग आपल्याकडे त्याला शरण जाण्याशिवाय काही पर्याय उरत नाही....
अशी अवस्था बहुतेक करून "प्रेमात" पडल्यावर होते...आणि त्यातून प्रेम कॅरणारी व्यक्ती जर मुलगा असेल तर मग काही वेगळीच तरहा...
मुलांना प्रेमात पडायला सहसा कारण लागत नाही...कारण आमचा डेटा-बेस थोडा मोठा असतो...
उगाच एकाच्या प्रेमात पडायचे ... आणि नंतर ती जर का नाही म्हणाली तर वेळ वाया घालवायचा ... असल्या (वाईट) सवयी नाही आम्हाला...
Multi-threading आणि Multi-tasking च्या जमान्यात इतका वेळ कुणकडे नाही...आणि माझ्या मित्रांकडे तर नाहीच नाही...
पण चुकुन कोणी प्रेमात पडला आणि त्याला कोणी पोरीने हो म्हटले की मग बस...
कट्ट्या कट्ट्या वर "च्यायला ह्याला ही कशी पटली", "तिने ह्याच्यात काय पहिले", दुसर्या मित्राचे नाव घेऊन "हा काही मेला होता" असल्या गोष्टींना उधाण येते...
असल्या गप्पा ऐकल्या की समजायाच की बहुतेक तिच्या प्रेमात इथले 2-4 तरी मजनू आहेत...
माझे सहसा असे होत नाही...माझा स्वतहचा प्रेम विवाह झाल्याने कुणी प्रेमात पडला की मला आनंद होतो..
पण आनंदापेक्षाही मला त्या मित्राची काळजी वातल्यावाचून राहत नाही....
कारण आजकाल आतल्या सुंदरते पेक्षा बाहेरील सुंदरता पाहून प्रेमात पडणारे जास्त आहेत...
तुम्ही नाही म्हणालच हो...पण मग तसे नसते तर "Love at first site" असे कसे म्हणता आले असते ? सांगा ना...
आपला तर एक सोपा फंडा आहे भाऊ... अशी मुलगी निवडा जी वयाच्या 30 व्या नाही तर वयाच्या 80 व्या वर्षी ही तुमच्या वर तितकेच प्रेम करेल...
आणि तुम्ही सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम कराल अशी अपेक्षा आहे...बाकी सब झूठ है...
आणि प्रेम केले तर ते छाती ठोकून सांगता यायला पाहिजे...उगाच मधल्या मधे जळून काही उपयोग नाही...
टिप - हा सल्ला फक्त तरुण लोकांसाठी नाही...कारण प्रेमात पडायला वयाची अट नसते...पण...एकदा लग्न झालेले असेल तर मग हा विचार सोडून द्या...
कारण प्रेम आणि जेवण ह्यात फरक आहे...प्रेम हे जेवणासारखे परत परत नाही करता येत...
तेव्हा तुम्ही प्रेमात पडला असाल तर बिंदास जाऊन सांगा तिला...
ती काही खाणार नाही तुम्हाला...कारण जास्त करून मुली वेज असतात...
आणि जर चुकुन जर तिने तुम्हाला खाल्लेच तर 2 दिवसात नाही मेली ती तर आपले नाव सांगणार नाही जगताप म्हणून...

टिप - आमच्या येथे फक्त मुलांना सल्ला दिला जातो...

Monday, January 19, 2009

माझी पहिली नोकरी...

मित्रांनो..खरं तर सांगायला लाज वाटते..पण आता विषय निघालच आहे तर सांगतो...
माझी पहिली नोकरी एकदम बन्डल होती..
माझा एम. सी. एस ला असतांना अपघात झाला होता.. म्हणून मला एके ठिकाणी नोकरी करावी लागली....
तिकडे मालक धरून कुणालाही अक्कल नावाचा प्रकार नव्हता...
पहिली नोकरी मिळाली ती सुद्धा 1200 रुपये पगारवर...असली चीड आली होती म्हणून सांगू...
च्यायला..म्हणजे झक मारुन क्षिक्षण केले..एम. सी. एस झालो...आणि पगार किती तर म्हणे 1200...
अरे काही लाज सांगताना ... माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले...
घरी जाऊन काय तोंड दाखवू ???
घरचे काय म्हणतील...वडिलांनी इतके पैसे खर्च केले, आई ने इतका विश्वास ठेवला...त्याचा एका क्षणात चुराडा झाला...
पण मी दगमागलो नाही...देवाने परीक्षा घ्यायचे ठरवले असेल म्हणून बिंदास जॉइन झालो...
काही काळ गेला...पण मला तिकडच्या कामाची पद्धत काही पटेना...
तिकडे कोणीही माझ्या कोडिंग वर विश्वास ठेवायला तैयारच नव्हते....जसा काही मी ह्याच्या आधी बाजारात भज्याच विकत होतो...
आमच्या कॉलेज च्या जमान्यात (पुण्याला असतांना) मी एक चांगला प्रोग्रामर म्हणून ओळखलो जायचो..आणि इथे ही तरहा...
काही दिवस मुकाट पाने सहन केले मी..पण मग नंतर राहावेना...
सारखे वाटायचे की हे करण्यासाठी माझा जन्म नाही झालेला...माझे टार्गेट काही और होते...
मग एके दिवशी त्या दोन्ही बॉस लोकांना घातल्या शिव्या आणि मारली लात त्या नोकरी ला...
पुढे काही वर्ष असेच काही से जॉब केले...आले जे वाट्याला ते सर्व सहन केले...
पण देवाने शेवटी मला जे हवे ते दीलेच...आज मी सुखाने नासिक मधे च नोकरी करत आहे...
आणि स्व गावी राहण्याची सुखे अनुभवत आहे...

तुमची ही अशीच काहीशी कथा असणार हे मला नक्की ठाऊक आहे...
आता तुम्ही जर कठीण प्रसंगातून जात असाल तर लक्षात ठेवा....देव आहे नक्की कुठेतरी आहे...
आणि तो पाहतो आहे...तुमची जिद्द...मेहनत करायची तैयारी...
तो नक्कीच सर्वांचे चांगले करेन..
बोला गणपती बाप्पा मोरया....

माझी व्यथा....

मी जेव्हा पासून ब्लॉग लिहायला सुरवात केली आहे तेव्हा पासून पाहतो आहे...
मला काही मिळालेले कॉमेंट्स...
1. कुठून चोरून पेस्ट केले हे पोस्ट्स...(एकदम पक्का शेरा)
2. काय जगताप मग पैसे वाढवणार का ?
ई. ई.

या प्रश्नांचे मला काहीही वाटत नाही...उलट मला कौतुकाच वाटते...
मला खर आश्चर्य वाटते ते ह्या गोष्टीच की...वाचक येऊन ब्लॉग वाचतात..पण कॉमेंट टाकत नाहीत..
हा ब्लॉग सुरू करतांना मनात विचार होता की काहीतरी मराठी मधे करायचे..
जेणे करून आपल्या वाचकांना काहीतरी डोक्याला त्रास नं देता मस्त वाचता येईल...
एरवी वाचणर्‍याला इंग्लीश मधे वाचून वाचून मजा तरी येत नाही किंवा लिहिणार्‍याला हवे तसे मुद्दे मांडता येत नाही...
म्हणून हा सर्व खटाटोप चालू आहे...
आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे...जमल्यास जरूर देणे....
जय हिंद...जय महाराष्ट्र...

Friday, January 16, 2009

सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प्स....

हा कार्यक्रम पाहिल्यावर मला नेहमी एक प्रश्न पडतो....
ज्या वयात आपल्याला साधा शेम्बुड पुसायची अक्कल नव्हती, त्या वयात ही पोरं कशी काय गाणी गातात काय माहिती...
हे सर्व च्या सर्व कमालीचे हुशार आहेत...पोरांचे कौतुक तर आहेच हो...पण त्यातल्या त्यात मला अजुन एक गोष्ट कौतुक करावीशी वाटते...
ती म्हणजे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या दोघांची...
हे दोघे ज्या पध्दतीने त्या मुलांना मार्गदर्शन करतात ते खराच कौतुकास्पद आहे...
सध्या हजारो रिॅलिटी शो चालू आहेत...
त्यांचे परीक्षक पहिले तर वाटते की लोकसभा चॅनेल पाहोतो आहोत की काय...अक्क्ल नसलेले परीक्षक कुठून धरून आणतात काय माहिती हे चॅनेल वाले ...
बाकीच्या कार्यक्रमाच्या परीक्षकांना भांडायला वेळ मिळत नाही...ते काय शिकवणार आज च्या पिढीला...
नाही नाही..ह्या वेळी मी हिमेश बदद्ल नाही बोलणार...त्यानी बोलायला काही शिल्लक ठेवले आहे का ?
लाज कोळून पिणे कशाला म्हणतात ते त्याच्या कडे पाहून समजते....
बहुदा त्याला घरी घेत नसतील..सारखा सुरूर सुरूर करत असतो..म्हणून त्याला बाहेर वेळ घालावा लागत असणार...
तर असले एक नंबर चे बैल धरून आणले आहेत...अजुन एका बैला बद्दल लिहिवाशे वाटते...
तो सारखा "अटॅक अटॅक" करत असतो...माकडीच्याला केस कापायला वेळ नाही आणी चालला परीक्षक बनायला...
च्यायला अक्कल नसतांना ह्या लोकांचे बरे चालून जाते आज कालच्या जगात....
नाहीतर आपल्यालाच बघा ना..एका जॉब साठी 1000 इंटरव्यू द्यावे लागतात...
नाव, गाव, चड्डी, बनीयान....पार खोदुन खोदुन प्रश्न विचारले जातात...लै वैताग भाउ...
जाऊद्या तुम्ही मात्र आवर्जून हा कार्यक्रम पाहत जा...आणि आपल्या छोट्या दोस्तांना बॅक आप करा.....

माझ्या गैर मराठी वाचकांसाठी ...

माझे बोहोत सारे असे दोस्त है..जिनको मराठी नाही कळता है...
मग मैने ऐसा विचार केला..की उनके करता काही तरी होऊन जाउदे हिंदी मे...
म्हणून मी लिहिनेको बैठा है...बठा म्हणजे जेवणेको बसते है वैसा नाही...
वैसे माझा हिंदी म्हणजे ... पेड के निच गाव्हडि खडी ऐसा है...
अब ये मत विचारो के इसका अर्थ क्या है... गपचुप जाके किसी मराठी मित्र को विचार के आओ... थोडा कूच विचारा तो इमप्रेसन कमी नाही होणे वाला तुम्हारा...
और एक गोष्ट आधीच सांग के देता है....मै इधर काही मराठी का ठेका नाही लेणे बैठा हु...वो लेणे के लिये और भी लोग है...और मला जातीच्या नावावर कूच नाही बोलणे का है...कारण "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असे मी नुसते म्हणत नाही तर ते पाळतो सुद्धा....आणि एखाद्याला बांधव म्हटल्यावर जातीचा प्रश्न येता किधार है...
वैसे बघा जाए तो हिंदी का बोलबाला मराठी लोकांनीच केला आहे...
आता बघो ना...2 मराठी माणूस जेव्हा एकत्र येते है...तब ते हिंदीं मेच गप्पा गोष्टी करते है....मस्त पुरणपोळी के ऐवजी पीज़ज़ा खाते है...मारणे डॉ साला सबको...
मै तो मराठी हु और मी मराठी माधेच लिहिणार...कारण मराठी माझी मातृभाषा आहे... म्हणून सांगतो की ज्यांना हा ब्लॉग झेपत नाही..वो जाके मराठी शिक के आओ...कारण मेरा हिंदी तुम लोगो को झेपणे वा ला नाही है...
वो जपान बघा है क्या कधी ??? उनके देश मधे अजुन पण इंग्लीश नाही वापरते है...उनका काही पण प्रॉडक्ट बाजार मे आता है तो वो जपनीज भाषे मे होता है...
बाकी लोकांनी जपनीज शिकली पण त्यांनी इंग्लीश नाही शिकली...
म्हणून म्हणतो .. अरे बोलून तो बघो किती मजा आहे मराठी मे ....कुछ मदत लगी तो मै इधर हीच पडा है...बिंदास विचार के लेनेका...कळा ना...बस...
च्यामरी धरून फटाक...

Thursday, January 15, 2009

मला सोडवता न आलेले किवा न झेपलेले काही प्रश्न....

मला सोडवता न आलेले किवा न झेपलेले काही प्रश्न....

1. मुलांना मुली का भाव देत नाहीत...
2. सुंदर मुली नेहमी दुसर्‍याबरोबर का असतात...
3. देव आनंद कधी रिटायर होणार...
4. हिमेश ला तो चांगला गातो असे कोणी सांगितले...
5. नेमका कामाच्या वेळी वैताग का येतो...
6. पगार एक महिन्याने का होतो...
7. कुत्र्याच्या तोंडी कोणी लागत नाही तरी.. कुत्ते मै तेरा खून पी जॉवुगा असे का म्हणतात...
8. देशद्रोही मधला हीरो डाइरेक्टर ने कुठुन धरून आणला...
9. सेंसॉर बोर्डत कामाला लागण्यासाठी काय करावे लागते... :)
10. कॅंडक्टर माझ्याकडूनाच सुटे पैसे का मागतो...
11. साधारण किती पैसे कमावले की माणूस समाधानी होतो... म्हणजे माणसाला जगण्यासाठी किती पैसे लागतात...
12. आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात वकील का लागतो....
13. सानिया मिर्झा कितीही मॅचस हरली तरी ती जागतिक क्रमवारीत पुढे कशी असते....

आणि सर्वात शेवटचा पण मनाला बोचणारा ---

माणूस माणसपेक्षा जातीला इतके महत्व का देतो ??????????????????????????????

याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयास करतो आहे...तुम्हाला जमले तर तुम्ही सुद्धा द्या.....

जय बजरंग बली की जय....

जय बजरंग बली की जय....
तुम्ही म्हणाल आज अचानक बजरंग बली कसा काय आठवला ह्याला...काही स्वप्नात दारसिंघ तर नाही आला ना ह्याच्या....
नाही नाही...तसे काही नाही....मला देव आठवला त्याला एक कारण आहे...
काय आहे सध्या मी व्यायाम शाळा लावली आहे...म्हणजे मला लावायला सांगण्यात आले आहे...
जळला मोहरा त्या आमीरखानचा... कशाला त्याने बॉडी बनवली काय माहिती...
आता आमची ही सुद्धा मागे लागली आहे माझ्या....
म्हणाली..आमीर सारखी बॉडी बनवा नाहीतर भांडी घसा...रोज....
आता काही पर्याय आहे का माझ्या समोर... ?? सांगा...
लागावे लागले कामाला...शेवटी...वजन उचलने परवडले पण भांडी घासणे नको......
बर आमची आधीची बॉडी म्हणजे एक पसली ची...त्यात आमिर सारखी बॉडी बनवणे म्हणजे एक मोठा कार्यक्रमच ...
मला तुम्ही काहीही करायला सांगा...म्हणजे अगदी हिमेश चे गाणे सुद्धा ऐकू शकतो मी... सन्नी देओल चा पिक्चर सुद्धा बघू शकतो मी...
पण सकाळी उठून व्यायाम करणे म्हणजे...जीव जातो हो माझा...ते माझे गाव नाही...
आणि स्नायू ताणून बजरंग बली होण्यापेक्षा पोट वाढवून गणपती होणे चालेल मला...
तर सांगायचा मुद्दा असा..की सध्या घरी व्यायाम चालू आहे..एकदम जोरात...
आमिर ला ही हेवा वाटावा असा...आणि सन्नी देओल च्या कणखाली मारावा असा....
तेव्हा लक्षात ठेवा .. रस्त्याने जतांना एखादा आमिर सारखी बॉडी असलेला प्राणी तुम्हाला सापडला तर तो नक्की मी असेन....
तेव्हा बोला जय बजरंग बली की जय......

ए भाउ ... डोके नको खाउ

राम राम ... अरे काय हे मित्रांनो .. च्यामरी धरून फटाक...
कधी नवत एक ब्लॉग लिहिला तर लगेच सुरू झाले कुठून चोरला म्हणून...
अरे मी काही आणू मलिक आहे का चोरी मर करायला...
आता तुम्हाला पटण्यासाठी गणपती पाण्यात ठेवू का ? की डोंगरावरून उडी मारू...?
गॅप वाचा की ब्लॉग...आपल्यला डोक्याला ताप नाही पायजेले...
मी कमीतकमी देव आनंद सारखे बकवास पिक्चर काढून तुम्हाला पाहायला तर नाही लावत आहे ना..मज़ झिक-झिक नाही पाहिजेले...
गपचुप आंबे खा...उगाच कोई नका मोजू....
म्हणे डोक्याला ताप..जगताप.... :)

Wednesday, January 14, 2009

तूही रे .. तुही रे..

Himesh Reshamiya and Anu Malik -- I will pay for you if you are ready to join MUSIC CLASSES from this man...

प्रेम विवाह करताए...जरा जपून....

आज सहज घरी (नेहमीप्रमाणे) रीकामा बसलो होतो...एरवी बायको कपडे धुने, भांडी घासणे वैगेरे कामे आटपून ठेवायला सांगते...
काय आहे सध्या दीवसा घरीचा असतो ना मी.. करावे लागते..कळेल तुम्हालाही लग्न झाल्यावर...
जाउ द्या..तर मी काय सांगत होतो ... मी सहज म्हणून गॅलरी मधे उभा होतो..तर समोर च्यायला एकदम सुंदर ललना आली..
बहुदा तिने बपाचे सर्व पैसे मेकअप मधे घातले असावे...पण तुम्हाला सांगतो काय होती हो ती पोरगी...
जशी काही मधुबालाच ...
मग काय मी ही किशोर कुमार झालो...आणि माझ्या तोडून गाणे येणार तेवढ्यात मागून आवाज आला ..
आग ए ऐकलस का...?? तिच्या मागे पाहतो ते काय...एक एकदम कॅंडम माणूस..तीचा बाप शोभावा असा...मागून येत होता...
च्यायला आपले तर डोकेच सरकले...हा टकल्या साला हिचा नवरा..अरे रे...
क्षणात आभाळ फाटले....आणि मी विचारात पडलो...

आज कालच्या मुली काय पाहून लग्न करतात काय माहिती...
अर्थात आता हे काय सांगायला हवे का .. काय पाहून लग्न करतात ते....
के पैसा बोलता है....आहो साधा सरळ हिशोब आहे....
आजकालच्या मुलींना "सायकल वर बसून हसण्यापेक्षा चांगल्या चार चाकी गाडीत बसून रडणे नक्की आवडेल ना..."

बर आपण पडलो नोकरी करून जगणारी क्षुल्लक माणसे....कशा पटणार पोरी आपल्याला...
मित्रांनो उठा...जागे व्हा...आणि पुन्हा आपला जॉब करा..
उगाच प्रेमाच्या भानगडीत नका पडू...नाहीतर माझ्यासारखे भांडी धुने करावे लागेल...

शुभ मकर संक्रांती

शुभ मकर संक्रांती ...शुभ मकर संक्रांती ...
च्यायला आपण म्हणतो पण एखाद्याने वाईट वागायचे ठरवले असेलच तर काय करणार ते तीळगुळ ???
आता हेच बघा ना .. आमच्या शेजारी पाजरी अनेकजण रहातात की ज्यांना च्यायला एक दीवस भांडण नाही केले तर जेवण जात नाही..
आता मी जरी कितीही तीळगुळ त्यांच्या तोंडात कोंबले तर के काय सुधारणार आहेत का ?
पण जाउद्या..ज्याचा त्याचा प्रष्न आहे...आपण कशाला उगाच नाक घालायचे त्याच्यात..
तेव्हा बोंबला हॅपी मकर संक्रांत ....