लव की अरेंज्ड ? कुठले लग्न चांगले ? कोण ठरवणार ?
तुम्ही काय म्हणता ?
गप्पा मारता मारता सहज लक्षात आले की ज्यांनी कधी नि-स्वार्थ प्रेमच कधी केले नाही ते लोक नेहमी प्रेमाला नावं ठेवतात. मी मुद्दाम नि-स्वार्थ शब्दाचा उपयोग केला...कारण प्रेम काय हो
रस्त्यावरच्या कुत्र्या सारखे असतं .. कुणाच्याही मागं लागतं ते..
पण नि-स्वार्थ आणि खरं प्रेम..ते कुणा कुणालाचं मिळतं.
मला ते मिळालं .. आणि मी स्वताहाला भाग्यवान समजतो...
अरेंज मॅरेज वाईट नक्की नाही..पण सध्या त्याचा जो बाजार मांडलेला आहे तो विचित्र आहे.
आजकाल लग्नाला उभे राहीले की तुमचा पगार .. घरदार .. जमीन जुमला पहिला जातो..
काय चटायचं आहे ते ?
मुलीला पन्नास प्रश्न विचारून हैराण करता येईल ह्यासाठी मुलगा आपल्या हुशार (म्हणजे पाय ओढता येणार्या) मित्रांना बरोबर घेऊन जातो...बिचारी घाबरलेली पोरगी..अजुनच बीचकुन जाते..मुलगी दिसायला चांगली असेल तर ठीक नाहीतर आप-आपसात खाना खुणा होऊन काढता पाय घेतला जातो...
पुढे मग तिला तिच्या आवडी निवडी बदलून आयुष्यभर दुसर्याने सांगितलेले करावे लागते.
आपल्या चिरंजीवाला सिगरेट सोडवत नाही मग त्या पोरीला आपल्या सवयी लगेच कशा बदलता येतील ह्याचा कुणीही विचार करत नाही.
मला कुणाचीही बाजू मांडायची नाही..बस एवढेच सांगायचे आहे की..
लव मॅरेज वाईट नक्कीच नाही..गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलण्याची....