Friday, January 23, 2009

रिसेशन...

माझा एक मित्र...
एकदम हुशार...अगदी नजर लागावा इतका हुशार...
CMM 5 कंपनी मधे काम करणारा ..एक हुशार सॉफ्टवेर इंजिनियर ...
घरची परिस्तिथि बेताचि...अगदी गरीब कुटुंबातुन वर आलेला....आणि बरीच मेहेनत करून पुढे गेलेला ...
एक दिवस असाच भेटला...
म्हणाला...अरविंद जॉब बघ माझ्यासाठी...
मला धक्काच बसला...मी म्हणालो..अरे तू तर CMM 5 कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर आहेस ना..मग ??
तो एकाच शब्दात म्हणाला...रिसेशन...
आज आपण जर आपल्या आजु बाजूला पहिले तर हीच परिस्तिथि आहे...
कित्येक हुशार मुलं...मुली...अचानकपणे ह्या रिसेशन च्या विळख्यात अडकलेले आहेत...
माझ्या बरोबर काम करणारे कित्येक लोक आज घरी बसलेले आहेत...
फार वाईट वाटते त्यांच्याकडे पाहून...
काहींचे लग्न झालेले..काहींनी कर्ज घेतलेले...प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम आहेच...
आता ही मंडळी काय करतील...????
कंपनी ने कढतांना हा विचार नाही केला... ज्या कंपनी ने तोंड भरून कौतुक करून ह्यांना मोठ्या पगारवर नोकरी दिली होती, त्याच कंपनी ने आता त्यांना रस्त्यावर आणले होते....
इतक्या लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत की मोजनेही कठीण आहे...आणि त्यांना पुन्हा जॉब मिळणे ही कठीण आहे...
अशा परिस्थितीत टेन्षन तर साहजिकच येणार...त्याला उपाय नाही...
मग काय करावे... ????
बाकी काही नाही ..पण आपण एक गोष्ट करू शकतो...
नोकरी चालू असे पर्यंत जो काही पैसा मिळेल...त्याचा योग्य वापर केला तर अशा दिवसात...निदान नोकरी मिळे पर्यंत तरी...त्या पैशाचा उपयोग होऊ शकतो...
बाकी आपले प्रयत्न चालू ठेऊन देवा वर विश्वास ठेवा...सर्व काही ठीक होईल...

1 comment:

VJ said...

Wah saheb ekdam barobar bolale tumhi....